नवीन लेखन...

निष्ठेची किमत!





जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या खोट्या प्रतिष्ठेसाठी खुंटीवर टांगून ठेवल्या जाणाऱ्या तत्त्वांमध्ये निष्ठेचा क्रमांक बराच वरचा लागतो. विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात तर अलीकडे निष्ठेचे सारे संदर्भच बदलले आहेत. कोण आपली निष्ठा केव्हा कोणाच्या पायी अर्पण करेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ”कोणाच्याही निष्ठा दोघांच्या ठायी असू शकत नाहीत. प्रत्येक व्यत्त*ी एक तर एकाचा दुस्वास करेल अन् दुसऱ्यावर प्रेम करेल किंवा ती एकाप्रती समर्पित असेल अन् दुसऱ्याचा तिरस्कार करेल.” प्रभू येशू ख्रिस्तांनी हे विधान केले, तेव्हा भारतात लोकशाही प्रणालीचा जन्म व्हायचा होता. त्यांनी जर भारतातील आजचे राजकारण अनुभवले असते तर हे विधान नक्कीच केले नसते. कपडे बदलावे तेवढ्या सहजतेने निष्ठा बदलणाऱ्या माणसांची आज भारतीय राजकारणात अजिबात वाणवा नाही. अर्थात, निष्ठा बदलल्यास त्याचे फळ मिळत असल्यामुळे आणि त्या फळापोटी खोटी प्रतिष्ठा, मानमरातब, धनसंपत्ती लाभत असल्यानेच अशा लोकांचे अलीकडे मोठे पीक आले आहे. अशा लोकांना ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ या बिरुदाने हिणवल्या जाण्याचे दिवस तर केव्हाच मागे पडले, उलट आजकाल असे लोक इतरांचे आदर्श बनायला लागले आहेत. यावेळी नमनालाच निष्ठेचे घडाभर तेल जाळण्याचे कारण म्हणजे पंधराव्या लोकसभेची निवडणूक! विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत राजकारणात निष्ठेची कशी किंमत केली जाते, याची चुणूक दिसली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात निवडणुकीच्या त
ंडावर निष्ठा बदलणाऱ्या हरिभाऊ राठोडांना निष्ठा बदलण्याचे बक्षीस मिळाले आहे, तर उत्तमराव पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला निष्ठावंत राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसच्या रूपाने ‘पुरस्कार’

