नवीन लेखन...

अनाकलनीय!






प्रकाशन दिनांक :- 06/02/2005

भौतिक सुखांची जिथे रेलचेल आहे त्या अमेरिकेतील अर्धी जनता आज झोपेच्या गोळ्या घेते. केवळ मन:शांतच्या शोधात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या अमेरिकेत प्रचंड आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तर संपूर्ण अमेरिकन जनमानस एका अज्ञात दहशतीच्या छायेखाली जगत आहे.
विसाव्या शतकात विज्ञानाच्या प्रगतीने आणि प्रसाराने प्रचंड गती धारण केली. त्यातूनच मानवाला अधिकाधिक भौतिक सुख-सुविधांचा लाभ होत गेला. विज्ञानाच्या प्रगतीचा सरळ संबंध मानवी जीवनाच्या सुखाशी, निरामयतेशी जुळलेला असणे अपेक्षित आहे. त्यामुळेच अधिक वैज्ञानिक प्रगती, अधिक सुखकर जीवन, असे सूत्र प्रस्थापित व्हायला हवे; परंतु जे सामाजिक चित्र दिसते ते या सूत्राच्या अगदीच विपरीत आहे. एकीकडे विज्ञान प्रगतीची नवनवी शिखरे गाठत असताना दुसरीकडे मानवी समाज मात्र प्रचंड भयकंपित, असुरक्षित झाल्याचे दिसत आहे. प्रगतीने सुख, सुबत्ता, स्थिरता येण्याऐवजी अस्वस्थता, अशांतता निर्माण झालेली दिसते. हे आकलन केवळ समाजाचेच नाही तर मनुष्य वैयक्तिक आयुष्यातही अतिशय अस्वस्थ झालेला दिसतो. भौतिक सुखांची जिथे रेलचेल आहे त्या अमेरिकेतील अर्धी जनता आज झोपेच्या गोळ्या घेते. केवळ मन:शांतच्या शोधात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या अमेरिकेत प्रचंड आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तर संपूर्ण अमेरिकन जनमानस एका अज्ञात दहशतीच्या छायेखाली जगत आहे. डॉलरने आलेली समृद्धी अमेरिकन जनतेला सुखाची निवांत झोप मिळवून देण्यास पुरेशी ठरलेली नाही. प्रचंड श्रीमंतीतही खूप काही गमाविल्याची भावना अमेरिकेसारख्या समृद्ध देशातल्या नागरिकात बळावत चालली आहे. कदाचित त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा, अध्यात्माचा प्रसार करणाऱ्या साधू-संत-महंतांना पाश्चिमात्य देशात प्रचंड प्रतिसाद म

िळत असावा. कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ पंथाला, ‘ईस्कॉन’ला पाश्चिमात्य देशात अक्षरश: हजारो अनुयायी लाभले आहेत. सामाजिक जाणिवा, मानवी संवेदना आणि जीवनातील तृप्ती हरविलेल्या या पाश्चिमात्य देशांचे, त्यांच्या जीवनशैलीचे अंधानुकरण करताना

भारतीय समाजदेखील आपल्या पारंपरिक श्रेष्ठ

मूल्यांना, जीवनशैलीला पायदळी तुडवत आहे. जीवनाचे, मग ते सामाजिक असो अथवा वैयक्तिक, जितके सखोल चिंतन भारतात झाले तितके जगाच्या पाठीवर कुठेच झालेलेे नाही. या चिंतनातूनच सुखकर जीवनासाठी आदर्श मूल्ये निर्माण झाली. दुर्दैवाने आज आम्हालाच त्यांचा विसर पडला आहे. साहेबी प्रथांचे अनुकरण करताना आम्ही केवळ समाजाचेच नव्हे तर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याचेही प्रचंड नुकसान करून घेत आहोत. अगदी सहज करता येण्याजोग्या अनेक साध्या गोष्टी आहेत, परंतु त्यांच्याकडे साफ दुलर्क्ष करून आम्ही प्रचंड त्रासाला आणि मन:स्तापाला आमंत्रण देत असतो. या साध्या साध्या गोष्टीतूनच एरवी अतिशय कठीण वाटणाऱ्या समस्या अगदी सहज सुटू शकतात, परंतु आपली अवस्था ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’, अशी झाली आहे. अलीकडील काळात हृदयविकार, रक्तदाब, अल्सरसारख्या आजारांचे प्रमाण भारतात प्रचंड वाढले आहे. थेट मन:स्वास्थ्याशी संबंध असलेल्या या आजारांवर उपचार करून घेताना विदेशी औषधींचा, शस्त्रक्रियांचा, महागड्या उपचार पद्धतीचा आपण वापर करतो. मूळ आजाराइतक्याच घातक असलेल्या ‘साईड इफेक्ट’ ची जोखीम पत्करून आम्ही हे उपचार करून घेत असतो, परंतु त्याचवेळी हे आजार होणारच नाहीत याची हमी देणारी भारतीय जीवनपद्धती स्वीकारायला मात्र आम्ही तयार नसतो. बायपास सर्जरीला आम्ही निमूटपणे होकार देतो, परंतु बायपास सर्जरीचे संकट हमखास टाळणाऱ्या बिनखर्चीक योगासनांसाठी मात्र आमच्याजवळ वेळह

