नवीन लेखन...

पुराणातील दाखले आणि स्वैराचाराला प्रोत्साहन!





आधुनिकतेच्या नावाखाली नपुंसक बियाणे या देशाच्या
माथी मारली जात आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला कायमचे दरिद्री, परावलंबी ठेवण्याचे षडयंत्र अंमलात आणले जात आहे. दुर्दैवाने या षडयंत्राला सरकारचादेखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. हे षडयंत्र केवळ शेतीपुरते मर्यादित नाही. त्या लोकांना इथल्या शेतीचीच केवळ माती करायची नसून, इथली सभ्यता, इथली संस्कृती, इथले अर्थशास्त्र आणि शेवटी इथल्या माणसाचा स्वाभिमान कायमस्वरूपी मातीत मिसळायचा आहे. हे आक्रमण चारही बाजूंनी होत आहे.

एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने आपण विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवल्याची खुली कबुली दिल्यामुळे सरकारने तिच्याविरूद्ध नैतिक गैरवर्तनाच्या कारणावरून गुन्हे दाखल केले. त्या संदर्भातील निकाल रोखून ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने लग्न न करता स्त्ति-पुरुषाने एकत्र राहण्यात गैर काय आहे, अशी पृच्छा करीत, ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ला एकप्रकारे मान्यता असल्याचेच स्पष्ट केले. आपले म्हणण्याला नैतिक आधार असल्याचे सांगताना न्यायालयाने पुराणातील राधा-कृष्ण संबंधांचा दाखला दिला. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल अजून दिलेला नाही आणि हे जे भाष्य केले आहे ते केवळ मौखिक असले तरी कायद्याचा अन्वयार्थ लावणारी सर्वोच्च संस्था म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिले जाते, हे ध्यानात घ्यावेच लागेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशाने न्यायासनावर बसून केलेले वत्त*व्य, मग ते मौखिक असले तरी तितकेच गंभीर मानावे लागेल. लग्नाचे बंधन न मानता पती-पत्नीसारखे सोबत राहणे म्हणजेच ‘लिव्ह इन रिलेशनशीप’; हा प्रकार आपल्याकडे अलीकडच्या काळात फोफावत आहे आणि ही पाश्चात्यांचीच देण आहे. राधा-कृष्णाचा दाखला देऊन अशाप्रकारच्या संबंधांना ‘भारतीय’ ठरविण्याचा प्रकार अतिरंजीत म्हणायल
हवा. पुराणातील अशाच दाखल्यांचा सर्रास वापर करायचे झाल्यास, मग पुढे पाच पतींचा स्वीकार करणारी द्रौपदी येऊ शकते, सोळा सहस्त्र बायका असलेला कृष्ण केवळ राधेपुरता मर्यादित राहणार नाही, शंभर पूत्रांना जन्म देणारी गांधारी आदर्श ठरू शकते