लाभला आहे! तिकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातही

नाना पटोलेंसारख्या निष्ठावंत, संवेदनशील, मतदारांप्रती समर्पित नेत्याचाही पक्षातून निलंबित करून ‘गौरव’ करण्यात आला आहे!! पतीपतेला धोंडा अन् वेश्येला मणिहार, या मराठी भाषेतील म्हणीचे अशावेळी आपसुकच स्मरण होते.
काय चुकले होते उत्तमराव दादांचे, की त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली? काय चुकले होते त्यांचे, की त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली? तब्बल सात वेळा यवतमाळ मतदारसंघातून निवडून येण्याएवढा जनाधार त्यांना प्राप्त होता, ही त्यांची चूक होती का? की त्यांनी उमेदवारी नाकारल्याबरोबर दुसरा घरठाव केला नाही, बंडखोरी केली नाही, ही चूक होती? की त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भागांत, त्या मतदारसंघातील काँठोस उमेदवाराच्या प्रचाराचे काम सुरू केले होते, हा त्यांचा गुन्हा होता? एक माणूस ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय गणिते मांडून केवळ वैयत्ति*क स्वार्थासाठी तुमच्या पक्षात येतो अन् तो तुम्हाला तो एवढा गोड होतो की त्याला लगेच उमेदवारी मिळते! त्यासाठी तब्बल सहा वेळा त्या मतदारसंघातून निवडून येण्याचा भीमपराक्रम करणाऱ्या व्यत्त*ीला चक्क डावलल्या जाते!! हीच का निष्ठेची किंमत? आणि निवडणूक जवळ येताबरोबर तुमच्या पक्षाचा पुळका येणाऱ्या व्यत्त*ीची कर्तबगारी ती काय? तुमचे सरकार अडचणीत असताना तत्त्वं, निष्ठा खुंटीवर टांगून ठेवीत त्याने तुम्हाला मदत केली, हीच ना? आणि कशासाठी केली मदत? तुमच्या पक्षाबद्दल फार पुळका आला म्हणून? तुमच्या पक्षाची ध्येयधोरणे, तत्त्वं अचानक खूपच आव
डायला लागली म्हणून? अजिबात नाही! त्यांनी निष्ठाबदलण्याचे एकमेव कारण हे होते, की मतदारसंघ फेररचनेच्या पृष्ठभूमीवर, ते आधी होते त्या पक्षात राहून त्यांचा वैयत्ति*क स्वार्थ साधल्या गेला नसता. फेररचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा मित्रपक्ष दावा सांगणार आणि तो मान्य केला जाणार, याची राजकीय गृहीतके पक्की असलेल्या हरिभाऊ राठोडांना पूर्ण कल्पना आली होती आणि त्यामुळेच त्यांनी निष्ठा बदलली, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ सत्य आहे. उद्या काँठोसमध्ये आपला स्वार्थ साधल्या जात नाही याची खात्री झाल्यास ते आणखी तिसरा घरठाव करणार नाहीत, याची हमी ती काय? यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जे उत्तमराव दादांसोबत काँठोसने केले, ते भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंसोबत काँठोस व राठ्रवादी काँठोस या दोन मित्रपक्षांनी एकत्रितरित्या केले. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराचे कुटुंब अवैध सावकारी करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडीत असताना त्याच पक्षाचा दुसरा आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चक्क आमदारकीला लाथ मारतो! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे घडले असते तर महाराजांनी नक्कीच हातातील कडे नाना पटोलेंच्या हातात घातले असते अन् ज्या मुद्द्यावर पटोलेंना राजीनामा द्यावा लागला, त्या मुद्द्यासंदर्भात दोषी असलेल्यांना कोडे मारले असते. आमचे दुर्दैव हे आहे, की ती शिवशाही होती अन् ही लोकशाही आहे. इथे शिवशाहीचा उपयोग केवळ निवडणुकीच्या प्रचारापुरता असतो, शिवजयंतीला मिरवणुका काढण्यापुरता असतो, दूरचित्रवाणीसाठी मालिका तयार करून किंवा चित्रपट काढून गल्ला जमविण्यापुरता असतो! वास्तविक पटोलेंच्या रूपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला, अभ्यासू, निष्ठावंत नेता गमाविण्याऐवजी काँठोस व राठ्रवादी काँठोसने थोडे समजदा

ीने घेतले तर भागले असते. नाना पटोलेंचा लाखांदूर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत गडप झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राठ्रवादी काँठोसतर्फे निवडणूक लढवित असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची अद्याप तीन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे राठ्रवादी काँठोसने हा मतदारसंघ काँठोससाठी सोडला असता किंवा तो काँठोसने मागून घेतला असता तर नाना पटोलेंचे सहज राजकीय पुनर्वसन करता आले असते. तसे झाल्यास इथे निष्ठेची हीच किंमत होते, हा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला नसता. उल्लेखनीय म्हणजे, ही समजदारी काँठोस व राठ्रवादी काँठोसने रामदास आठवले आणि डॉ. राजेंद्र गवई या रिपब्लिकन

पक्षांच्या नेत्यांसाठी दाखवली आहे. यापूर्वी राठ्रवादी काँठोसच्या वाट्याची जागा लढविलेले रामदास आठवले

