नवीन लेखन...

आधुनिक आक्रमण!




प्रकाशन दिनांक :- 28/03/2004

नित्य नवीन बदलांना स्वीकारीत काळ झपाट्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य कोणता तरी नवा बदल घेऊन येत आहे. काही बदल अगदी सहज जाणवण्याइतपत ठळक आहे तर काही बदलांची प्रक्रिया अतिशय सुक्ष्म आहे. परिवर्तनाच्या गतीत पुरक असू शकतो, परंतु सातत्य मात्र कायम आहे. विशेषत: गेल्या शे-दीडशे वर्षांच्या कालखंडात तर या परिवर्तनाची गती अधिकच तीप झालेली दिसत आहे, खासकरून भारतात ब्रिटिशांची शे-दीडशे राजवट त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरली. आज ब्रिटिश भारतातून हद्दपार होऊन जवळपास सहा दशके होऊन गेलीत, परंतु त्यांच्या राजनीतीचा, कूटनीतीचा त्यांनी केलेल्या बुद्धिभ्रमाचा पगडा आजही आमच्या मानसिकतेवर कायम आहे.
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी इथली सामाजिक, राजकीय परिस्थिती खूप भिन्न होती. ब्रिटिशांनी संपूर्ण व्यवस्थेलाच आपल्या सोयीनुसार वेगळे स्वरूप दिले. आपल्या सत्तेला मजबुती आणि स्थिरता मिळवून देण्यासाठी त्यांनी सामाजिक, राजकीय सुधारणेच्या नावाखाली अनेक बदल घडवून आणले. विशेष म्हणजे या कथित सुधारणांमागचा अंतस्थ हेतू लक्षात न घेता ब्रिटिशांनी केलेल्या बदलांचे स्वागत करणारा एक मोठा, सुशिक्षित किंवा नवशिक्षित वर्ग त्याकाळी अस्तित्वात होता. त्या वर्गाची मानसिकता जोपासणारा मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे आणि याच वर्गाचे आधुनिक प्रसार माध्यमांवर वर्चस्व आहे.
ब्रिटिशांच्या माध्यमातून इथल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेतील परिवर्तनाला खरी गती मिळाली ती 1857 च्या अयशस्वी क्रांतीनंतर. ब्रिटिशांच्या लेखी ते बंड होते. एकजुट आणि समन्वयाच्या अभावामुळे हे बंड फसले. आपल्या सत्तेला पुन्हा कधी आव्हान दिले जाऊ नये, याची काळजी घेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली विविध कायदे अस्तित्वात आणले.
सशस्त्र क्रां
ीचा धसका घेतलेल्या ब्रिटिशांनी सर्वप्रथम शस्त्रे बाळगण्यावर कायद्याने बंदी आणली सोबतच जमावबंदीचा कायदा कलम 37 अन्वये लागू केला. या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आणि

