नवीन लेखन...

किमान लग्न तरी वेळेवर लावा!



लग्न किती उशिरा लागले हे कळावे एवढ्याचसाठी लग्नाचा मुहूर्त काढल्या जात असावा. खरेतर एखादा विशिष्ट मुहूर्त जेव्हा काढला जातो तेव्हा त्याचा अर्थ त्यावेळी त्या शुभकार्यासाठी ठाह-योगाचे पाठबळ वधू-वराच्या पाठीशी असते. लग्नाचा मुहूर्त काढणारे ही श्रद्धा बाळगूनच असा मुहूर्त निश्चित करीत असावेत आणि तशी त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी त्या विशिष्ट मुहूर्तावर लग्न लावलेच पाहिजे. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात मोठ्या शहरांपासून गाव-पाड्यात सगळीकडे लग्नाची धूम असते. तसे पाहिले तर लग्नाचे मुहूर्त वर्षभरच असतात, परंतु हा मोसम अनेकांसाठी थोडा निवांतपणाचा असतो, त्यामुळे या दोन महिन्यात सनई-चौघड्यांना थोडा अधिक जोर आलेला असतो. एकतर परीक्षा आटोपलेल्या असतात, त्यामुळे ‘पालक’ वर्गाला बरीच मोकळीक असते, शेतकरी वर्गालाही शेतीत फारसे काम उरलेले नसते, एकूण काय तर सगळ्यांच्या दृष्टीने या दोन महिन्यातच चांगले योग असतात. वास्तविक केवळ निवांतपणाचा विचार न करता सगळ्या दृष्टीने विचार केला तर भर उन्हाळा लग्नासाठी आदर्श मोसम ठरू शकत नाही. प्रचंड उष्णता, साध्या पिण्याच्या पाण्याची मारामार, पाहुण्यांच्या व्यवस्थेचा प्रश्न वगैरे अनेक समस्या असतात; परंतु सुट्ट्या या एकमेव निकषावर उन्हाळ्यातील मुहूर्त योग्य ठरविले जातात. मुहूर्त हा शब्द लिखाणात आला म्हणून तोही एक मुद्दा सांगावासा वाटतो. लग्नपत्रिकेत लग्नाचा मुहूर्त दिलेला असतो. लग्नाला येणाऱ्यांची अपेक्षा ही असते की दिलेल्या मुहूर्तावर किंवा फार तर पाच-दहा मिनिटे उशिरा लग्न लागावे; परंतु लग्नाला होणारा हा उशीर बरेचदा एका तासापासून ते तीन-चार तासांपर्यंत असतो. वेळेवर लग्न लागतच नाही आणि त्यात सगळ्यात अधिक अडचण होते ती केवळ लग्न लावण्यासाठी, अक्षता टाकण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची. त्यांन
उगाच ताटकळत बसावे लागते. केवळ स्नेहापोटी, आठाहामुळे, आदरामुळे हे लोक हातातली कामे बाजूला सारून त्या लग्नाला आलेले असतात. त्यांच्याजवळ फारसा वेळ नसतो

आणि लग्नाला आल्यावर त्यांना नवरदेव

मांडवात येण्याची वाट पाहत निष्कारण ताटकळत बसावे लागते. आता प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वी एसटी आणि रेल्वे गाड्या बरेचदा उशिराच धावत असत. त्यावेळी असे गमतीने म्हटले जायचे की एसटी किंवा रेल्वेचे वेळापत्रक केवळ ती बस किंवा गाडी किती उशिरा धावत आहे, हे समजण्यासाठीच असते. आजकाल लग्नाच्या मुहूर्ताचेही तसेच झाले आहे. लग्न किती उशिरा लागले हे कळावे एवढ्याचसाठी लग्नाचा मुहूर्त काढल्या जात असावा. खरेतर एखादा विशिष्ट मुहूर्त जेव्हा काढला जातो तेव्हा त्याचा अर्थ त्यावेळी त्या शुभकार्यासाठी ठाह-योगाचे पाठबळ वधू-वराच्या पाठीशी असते. लग्नाचा मुहूर्त काढणारे ही श्रद्धा बाळगूनच असा मुहूर्त निश्चित करीत असावेत आणि तशी त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी त्या विशिष्ट मुहूर्तावर लग्न लावलेच पाहिजे. मुहूर्तावर लग्न हा प्रकार आता केवळ ब्राह्यण समाजातच उरलेला दिसतो. त्या समाजातील लग्न नेहमीच ठरलेल्या मुहूर्तावर लागत असतात किंवा त्याच मुहूर्तावर ती लागावीत याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. वेळेचे पालन झाल्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांसाठीही ते सोयीचे ठरते. इतर समाजात मात्र वेळेचे असे काटेकोर पालन होत नाही. लग्नाला येणाऱ्या लोकांनी तो दिवस केवळ या लग्नासाठीच राखून ठेवला आहे, अशा थाटात सगळे विधी निवांतपणे सुरू असतात. त्यात नवरदेवाची मिरवणूक हा एक प्रचंड कालापव्यय करणारा प्रकार आहे. नवरदेवाची मित्रमंडळी आणि काही उत्साही आप्तेष्टदेखील नाचण्याची ही आपल्या आयुष्यातील अखेरची संधी आहे, असे समजून नाचण्याची पूर्ण हौस फेडून घेताना दिसतात. त्यात ज्याला नृत्यातले ‘अबकड’देख
ल माहीत नसते तोसुद्धा बँडवाल्याला ये गाना बजाव, वो गाना बजाव म्हणत नाचण्याच्या नावाखाली चित्रविचित्र अंगविक्षेप करीत असतो. ही सगळी मंडळी नवरदेवाकडची असल्याने मांडवात तिष्ठत बसलेल्या वधूपक्षाला वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरेचदा नवरदेवाची ही मिरवणूक रस्त्याने जाताना रहदारीचा खोळंबा होतो. नवरदेवाकडच्या या उत्साही मंडळींना आपल्या खासगी कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाशी काडीचाही संबंध नसलेल्या इतरांना उगाच त्रास सहन करावा लागतो याचीही खंत नसते. त्या मिरवणुकीत सगळेच अडाणी असतात, असे नाही, किंबहुना बरेचदा सुशिक्षित मंडळीही आपला हा मिरवणुकीचा सोस इतरांच्या अडचणी समजून न घेता भागवताना दिसतात. आपल्यामुळे रस्त्यावरील लोकांना नाहक त्रास होत आहे, याची थोडीदेखील जाणीव या लोकांना नसते, उलट तेच उपकार केल्याच्या आविर्भावात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी चिंचोळा रस्ता मोकळा करून देतात. हा सगळा प्रकार अक्षरश: शिसारी आणणारा असतो. लग्न हा उत्सवाचा सोहळा आहे, मात्र हा उत्सव साजरा करताना ज्यांचा या उत्सवाशी काही संबंध नाही त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला नको का? नवरदेव मिरवणुकीने मांडवात येणार आणि त्याला किमान दोन तास लागतील हे माहीत असेल तर लग्नाच्या ठरलेल्या वेळेच्या दोन तास आधीच मिरवणूक सुरू करायला काय हरकत आहे? आपल्या या अव्यवस्थितपणाचा, धांगडधिंग्याचा नाहक त्रास ज्यांना वेळेचे महत्त्व आहे आणि ज्यांच्यासाठी वेळ खरोखरच महत्त्वाची आहे त्यांना होतो याची जाणीव का बाळगली जात नाही? या बाबतीत नियोजित वधू-वरांनीच निर्णय घ्यायला हवा. कोणत्याही परिस्थितीत लग्न ठरलेल्या वेळेतच लागायला हवे, असे त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना ठणकावून सांगायला हवे. त्यातही बरेचदा लग्नाला उशीर नवरदेवाकडच्या मंडळीमुळेच होतो, तेव्हा त्याच
जबाबदारी अधिक असते. लग्न वेळेवर लागण्यासाठी नवरदेवच आठाही राहिला तर बरेच प्रश्न सुटू शकतील. लग्नाला निवांतपणे आलेल्या लोकांची संख्या खूप मोठी असली तरी वेळात वेळ काढून आलेल्यांची संख्याही काही कमी नसते. आपण त्यांना आठाहाने बोलवत असू तर त्यांच्या सुविधेचाही विचार आपण करायला हवा. खरेतर लग्न हा त्या दोन कुटुंबांचा वैयत्ति*क सोहळा असतो. या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांच्या आप्तस्वकीयांनाच निमंत्रण पुरेसे असते, परंतु बरेचदा लग्न सोहळ्याचा संबंध

सामाजिक प्रतिष्ठेशी जोडला जातो. कधी कधी त्यातून राजकीय शत्ति*प्रदर्शन करण्याचेही

प्रकार होतात. कुणाच्या लग्नाला किती माणसे आली, कोणकोणते नेते आले हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला जातो. वास्तविक त्याची काहीही गरज नसते. या खोट्या प्रतिष्ठेपायी पैशाची नाहक उधळपट्टी होते. अर्थात लग्नात किती खर्च करावा, हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न असतो आणि आपल्या ऐपतीनुसार त्याने खर्च करायलाही हरकत नाही. लग्नाच्या निमित्ताने लक्षभोजने महाराष्ट्राला नवी नाहीत. शंकरराव मोहित्यांकडचे लक्षभोजन असेच गाजले होते. त्यांची ऐपत होती त्यांनी ते केले; परंतु बरेचदा या बेगडी प्रतिष्ठेसाठी ज्यांची ऐपत नाही ते लोकदेखील उधार-उसणवार करून, कर्ज काढून लग्नसोहळा दिमाखदार करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याची खरोखरच काही गरज नसते. अशा लग्नामध्ये अन्नाची नासाडी हादेखील एक खूप गंभीर प्रकार आहे. आजकाल पंगतीपेक्षा ‘बुफे’ हा प्रकार अधिक रूढ झालेला दिसतो. अनेक प्रकारच्या पदार्थांचे ‘स्टॉल्स’ लागतात. त्यात जे पदार्थ अधिक चविष्ट असतात ते साहजिकच जास्त खपतात आणि इतर पदार्थ अक्षरश: वाया जातात. त्यातून अन्नाची प्रचंड नासाडी होते. अर्ध्या भारताचे एकवेळचे पोटभर जेवण होऊ शकते इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न आपल्याकडे अक्षरश: वाया जा
े. ज्या देशातील अर्ध्या लोकांना दिवसाच्या दुसऱ्या जेवणाची भ्रांत आहे, त्या देशात अन्नाची ही नासाडी कितपत समर्थनीय ठरते? थोडी सामाजिक जाणीव आपण बाळगायला नको का? आपला बडेजाव मिरवताना आपलेच लाखो देशबांधव उपाशी किंवा अर्धपोटी आहेत याचे भान आपल्याला का राहू नये? लग्नाच्या मेजवानीत मोजके पदार्थ ठेवले आणि उरलेल्या अन्नाचे काय करायचे याचे आधीच नियोजन केले तर बिघडते कुठे? आजकाल केवळ चविष्ट असतात म्हणून पोटदुखीला हमखास आमंत्रण देणारे अनेक पदार्थ टेबलवर मांडलेले असतात. त्यात प्रामुख्याने पनीरपासून बनलेल्या पदार्थांचा समावेश होतो. उन्हाळ्यात लग्न म्हणजे पिण्यासाठी थंडगार पाणी देणे आलेच. त्यासाठी बर्फाच्या लाद्या पिण्याच्या पाण्यात टाकण्यात येतात. हा अखाद्य बर्फ असतो. अशा पाण्यामुळे आणि कथित चविष्ट पदार्थांमुळे पाहुण्यांसाठी लग्नातले जेवण ‘पोटदुखी’ ठरते. आपल्याला पाहुण्यांचे पोट भरायचे असते की डॉक्टरांचे? सांगायचे तात्पर्य दोन कुटुंबांना जवळ आणणाऱ्या या मंगल सोहळ्याचे मांगल्य टिकविणे तितकेच गरजेचे असते. त्यासाठी हा सोहळा प्रदर्शन न ठरता खऱ्या अर्थाने सोहळा ठरायला हवा.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..