नवीन लेखन...

उत्साह हरवला!





खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत. युत्या-आघाड्यांचे प्रश्न निकालात निघाले आहेत; परंतु निवडणुकीचा म्हणून जो एक ‘माहौल’ असतो तो मात्र फारसा कुठे दिसत नाही. कदाचित आचारसंहितेच्या बडग्यामुळे उमेदवार सावधपणे प्रचार करीत असावेत किंवा शेवटच्या दहा दिवसात सगळी कसर भरून काढण्याच्या योजना असाव्यात; परंतु निवडणुकीची एकूण रंगत कमी झाली आहे, हे निश्चित! त्यामागे सगळ्यात मोठे कारण मतदारांमधला निरूत्साह हेच आहे. लोकशाहीच्या या पंचवार्षिक तमाशाला लोक कंटाळले आहेत. निवडून कुणीही आले तरी ‘पहिले पाढे पंचावन्न’ हीच परिस्थिती राहणार, हे लोकांना आता अनुभवाने कळायला लागले आहे. शिवाय राजकारणातील ध्येयवादाला सगळ्याच पक्षांनी मूठमाती दिल्यामुळे निवडीतल्या पयार्याबद्दल लोकांमध्ये उत्सूकताच उरली नाही. बेरोजगारी, भाववाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पायाभूत सुविधांची वानवा आणि जोडीला वाढता दहशतवाद या सगळ्या समस्या कुणीही निवडून आले, कोणत्याही पक्षाचे सरकार बनले तरी कायमच राहणार याची लोकांना जणू काही खात्री पटली आहे. तीच ती आश्वासने, त्याच त्या घोषणा, दारू जुनीच, पण बाटल्या नव्या या सगळ्या प्रकाराला लोक कंटाळले आहेत. खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे
िळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या या

निरूत्सहामुळेच बडे राजकीय पक्ष

आज गलितगात्र झाले आहेत. काँठोस, भाजप सारख्या राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांना पाच-पन्नास प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांशिवाय धड उभेही राहता येत नाही. या पक्षांच्या मतदारांमध्ये सातत्याने घट होत असेल तर याचे कारण एकच आणि ते म्हणजे या पक्षांच्या विचारांमधले तात्त्विक अंतर कमी झाले आहे. विचारधारा फारशा वेगळ्या राहिल्या नाहीत, सत्तेसाठी कोणत्याही टोकाची तडजोड करण्याची तयारी या पक्षांनी दाखविण्यास सुरूवात केली आहे. निष्ठावान, ध्येयवादी कार्यकर्त्यांना पक्षात फारशी किंमत उरलेली नाही आणि मुख्य म्हणजे राजकारण किंवा निवडणूक आज पैशाचा खेळ झाली आहे. कोणत्याही पक्षाजवळ कोणतेही नवे मुद्दे नाहीत. विकासाची चर्चा कुणी करत नाही. फुकटात वीज किंवा तीन रूपयांत गहू-तांदूळ असल्या तद्दन भिकारचोट घोषणा देऊन मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्या जात आहे. खरेतर लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्राचा विकास याच मुद्यावर लढविल्या गेली पाहिजे; परंतु कोणत्याही पक्षाच्या प्रचारामध्ये या मुद्यांना स्थान नसते. एरवी ठाामपंचायतच्या निवडणुकीत शोभतील असे मुद्दे लोकसभा निवडणुकीत उगाळले जातात. कुठे जातीचा, कुठे धर्माचा, मंदिरांचा वापर प्रचाराचा मुद्दा म्हणून केला जातो तर कुठे चक्क नाल्या बांधून देण्याचे आश्वासनही पुरेसे ठरते. इतके सगळे करूनही शेवटी काय तर एकाही पक्षाला किंवा सतरा पक्षांच्या आघाडीला साध्या बहुमताचा आकडा गाठता येत नाही. गेल्या वीस वर्षांपासून देशात खिचडी सरकारचा प्रयोग सुरू आहे. परस्परविरूद्ध दिशांना ओढणारे घोडे जुंपून रथ हाकलण्याचा हा प्रयत्न
ितका हास्यास्पद आहे तितकाच या एकूण प्रक्रियेवरच्या विश्वासार्हतेलाही धोक्यात आणणारा आहे. यावेळीही काही वेगळे होण्याची शक्यता नाही. पूर्वी किमान डाळ, तांदूळ, मीठ, मोहरी अशा तीन-चार पदार्थांचीच खिचडी असायची, आता तर असतील नसतील तितके सगळे धान्य, असतील नसतील तितके सगळे मसाले खिचडीत टाकावे लागतील अशी चिन्हे दिसत आहेत आणि इतके करूनही खिचडी शिजेलच याची खात्री नाही. राजकारणाच्या नावाखाली लोकशाहीच्या तंबूत चाललेल्या या तमाशाला कुठेतरी धरबंद घालणे भाग आहे. या व्यवस्थेत शिरलेला सगळ्यात मोठा दोष म्हणजे सगळे राजकारण सत्ताकेंद्रीत झाले आहे. प्रत्येकालाच सत्ता हवी असते आणि त्यासाठी कोणत्याही स्तरावरची तडजोड करण्याची प्रत्येकाची तयारी असते. विधायक विरोध हा प्रकारच राजकारणातून बाद होत चालला आहे. दोन स्वतंत्र विचारधारा असणारे सारख्या ताकदीचे पक्ष राजकारणात असतील तरच लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. परंतु आपल्या देशात ही परिस्थिती दुर्दैवाने कधीच निर्माण झाली नाही आणि क्वचित तशी स्थिती निर्माण झाली तरी ती टिकली नाही. सुरूवातीचे चाळीस वर्षे देशावर काँठोसचा एकछत्री अंमल राहिला. त्यानंतर भाजपाने काँठोससमोर तितकेच जबर आव्हान उभे केले; परंतु पुढे पुढे भाजपदेखील काँठोसच्या वाटेने चालू लागला. नाही म्हणायला धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर आजही दोन्ही पक्षात टोकाचे अंतर आहे; परंतु हे अंतरही फसवे आहे. विविध पक्षांच्या सहकार्याने भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा खुंटीला टांगून ठेवला. काँठोसनेदेखील केवळ सत्तेसाठी जन्मजात हाडवैर असलेल्या डाव्या पक्षांसोबत तडजोड केली. आज धर्मनिरपेक्षतेची माळ जपणारे अनेक पक्ष रालोआ सत्तेत असताना भाजपच्या वळचणीला उभे होते. एकूण काय तर सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल

्याचे दिसते. लोकांसमोर वेगळा पर्याय नाही. राव उतरले पंत चढले, अशी परिस्थिती आहे. त्यातून लोकांमधला उत्साह हरवत चालला आहे. खरेतर मतदारांच्या हातात ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आहे; परंतु तेही प्रवाहपतीत होऊन प्रचारकी मुद्यांना, प्रलोभनांना, खोट्या प्रचाराला बळी पडतात. जे मतदान करतात ते फारसा विचार करून मतदान करत नाहीत आणि जे मतदान करत नाहीत त्यांना विचारच नसतो. अशा विचारहीन समाजाचे नेतृत्त्वही विचारहीन, तत्त्वहीन आणि सत्त्वहीन निघाले तर दोष तरी कुणाला द्यावा?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..