क्रांती घडवून आणण्याचा पूर्वापार चालत

आलेला एक मार्ग बंद झाला तो कायमचाच. मनगटाच्या जोरावर क्रांती घडवून आणण्याचे दिवस या कायद्याने इतिहास जमा केले. जम बसलेल्या ब्रिटिश सत्तेला सशस्त्र आव्हान देता येत नाही, हे सत्य स्वीकारुन तत्कालीन स्वातंत्र्य योद्ध्यांनी अन्य पर्यायी मार्गाचा शोध सुरु केला. स्वातंत्र्याच्या लढ्याची ठिणगी कायम प्रज्वलित ठेवणे आवश्यक होते आणि तत्कालीन परिस्थितीत वर्तमानपत्राशिवाय अन्य कुठलाही पर्याय प्रभावी ठरु शकणारा नव्हता.
‘खिंचो न कमान को,
न तलवार निकालो’
जब तोफ मुकाबिल हैं तो,
अखबार निकालो’
या उक्तीची परिणामकारक अंमलबजावणी सुरु झाली. जमावबंदीच्या आदेशामुळे राजकीय कारणासाठी लोक एकत्र येऊ शकत नव्हते. परंतु सामूहिक धार्मिक उत्सवांना मनाई नव्हती. कायद्यातील या पळवाटेचा उपयोग करीत टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंतीच्या माध्यमातून राजकीय जनजागृती सुरु केली. आपल्या कायद्याची हतबलता मुकाटपणे पाहण्याशिवाय ब्रिटिश काही करु शकत नव्हते. त्यानंतर राजकीय क्षितिजावर गांधीजींचा उदय झाला आणि जगाच्या इतिहासात ‘न भुतो न भविष्यती’ अशा यशस्वी स्वातंत्र्य लढ्याची नोंद झाली. ‘दे दी हमे आजादी बिना खङ्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ या उत्स्फूर्त ओळी सहजच लोकांच्या ओठावर खेळू लागल्या. सांगायचे तात्पर्य ब्रिटिशांच्या आगमनानंतर वाढलेल्या परिवर्तनाच्या वेगाने विचार, आचार, व्यवस्था सगळेच बदलून टाकले. यापुढचे परिवर्तन, यापुढच्या क्रांत्या केवळ बंदुकीच्या गोळीने शक्य नाही, हे सत्य जसे प्रस्थापितांविरुद्ध लढणाऱ्यांना स्वीकारा
े लागले तसेच हातातील दंडूक्यापेक्षा वैचारिक बुद्धिभ्रम आपली सत्ता निरंकुशपणे राबविण्यासाठी अधिक उपयुक्त, प्रभावी असल्याचे प्रस्थापितांनाही समजले. हे परिवर्तन इथल्या जनमानसावर खोलवर बिंबवून ब्रिटिश गेले. सत्ता राखण्याचा हा ब्रिटिश मूलमंत्र आजही आपला प्रभाव कायम टिकवून आहे. इंठाजांनी खुल्या केलेल्या लुटीच्या महामार्गावरची रहदारी आजही सुरु आहे, इतकेच नव्हे तर ती प्रचंड वाढली आहे. लुटीचे हे तंत्र इतके आकर्षक आहे की, त्यातली फसवेगिरी अगदी तज्ज्ञ म्हणविणाऱ्या लोकांच्याही लक्षात येत नाही. 1964 च्या सुमारास देशात अभूतपूर्व अन्नटंचाई निर्माण झाली. खरे तर ती केल्या गेली. या कृत्रिम अन्नटंचाईतून देशाला बाहेर काढण्यासाठी मिलोची आयात झाली. यात कोणाचे किती भले झाले, कोणाची कोणती भूक भागली हा वेगळ्या संशोधनाचा विषय ठरावा. परंतु अन्नटंचाईचे भ्रामक चित्र प्रभावीपणे उभारण्यात त्यावेळी सरकार यशस्वी झाले हे निश्चित. देशाला पुन्हा अशा प्रसंगाला तोंड द्यायची वेळ येऊ नये म्हणून ‘हरितक्रांती’ ची घोषणा करण्यात आली. दुष्काळ कायम स्वरूपी संपविण्याचे आवाहन करण्यात आले. शेतीचे उत्पादन वाढविण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आले. त्याचवेळी अन्नधान्य उत्पादनात इतर देशांच्या तुलनेत आपण किती मागे आहोत याची आकडेवारी प्रभावीरितीने मांडण्यात आली या सगळ्या प्रकारामुळे हरितक्रांतीच्या भुलैय्याला इथला शेतकरी बळी पडला आणि रासायनिक खते, कीटकनाशके मागच्या दाराने केव्हा आमच्या देशात आले ते कळलेही नाही. दुष्काळाची जाहिरात करून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाला इथला बाजार मोकळा करून दिला. हा साधा व्यापार नव्हता. बुद्धिभ्रम करून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची केलेली ती फसवणूक होती. इथल्या समृद्ध शेतीला वाळवंटात रुपांतरित करण्
ाच्या व्यापक कटाचा तो एक भाग होता. भारताचे अर्थशास्त्र शेतीच्या भक्कम पायावर उभे आहे. हा पायाच खिळखिळा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे, तोही आपल्याच सत्ताधाऱ्यांना वेठस धरुन. म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्या विविध प्रकारे आमच्या सत्ताधाऱ्यांचा बुद्धीभ्रम करीत आहे आणि सत्ताधारी लोक त्यांच्या भ्रामक प्रचाराला बळी पडून सामान्य जनतेचा कळत नकळत बुद्धीभ्रम करीत आहेत. नवे तंत्रज्ञान, नवे संशोधन म्हणून जे काही आमच्या माथी मारल्या जात आहे त्यापैकी बहुतांश तंत्रज्ञान किंवा संशोधन एकतर एकदम टाकावू आहे किंवा इथल्या परिस्थितीत, पर्यावरणात उपयुक्त नाही. इतर अनेक देशांनी बंदी घातलेली जहाल

