आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रारंभ हा खेळाडूंच्या विशेष काळजीचा भाग असतो. फार चांगले नशीब असलेल्या काही जणांचा अपवाद वगळता अनेकांना आपापल्या देशाच्या राष्ट्रीय संघामध्ये प्रवेश करण्यासाठीच झगडावे लागते. सुरुवातीच्या काही सामन्यांमधील कामगिरीवरच संघातील स्थान अवलंबून असल्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंबरोबरच प्रचंड मानसिक दडपणाचाही सामना खेळाडूंना करावा लागतो.५ डिसेंबर १९५९ रोजी पाकिस्तानच्या इंतिखाब आलमचे कसोटीपदार्पण साजरे झाले. पहिल्याच चेंडूवर त्याला बळी मिळाला ! पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणारा आलम हा दहावा खेळाडू ठरला. आजवर केवळ १३ गोलंदाजांना पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी मिळविता आलेला आहे. त्यापैकी एक आलमचा अपवाद वगळता इतरांसाठी हा पराक्रम एखाद्या शापासारखा ठरला आहे. मॉरिस टेट आणि आलमचा अपवाद वगळता खालील यादीतील इतर कुणाही गोलंदाजाला दहाहून अधिक कसोट्यांपलीकडे मजल मारता आली नाही. आर्थर कोनिंगहॅम, मॅट हेंडर्सन, डेनिस स्मिथ आणि टायरेल जॉन्सन एकेकच सामना खेळले आणि स्मिथला तर पुन्हा बळीही मिळाला नाही! या यादीत भारताच्या नीलेश कुलकर्णीचा समावेश आहे आणि त्याचा उल्लेख ६ ऑगस्टच्या फ्लॅशबॅकमध्ये आलेला आहे.पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणार्या गोलंदाजांची यादी :
align=right> |
||||||
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply