नवीन लेखन...

नका आत्महत्या करू; करा निसर्ग शेती !





एखादा साथीचा जीवघेणा रोग पसरावा त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पसरत चालले आहे. रोज कुठे ना कुठे एखादा शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसुद्धा ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या भावाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे तटस्थ नजरेने पाहायला लागले आहेत. जनप्रतिनिधींना, सरकारलासुद्धा या आत्महत्या गांभीर्याने घ्याव्याशा वाटत नाहीत. त्यांच्याही संवेदना गोठल्या आहेत. लाख मोलाचा जीव हकनाक जातो, परंतु त्याची कवडीभर दखलदेखील तालुका किंवा जिल्हा प्रशासनाद्वारे घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी चोरी, वाटमारी किवा अपघातासारख्या नित्याच्या आणि त्यामुळेच दुलर्क्षित होणाऱ्या बातमीसारखी ठरली आहे. गेल्या चार-पाच वर्षात जवळपास हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कुणी घेतली त्याची दखल? एक सोपस्कार म्हणून सरकार कधी तरी, पाच-पन्नास हजाराची मदत आत्महत्या केलेल्या कुठल्या तरी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना देऊन मोकळे होते. तसे ते अपघातात किंवा दंगलीत मेलेल्या किंवा विषारी दारू पिऊन मेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनाही मदत देत असते. सरकारच्या लेखी दंगलखोर आणि कर्जाच्या ओझ्याने जगणे असह्य झालेला गरीब शेतकरी एकाच पायरीवर आहे. किंबहुना त्यापेक्षाही खालच्या पायरीवर आहे, असे दिसते. जनप्रतिनिधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला तयार नाहीत. या एकूणच कमालीच्या बोथट झालेल्या समाज आणि शासन व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आत्महत्या हा पर्याय ठरू शकत नाही. तुम्ही मेलात तरी कोणाला त्याचे दु:ख होणार नाही, तुम्ही का मेलात याची साधी चौकशीही होणार नाही. तुमचे कुटुंब मात्र उघड्यावर पडेल. तुमच्या कच्च्या-बच्च्यांना दोन वेळेच्या भाकरीसाठी तरसावे लागेल. तुम्ही तर सुटाल, परंतु तुमच्यावर अवलंब
न असलेल्या तुमच्या कुटुंबाचे जगणे मरणापेक्षाही भयंकर ठरेल. त्यामुळे माझी सगळ्याच शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की, कृपया आपला जीव असा हकनाक गमावू नका. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत, ते लढूनच सोडवावे लागतात. कर्जाच्या सापळ्यात अडकल्याने जीव

नकोसा होत असेल तर जीव

देण्यापेक्षा हा सापळा दूर फेकण्याचा प्रयत्न करा. वाटते तितके ते कठीण नाही. सुरुवातीला आपण कर्जबाजारी का झालो, याचा विचार करा. आजपर्यंत तुम्ही किंवा तुमच्या बापजाद्यांनी रासायनिक शेतीच्या चुकीच्या मार्गाने वाटचाल केली. परिणामी कर्जाच्या सापळ्यात तुमची मान अडकली. तुम्ही किंवा ते केवळ अधिक उत्पादनाच्या मागे लागलात आणि ऐतखाऊंची पोटे स्वस्तात भरली. सरकारने त्यासाठी प्रोत्साहन दिले. बाजाराचे अर्थशास्त्र तुम्हाला समजलेच नाही. उत्पादन वाढले की, उत्पन्न वाढेलच या साध्या तर्काने तुमचा घात केला. हमखास खर्चाची आणि बेभरवशाच्या उत्पन्नाची शेती तुम्ही आतापर्यंत करत आलात. उत्पादन भरपूर घेतले, अगदी सरकारी गोदामात साठवायला जागा नाही, एवढे पीक तुम्ही घाम आणि रक्त गाळून पिकविले. तुमच्या पदरात काय पडले? देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि तुम्ही मात्र कायमचे कर्जदार होऊन बसले. किमान आतातरी शहाणे व्हा! उत्पादन आणि उत्पन्न याचे समीकरण समजून घ्या! उत्पादन वाढले की उत्पन्न वाढते या भ्रमात राहू नका! तुमची पीक पद्धती आमूलाठा बदलून टाका. शेतीत पैसा ओतायची गरज नाही. आपल्या काळ्या आईला केवळ कष्टाची, मेहनतीची, निढळाच्या घामाची गरज आहे. तेवढेच तिला दिले तरी तुमच्या कणग्या ओसंडून वाहतील एवढे ती तुम्हाला परत करेल. आजपर्यंत तुम्ही रासायनिक खतांच्या, विषारी कीटकनाशकांच्या व संकरित किंवा जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे विकसित बियाण्यांच्या मागे लागून तुमचा उत्पादन खर्च प्रचंड वाढवि
ा आणि कंपन्यांची घरे भरत गेलात. उत्पादन सुरुवातीला वाढले, परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न उत्पादन खर्च भरून काढण्याइतपतही नव्हते आणि आता तर उत्पादनही घटत आहे; म्हणून पुन्हा नवीन व अजूनच महागडी बियाणी तुम्ही विकत घेत आहात. हा आतबट्ट्याचा व्यवहार आता थांबायला हवा. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च शून्य असलेल्या सुभाष पाळेकरी निसर्ग शेतीकडे आता वळायलाच हवे. निसर्ग शेतीतून होणारे उत्पादन सुरुवातीला भलेही रासायनिक शेतीच्या तुलनेत कमी दिसत असेल, परंतु त्या उत्पादनातून मिळणारे उत्पन्न 100 टक्के तुमचेच असेल, कोणत्याही बँकेचे कर्ज किंवा सावकाराची देणी त्या उत्पन्नात वाटेकरी नसतील. हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविणे अतिशय कठीण आहे, याची मला कल्पना आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या डोळ्यावरची ‘प्रचंड उत्पादनाची’ झापड दूर झालेली नाही. आजही रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, संकरित बियाण्यांचा बाजार जोरात चालू आहे, परंतु कुणी तरी कुठे तरी सुरुवात करायला हवी. आभाळ फाटले आहे म्हणून ठिगळं लावायचीच नाही, असे करून चालत नाही. आपला आवाका ठिगळं लावण्याइतकाच असेल तर ती लावलीेच पाहिजेत. कुणास ठाऊक, अशा अनेक ठिगळांनी फाटलेले आभाळ कदाचित पुन्हा शिवल्या जाईलही! त्यामुळेच मी माझ्या परीने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. खास त्यासाठी दैनिक देशोन्नतीने ‘कृषकोन्नती’ ही साप्ताहिक पुरवणी सुरू केली. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करण्याच्या देशोन्नतीच्या भूमिकेमुळे रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या, बियाण्यांच्या जाहिराती मिळणार नाहीत, त्यातून बरेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, असा इशारा मला देण्यात आला होता, परंतु पैसा सर्वस्व मानणाऱ्यांपैकी मी नाही. आयुष्यात काही तत्त्व, काही सिद्धांत जोपासावे लागतात आणि या सिद्धांताचे मूल्य
ार टिकल्यांपेक्षा कितीतरी अधिक असते. ‘सर्वसामान्यांच्या वेदनेचा’ धंदा करणे मला कधीच जमले नाही. माझा विचार भूमिपुत्राच्या आणि जनसामान्यांच्या वेदनेशी सुरू होतो आणि त्यांच्या सौख्यापाशी संपतो. कोणतेही आर्थिक प्रलोभन माझ्या या विचाराला डळमळीत करू शकले नाही. त्यामुळेच लाभ-हानीचा विचार बाजूला सारीत, निसर्ग शेतीचा, हमखास उत्पन्नाच्या शेतीचा आणि विषमुक्त अन्नाचा मी विविध माध्यमातून सातत्याने प्रचार केला आणि यापुढेही करीत राहील. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला, त्यांच्या आत्महत्येला भरघोस उत्पादनातून हमखास उत्पन्नाचे मृगजळ दाखविणारी रासायनिक शेतीच कारणीभूत आहे, हे माझे ठाम मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, त्यांची आर्थिक