कीटकनाशके, रासायनिक खते फक्त आपल्याच देशात कशी उपयुक्त ठरु शकतात,

या प्रश्नाच्या उत्तरातच सारे काही दडले आहे. अलीकडील काळात हेपिटायटिस बी’चासुद्धा असाच आक्रमक प्रचार केला जात आहे. ही लस टोचून घेतली नाही तर किती गंभीर रोगांना बळी पडावे लागेल, याचे भीतीदायक चित्र जाहिरातीच्या माध्यमातून उभे केले जात आहे. हा सर्व प्रकार केवळ बड्या बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपन्यांचा मोडीत निघालेला डिस्पोजेबल माल खपविण्यासाठी सुरु आहे. ‘एडस्’च्या आक्रमक प्रचारातही अनेक कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. या सर्व कंपन्यांचा भारत एक लाडका देश आहे तो दोन प्रमुख कारणांमुळे; एक तर इथली प्रचंड बाजारपेठ आणि दुसरे म्हणजे विदेशी कंपनीच्या आकर्षक, तर्कसंगत(?) प्रचाराला सहज बळी पडण्याची सामान्य ठााहकांची वृत्ती ‘अमुक एक बियाणे पेरा आणि भरघोस उत्पादन मिळवा’, अशी जाहिरात एखाद्या विदेशी कंपनीने केली आणि त्याला खोटारड्या आकडेवारीचा आकार दिला की, इथल्या शेतकऱ्याने ते बियाणे घेतलेच म्हणून समजा. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून आम्हाला गोऱ्या साहेबांचे, त्यांच्या आकर्षक व्य
्तिमत्त्वाचे, त्यांच्या रूबाबाचे, ज्ञानाचे, अप्रूप वाटत आले आहे. आपल्या या मानसिकतेचाच बहुराष्ट्रीय कंपन्या इथल्या प्रसार माध्यमांना हाताशी धरुन लाभ उचलीत आहेत. बुद्धिभ्रमाचे जे शस्त्र ब्रिटिशांनी वापरले त्याच शस्त्राला अधिक धार लावून आता बहुराष्ट्रीय कंपन्या आम्हाला लुटत आहेत. दुर्दैवाची बाब ही आहे की, ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या कथित सुधारणांचे स्वागत करणारा एक वर्ग त्याकाळी होता त्याच वर्गाचे वारसदार आजही स्वातंत्र्याच्या 57 वर्षानंतर तेवढ्याच संख्येने अस्तित्वात आहेत. समाजात ज्यांना ‘क्रिमीलेअर’ म्हणून ओळखले जाते,े त्यातील बहुतेक मंडळी या वर्गात मोडतात. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या इंम्पोर्टेड वस्तू वापरणे ज्या लोकांना अभिमानास्पद वाटते, पुढारलेपणाचे तेच एकमात्र लक्षण असे जे लोक समजतात त्यांनाच आज बुद्धिवादी समजले जाते. तेच लोक समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
भविष्यात देशाला गुलामीकडे लोटणाऱ्या या भयावह परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आधी सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. विदेशी आहे म्हणजे ती वस्तू चांगलीच असली पाहिजे, विदेशी आहे म्हणजे त्या कंपनीचे उत्पादन दर्जेदारच असले पाहिजे, हा भ्रम तुटणे आवश्यक आहे. आपण एखादी वस्तू, एखादे उत्पादन विकत घेतो ते केवळ आपल्या फायद्यासाठी नसते. त्या क्रय-विक्रयाचा परिणाम थेट देशाच्या अर्थकारणावर होत असतो, परंतु ही जाणीव कोणाला नसते आपण विदेशी कंपन्यांचे उत्पादन विकत घेतो म्हणजेच त्याच वस्तूचे उत्पादन करणाऱ्या देशी कंपनीला टाळे लावण्याच्या कामात हातभार लावीत असतो. त्यामुळे बेरोजगारी वाढते. तरूणमंडळी हताश होवून गुन्हेगारीकडे वळतात. सामाजिक स्वास्थ्य तर धोक्यात येतेच परंतु आर्थिक स्वातंत्र्यावरही गदा येते. या सर्वप्रकारची जाणीव क
ून देणारी प्रबोधनाची नवी चळवळ उभी करावी लागेल. शस्त्राने ही लढाई लढता येणार नाही. गांधीजींची निशस्त्र क्रांतीनीतीच इथे उपयुक्त ठरेल. स्वातंत्र्यातल्या स्वातंत्र्याचा शोध घेणारे एक स्वातंत्र्ययुद्ध पुन्हा लढावे लागेल. टिळक, गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच, परिवर्तनाच्या वेगाने जसे आधुनिक आक्रमणाचे परिणाम बदलले तसेच ते आक्रमण मोडीत काढण्याचे मार्गही बदलले आहेत.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..