यावेळी काँठोसच्या वाट्याची जागा लढवित आहेत, तर काँठोसच्या वाट्याची जागा लढवित आलेल्या रा.सू. गवईंचे चिरंजीव असलेले डॉ. राजेंद्र गवईंनी यावेळी राठ्रवादी काँठोसच्या वाट्याची जागा लढविली आहे. काँठोस व राठ्रवादी काँठोस या दोन्ही पक्षांना मित्रपक्षांसाठी दाखविलेली हीच समजदारी दोनपैकी एका पक्षाच्या अभ्यासू नेत्यासाठी का दाखविता आली नाही? का त्याला बंडखोरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि अखेर निलंबित करण्यात आले? अर्थात, हा विषय काही केवळ काँठोसपुरताच मर्यादित नाही. ही लागण सर्वच पक्षांना झाली आहे. उडदामाजी काय निवडावे काळे-गोरे, हाच प्रश्न आहे! उत्तमराव पाटील आणि नाना पटोले या दोघांच्या संदर्भात जे काही झाले त्याला आणखी एक कंगोरा आहे. पाटील आणि पटोले हे दोघेही बहुजन आहेत. कुणबी समाजाचे आहेत. (स्वत:ला मराठा, पाटील, देशमुख, पंचकुळी, शहाण्णव कुळी म्हणविणारे सर्वच कुणबी आहेत, ही माझी वैयत्ति*क धा
णा आहे, जी मी वेळोवेळी जाहीर केली आहे आणि त्या धारणेनुसारच मी येथे कुणबी हा शब्द वापरला आहे.) विदर्भात हा समाज बहुसंख्य आहे; मात्र दुर्दैवाने या समाजाचे नेतृत्व विभागलेले आहे. या समाजातील सारेच स्वत:ला सिंह समजतात आणि त्यामुळे इतर सर्वांनी माझी पाठराखण करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परिणामी संपूर्ण समाज विखुरलेला आहे आणि याची जाणीव असल्यामुळेच एवढ्या मोठ्या समाजातील दोघा शत्ति*शाली नेत्यांना एकाच निवडणुकीत अशी वागणूक देण्याचे धारिष्ट्य केल्या जाते. पश्चिम महाराठ्रात अशी हिंमत दाखविता येत नाही; कारण तेथील कुणबी समाज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे. अर्थात त्यासाठी पवारांनीही तशी तपश्चर्या केली आहे. ते नेहमीच म्हणत असतात, ”मी पाच वर्षे काम करतो, म्हणून लोक निवडणुकीच्या काळात एक महिना माझे काम करतात.” त्यांना निवडणुकीच्या काळात वैयत्ति*करित्या कधीच त्यांच्या मतदारसंघात ठाण मांडून बसावे लागत नाही; कारण त्यांचे काम बोलत असते. पश्चिम महाराठ्राने त्यांच्या नेतृत्वाखाली न भुतो, न भविष्यती असा विकास साधून घेतला आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून कधीकाळीच्या माळरानांवर त्यांनी विकासाची नंदनवने फुलविली आहेत. त्यामुळे त्यांचा असा दबदबा निर्माण झाला आहे, की ते कोणाचेही राजकीय आयुष्य घडवूही शकतात अन् बिघडवूही शकतात. त्या दबदब्यामुळे दिल्लीश्वरांना त्यांच्या मर्जीशिवाय पश्चिम महाराठ्रात एखाद्याचा ‘नाना पटोले’ किंवा ‘उत्तमराव पाटील’ करता येत नाही. विदर्भात असे जाणीवपूर्वक होऊ दिल्या गेले नाही; कारण पश्चिम महाराठ्रात एक शरद पवार निर्माण होताबरोबर दिल्लीश्वरांची त्या भागात मर्जी चालेनासी झाली. हे त्या भागात प्रथमच घडले असे नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी त्याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला अन् प्रथम विजापूरकरा
ची व नंतर दिल्लीश्वरांची मर्जी चालेनासी झाली. शिवाजी महाराजांपूर्वी त्या भागातील कुणबी समाजही सध्याच्या विदर्भातील कुणबी समाजाप्रमाणेच विखुरलेला होता. कोणी दिल्लीपतीच्या, कोणी विजापूरकरांच्या तर कोणी अहमदनगरकरांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्या होत्या. त्यांच्या मनगटातील जोर अन् तळपत्या समशेरींच्या बळावर मोगल, आदिलशहा, निजामशहा आपापले बळ, प्रदेश, संपत्ती वाढवित होते आणि वेळ पडल्यास त्यांनाच हत्तीच्या पायी देत होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना परक्यांऐवजी स्वकीयांशी एकनिष्ठ राहायला शिकवले तेव्हा त्यांनी त्याकाळी कोणी स्वप*ातही विचार केला नसेल, असे हिंदवी स्वराज्याचे स्वप* साकारले. विदर्भातील कुणबी समाज या इतिहासापासून आता तरी काही धडा घेणार आहे काय? आता तरी थोडे आत्मचिंतन करणार आहे काय?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..