आणि केवळ भारतीय पुराणच कशाला

माता मेरीचे उदाहरण समोर करून कुमारी मातांचेही समर्थन केले जाऊ शकते. पुराणातील दाखल्यांचा आधुनिक संदर्भात असा वापर खूप धोकादायक ठरू शकतो. कुठलीही जबाबदारी न स्वीकारता केवळ मौजमजेसाठी एकत्र येण्याला अशाप्रकारे सभ्यता प्रदान करण्यात आली तर समाज नावाची व्यवस्थाच उध्वस्त होण्याची भीती आहे. आपल्या संस्कृतीत विवाह म्हणजे दोन शरीरांचं मिलन नसून दोन मनांचं आणि दोन कुटुंबांचं व दोन संस्कृतींच मिलन समजलं जातं. लग्नविधीत मनावरही संस्कार घडवले जातात. आपण ज्या व्यक्तीशी विवाह करणार आहोत, तिच्यातील गुणदोषांसह तिला आणि तिच्या कुटुंबाला आपलेसे करणार असतो. त्याचबरोबर मुलासाठीही लग्नसंस्कार हे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे असतात. या उलट लिव्ह इनमध्ये क्षणिक सुखासाठी या सर्व गोष्टी दुय्यम मानल्या जातात. ज्या गोष्टींसाठी भारताचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे, त्या संस्कृतीलाच पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने गालबोट लागणं आपल्याला शोभणारं नाही. न्यायमुतर्चिा संपूर्ण आदर बाळगून असे म्हणावेसे वाटते की न्यायाधीश महोदयांनी राधा-कृष्णाचा दिलेला संदर्भ अतिशय चुकीचा आहे. राधा-कृष्णाच्या जीवनकार्याची तुलना इतक्या उथळ स्वरूपात व्हायला नको होती. भारतीय पुराणात व्यत्त* होणाऱ्या या प्रेमकथेत खरेतर अनासत्त*, पवित्र संबंधांचा आदर्श समोर ठेवण्यात आला आहे. कुठल्यातरी उठवळ नटीच्या लफड्यांची तुलना थेट राधा-कृष्णाशी व्हायला नको होती. नैतिकता किंवा नैतिक मूल्ये व कायदा यांची गल्लत ह
ता कामा नये, जे कायदासंमत असेल व नैतिकता व नीतिमत्ता यांच्या विरोधी असेल, त्याला समाजजीवनात स्थान असावे की नाही, हा मूळ प्रश्न आहे. पुराणकालीन संदर्भासह विचार करायचा झाल्यास मग इतरही अनेक चुकीच्या बाबींचे समर्थन करता येऊ शकते. द्रौपदीचे उदाहरण वर दिलेलेच आहे. परंतु अशा पौराणिक दाखल्यांचा संदर्भ देताना केवळ सोईपुरता भाग लक्षात घेता येणार नाही. केवळ ‘राधा-कृष्णा’चे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ विचारात घेऊन चालणार नाही. त्या संबंधात आत्म्याचा अलिप्तता होती, तद्वतच पवित्रताही होती. सर्वार्थाने त्या लीला देहातीत होत्या. त्यात शारीरिकतेचा लवलेश नव्हता. विकार व वासनारहित प्रेमाचे असे अप्रतिम प्रतीक अन्यत्र पाहावयास मिळत नाही. राधा-कृष्णाने जपला तसा वासनविरहित आणि कामनिरपेक्ष स्नेहसंबंध स्थापन झाल्यावाचून मानवी समाजाच्याच नव्हे तर लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनेही स्त्रा व पुरुष एकत्र कार्यच करू शकणार नाहीत व दोघांच्याही भूमिका सदोषच राहतील. सहनागरिकत्वाच्या व समतेच्या भावनेचा व
संसंस्कृत नागरिकत्वाचा (म्हणजेच सिव्हीलायझेशनचा) विकासच होणार नाही. मानवी संबंधांना व मनाला शारीरिक व नैसगिर्क सीमेपलीकडे नेऊन एकरूपता निर्माण करणे, हेच राधा-कृष्णाचे जीवनकार्य होते. त्यात वासना, अगर प्रभुत्व भावना नव्हती. ते फक्त एकत्र राहणे नव्हते. नैतिकता व नीतिमत्ता आणि कायदा यांची क्षेत्रे वेगळी आहेत आणि म्हणूनच बरेचदा नीतिमत्तेच्या दृष्टीने अयोग्य असलेले कृत्य कायद्याच्या दृष्टीने वैध ठरते. परंतु कुठेतरी या दोहोंचाही मेळ घालावा लागणार आहे. भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंब ही एक आदर्श प्रणाली आहे. कुटुंबातच नैतिक शिक्षणाचे पाठ दिले जातात आणि एकूण समाजाची सभ्यता टिकविण्यासाठी हे पाठ आवश्यक ठरतात. सहजीवनातील नैतिकता याच कुटुंब संस्थेने टिकवून ठेवली आह
े, परंतु आता या कुटुंब संस्थेवरच घाला येऊ पाहत आहे. कुटुंब संस्था संपली तर पशू आणि माणसात भेद उरणार नाही. कुटुंबसंस्था व कौटुंबिक भावना संपली तर मग *अनाथाश्रम* व *वृद्धाश्रम* आणि वेश्यालये, हीच आश्रयस्थाने उरतील. सध्या आपली जी काही वाटचाल सुरू आहे ते पाहता, या देशाचे सर्वांगिण खच्चीकरण करण्याच्या काही विदेशी शत्त*ींच्या प्रयत्नांना फळ येऊ लागल्याचे दिसते. विदेशी बी-बियाण्यांबद्दल नेहमीच चर्चा होते. आधुनिकतेच्या नावाखाली नपुंसक बियाणे या देशाच्या माथी मारली जात आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला कायमचे दरिद्री, परावलंबी ठेवण्याचे षडयंत्र अंमलात आणले जात आहे. दुर्दैवाने या षडयंत्राला सरकारचादेखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पाठिंबा

आहे. हे षडयंत्र केवळ शेतीपुरते मर्यादित नाही. त्या लोकांना इथल्या

शेतीचीच केवळ माती करायची नसून, इथली सभ्यता, इथली संस्कृती, इथले अर्थशास्त्र आणि शेवटी इथल्या माणसाचा स्वाभिमान कायमस्वरूपी मातीत मिसळायचा आहे. हे आक्रमण चारही बाजूंनी होत आहे. वेगवेगळ्या ‘डे’चे वाढणारे फॅड, तरूण-तरूणींना स्वैराचारास उद्युत्त* करणारे छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कार्यक्रम, चित्रपट आणि आता त्याहीपुढे जाऊन ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’! या सगळ्या प्रकारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा पडद्याआडून जो प्रयत्न चालला आहे तो पाहता निकट भविष्यातच या देशाचा पाया मूळासकट उखडण्याची दाट शक्यता आहे. वेळीच सावध झालो नाही आणि आधुनिकतेच्या नावाखाली या देशाला उद्ध्वस्त करणारे हे वादळ परतवून लावले नाही तर भारत माझा देश होता, हे म्हणावे लागण्याचे दिवस दूर नाही; कारण म्हटलेच आहे, की

If you lost wealth, you lost nothing ,if you lost health, you lost something, but if you lost character, you lost everything.

<
br>


>

<
br>


>

r>

r>

r>

r>

r>

ऱ्

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..