स्थिती मजबूत करायची असेल तर निसर्ग शेतीला पर्याय नाही,

या विचाराचा मी हिरीरीने प्रचार केला. या क्षेत्रातील सुभाष पाळेकर, मनोहर परचुरे, राम कळसपूरकर यासारख्या मित्रांच्या मदतीने मेळावे, चर्चासत्र आयोजित केले. शेतकऱ्यांनी या लोकांचे म्हणणे नीट समजून घ्यावे. ही मंडळी केवळ पुस्तकी पांडित्य शेतकऱ्यांना सांगत नाहीत. त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष प्रयोगाची पृष्ठभूमी लाभली आहे. ज्या मालाचा उत्पादन खर्च शून्य आहे, त्या मालाच्या विक्रीतून मिळणारा पैसा, मग तो कितीही कमी असला तरी नफ्याचाच ठरणार, हे साधे तत्त्व तितक्याच सरळ भाषेत ही मंडळी सांगत आहे. कर्जाचा बोजा असह्य झाल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी निसर्गशेतीच्या पर्यायाचा जरूर विचार करावा. खरेतर शेती नफ्याची करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. खेड्यापाड्यात लोकं उघड्यावर मलविसर्जन करतात, त्यापेक्षा चराचे संडास बांधले व शौच्य विसर्जनानंतर त्यावर माती टाकली तर केवळ स्वच्छतेच्याच नव्हे तर शेत
साठी खताच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल. तुकडोजी महाराजांनी आपल्या ठाामगीतेत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. महाराजांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या गुरुदेव सेवामंडळाच्या कार्यकर्त्यांनी खंजिरी भजनात अडकून न पडता महाराजांचा खेडी समृद्ध करणारा उपदेश कृतीद्वारे गावागावात पोहचवायला हवा. त्यासाठी प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करायला हवी. काही आदर्श ठााम तयार करायला हवी. शेतकऱ्यांच्या उन्नतीला प्रक्रिया उद्योगाचा मोठा हातभार लागू शकतो. तुरीपासून तुरीची डाळ, टोमॅटोपासून सॉस, मिरचीची पावडर असे आणि अशाचसारखे मूल्य संवर्धनाचे बिनखर्चाचे प्रक्रिया उद्योग खेड्यापाड्यात सुरू व्हायला पाहिजेत. गांडूळ खताची वेगळी निर्मिती न करता शेतातच गांडुळाची निर्मिती कशी करता येईल, त्या दृष्टीने पाळेकरांच्या मार्गदर्शनानुसार जीवामृताचा कसा वापर करावा, हे देखील शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागेल. एखाद-दुसऱ्याच्या प्रयत्नाने हे शक्य होणार नाही. सुरुवात झाली आहे. आता याचा प्रसार व्यापक करण्यासाठी अनेकांचा हातभार लागायला हवा. शिक्षकांची भूमिकाही या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. आज भारतातून महारोग आणि पोलिओचे जवळपास निर्मूलन झाले आहे. या कार्यात शिक्षकांचे योगदान निश्चितच अमूल्य असेच आहे. आता शिक्षकांनी आपल्या शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी, त्यांचा लाखमोलाचा जीव हकनाक वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पाळेकरांचा निसर्ग शेतीचा संदेश पोहोचवावा. पाळेकरांची व्याख्याने आयोजित करावीत. कुटुंब नियोजनाचा प्रचार खूप झाला, आता कुटुंब कल्याणाचा विचार व्हायला पाहिजे. रोटरी, लाॅयन्ससारख्या सेवाभावी संघटनांनीदेखील ठाामीण भागात आपल्या कार्याचा विस्तार करावा. त्यांची खरी गरज ठाामीण भागातच आहे. सेंद्रीय शेतीचा व्यापक प्रचार व प्रसार झाल्यास शहर
बांधवांना विषमुक्त अन्नधान्यसुद्धा मिळेल. आम्ही आमच्या परीने जेवढे करता येईल तेवढे करीत आहोतच, तुम्हीही मदतीला या, तुम्हाला काय लागेल ती मदत देण्याची आमची तयारी आहे. सरकारदरबारीही आमचे भांडण सुरू आहे. त्याचीच परिणती म्हणून ‘यशदा’ सारख्या संस्थेला नीती निर्धारण करण्याचे काम सोपविण्यात आले. न्यायालयातही आमचा संघर्ष सुरूच आहे. देशोन्नतीचे मुख्य कार्यालय असलेल्या निशांत टॉवरमध्ये शेतकरी मदत केंद्रदेखील आम्ही सुरू केले आहे. इथे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे योग्य मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था केली आहे.
शेतकरी सांत्वना निधीदेखील आम्ही उभारत आहोत. हे प्रयत्न एकूण आव्हानाच्या तुलनेत तोकडे असल्याची आम्हाला जाणीव आहे. खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज हे सुद्धा आत्महत्यांच्या मुळाशी आहे. केवळ आपल्याकडे पैसे आहेत व समोरचा अडलेला आहे म्हणून सवाई, दिडी किंवा दामदुप्पटीने कर्ज देणे, अडलेल्या शेतकऱ्याची जमीन हडपण्याच्या उद्देशानेच खरेदी करुन घेणे हा निचपणा आहे. सावकारांनो हे सोडा, माणुसकीची कास धरा, तळतळाट घेऊन व्यवहार करणे सोडा, अन्यथा एक दिवस तुमचाही समाचार घ्यावाच लागेल, एवढाच इशारा! कर्जाच्या ओझ्याने जर्जर होऊन स्वत:ला संपविणारा शेतकरी जसा मला अस्वस्थ करीत आहे, तसेच तुम्हीही गंभीर होणे गरजेचे आहे. त्याला या आत्मघातापासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, या जाणिवेतून शक्य होईल तेवढे प्रयत्न आम्ही करत आहोत. गरज आहे ती मदतीचे हजारो हात पुढे येण्याची. आपल्याला समजून घेणारे, आपले दु:ख जाणून घेणारे कोणी नाही, ही भावना शेतकऱ्यांमध्ये बळावत आहे. त्यातूनच त्यांचा मानसिक धीर खचत आहे. अशा परिस्थितीत आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी आपण उभे राहायलाच हवे. त्यांच्या दुरवस्थेची कारणे त्यांना समजावून योग्य मार्गदर्शन आणि प्रसंगी मद
तीचा हात आणि खंबीर पाठींबा आपण द्यायलाच हवा. या शेतकरी बांधवांना आम्ही कृतीतून हा संदेश द्यायला हवा, की तुमचा जीव केवळ तुमच्याचसाठी नाही तर आमच्यासाठीही लाखमोलाचा आहे, तो असा हकनाक गमावू नका! तुमची दु:खं ही आमचीसुद्धा आहेत, तुमच्या वेदना ह्या आमच्याही आहेत. स्वत:ला उपेक्षित समजू नका, मदतीची हाक द्या, मदतीसाठी हजारो हात समोर येतील!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..