नवीन लेखन...

नोव्हेंबर ०८ – ३३१ ची भिडूगिरी आणि उलटा झाडू, सुटला चषक

३३१ ची भिडूगिरी १९९९ : तीनच दिवसांपूर्वी राजकोटमध्ये झालेला सामना न्यूझीलंडने त्यांची सर्वोच्च धावसंख्या (३४९) उभारून जिंकल होता. मालिकेतील दुसर्‍या सामन्यात हैद्राबादमध्ये भारतीयांनी किवींचा १७४ धावांनी दणदणीत पराभव केला आणि मालिकेत बरोबरी आणली. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी ३३१ धावा भागीदारीत जोडल्या. एकदिवसीय सामन्यात कुठल्याही क्रमांकाच्या जोडीसाठी हा विक्रम आहे. राहुल द्रविडने १५३ चेंडूंमध्ये तितक्याच धावा काढल्या पण त्याच्यापेक्षा तीन चेंडू कमी खेळून ३३ धावा जास्त काढणार्‍या तेंडुलकरमुळे तो झाकोळून गेला. हातोडा सर्वच गोलंदाजांना त्रासदायक ठरला. क्रिस ड्रमने ९ षटकांमध्ये ८५ धावा दिल्या. शेवटच्या सहा षटकांमध्ये भारतीयांनी ९० धावा काढल्या.

उलटा झाडू, सुटला चषक १९८७ : माईक गॅटिंगने झाडूचा उलटा फटका मारण्याचा भयावह (आणि अयशस्वी) प्रयत्न केला तो हा दिवस. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी २५४ धावांचे आव्हान इंग्रजांना मिळाले होते. अलन बॉर्डरचा पहिलाच चेंडू रिवर्स स्वीप (बॅटवरची पकड बदलून बॅटच्या नैसर्गिक झोकाच्या उलट दिशेने पोटाकडील बाजूस- ऑफ साईडला –फलंदाजाने मारलेलाफटका) करण्याचा प्रयत्न इंग्लिश कर्णधार गॅटिंगने केला, बॅटच्या वरच्या कडेला लागून उडालेला चेंडू थेट यष्टीरक्षक ग्रेग डायरच्या मोज्यांमध्ये स्थिरावला. गॅटिंग गेला तेव्हा इंग्लंडला १५ षटकांमध्ये १०२ धावांची गरज होती. माईक व्हेलेट्टाने ३१ चेंडूंमध्ये ४५ धावा झोडल्या पण अलन लँबचा बळी निर्णायक ठरला. ४५ धावांवर असताना लँबला स्टीव वॉने त्रिफळाचित केले. इंग्लंडचे शेपूट लांबलचक होते पण वॉने ते अलगद कापून काढले. सुमार दर्जाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या आगमनाची घोषणा केली आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..