नसतो आणि तशी इच्छाही नसते. महागड्या औषधांचा खर्च मोठ्या कौतुकाने आम्ही करतो, परंतु कर्करोगासारख्या घातक रोगावरही प्रभावी ठरणाऱ्या गोचिकित्सा पध्दतीकडे मात्र तिरस्कृत नजरेने पाहतो. ‘जंक फूड’ चे दुष्परिणाम सगळ्या जगाला माहीत आहेत. माणसाच्या आरोग्याचा रस्ता त्याच्या पोटातूनच जात असतो. या पोटावरच प्रचंड अन्याय करणाऱ्या, केवळ जिभेचे चोचले पुरविणाऱ्या व ‘हायफाय’ संस्कृतीची जोपासना करणाऱ्या या ‘जंकफूड’ ला भारतात मात्र नवशिक्षित समाजामध्ये ‘मॉडर्न’ ह्या नावाखाली प्रतिष्ठा आहे. षड्रसयुक्त परिपूर्ण भारतीय भोजनाला आम्ही केव्हाच ‘बाय बाय’ केले आहे. पिझ्झा, स्नॅक्स, बर्गर, फास्टफूडसारखे विदेशी शब्द आमच्या स्वयंपाक घरात सुखाने नांदू लागले आहेत. याचा परिणाम हळूहळू समोर येत आहे. पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे मनाचे आरोग्य बिघडत आहे आणि मनाचे आरोग्य बिघडल्याने हृदयविकार, रक्तदाब, अल्सरसारख्या आजारांचे ‘रेड कार्पेट’ स्वागत होत आहे. आम्ही अगदी टापटीप राहतो, स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक निखरण्यासाठी फॅशनचे नवनवे प्रयोग सातत्याने राबवतो. त्यासाठी जो खर्च आम्ही करतो त्याच्या एक शतांश खर्च जरी आम्ही योग्य अन्नपदार्थांच्या सेवनासाठी केला तरी आमचे आरोग्य अगदी सुदृढ होईल. शरीर सुदृढ असेल तर मनही निरोगी राहते. शरीर आणि मन निरोगी असलेली व्यक्तीच एक व्यक्ती म्हणून सुंदर आणि आकर्षक ठरते. एरवी बाहेरच्या टापटीपीने आतला पोकळ डोलारा झाकण्याचा प्रयत्न निव्वळ हास्यास्पदच ठरतो. व्यायाम, योगासनाकडे आमचे साफ दुलर्क्ष होते. नियमित आहार, माफक व्यायाम आणि कटाक्षाने पाळल्या जाणारे दैनंदिन वेळापत्रक ही जवळपास बिनखर्चीक आणि बिनत्रासाची त्रिसूत्री सुदृढ, निरोगी, निरामय जीवनाचा पाया आहे, परंतु या सहज-नैसर्गिक जीवनशैलीला आम्ही फाटा का दिला, हे अनाकलनीयच आहे. सुशिक्ष r />
त, सधन आई-वडील आपल्या मुलांसाठी वाट्टेल तसा खर्च करायला तयार असतात. निव्वळ पैशाच्या जोरावर आपल्या मुलांचे भवितव्य घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु असे करताना योग्य संस्कार, योग्य सवयी या बहुमोल, शिवाय बिनखर्चीक बाबींकडे मात्र ते साफ दुलर्क्ष करीत असतात. पैशाने सगळे काही मिळते हा विचार कळत नकळतपणे ते मुलांच्या मनावर बिंबवीत असतात. हाच विचार मुलगा मोठा झाल्यावर त्या मुलासाठी आणि मुलासोबतच त्याच्या आई-वडिलांसाठी घातक ठरतो. मुलगा मोठा होत असताना, त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करताना त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे संस्कार करण्याकडे आई-वडिलांचे दुलर्क्ष का होते किंवा हे दुलर्क्ष का केले जाते,

हा प्रश्नही अनाकलनीयच आहे. अशा खूप गोष्टी आहेत की, ज्या

सहज करता येणे किंवा टाळता येणे शक्य असतानाही त्या केल्या जात नाहीत किंवा टाळल्या जात नाहीत. स्वत:चे घर स्वच्छ ठेवणारे लोक घरातला कचरा बाजूच्या परिसरात बिनदिक्कतपणे नेऊन टाकतात आणि वर परिसराच्या अस्वच्छतेबद्दल ओरड करतात. या लोकांची स्वच्छतेची संकल्पना आपले अंगण का ओलांडत नाही, हेससुद्धा अनाकलनीयच आहे. सरकारवरच्या रागाचे प्रदर्शन करताना आपल्याच करातून उभ्या झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस लोक का करतात, एसटीच्या बसेस अशाप्रसंगी जाळण्यासाठी किंवा तोडफोड करण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत, असा लोकांचा ठाह का होतो, हा प्रश्नसुद्धा अनाकलनीयच आहे. धर्म, जातीपातीच्या भेदाने या देशाचे प्रचंड नुकसान केले आहे, हे जवळपास प्रत्येकाला मान्य असल्यावरसुद्धा प्रत्येकजण आपल्या जातीच्या किंवा धर्माच्या नावावर पेटून उठण्यास का सिद्ध असतो, हेही अनाकलनीयच आहे. तसे पाहिले तर ही यादी खूप वाढवता येईल. सार इतकेच की, मानवाने प्रगती केली असली तरी ‘मानव प्राणी’ ही ओळख त्याला अद्यापही पुसता आलेली

ाही. मानव अद्यापही पूर्ण मानव झालेला नाही, अन्यथा मानवाच्या संदर्भात अनाकलनीय ठरलेल्या प्रश्नांची यादी इतकी लांबली नसतीच, नव्हे अनाकलनीय असे काही उरलेच नसते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..