नवीन लेखन...

मुंबईला मुंबईच राहू द्या




आपल्या राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या कल्पनाशत्त*ीचा विकास फारच कुंठित झाला आहे. कुठलाही नवा म्हणून जो विचार हे लोक समोर मांडतात मुळात ती कुठलीतरी उचलेगिरी असते. सध्या भारतात चिनी वस्तूंचा बराच बोलबाला आहे. ही आवक केवळ वस्तूंपुरती मर्यादित नाही. आम्ही विचारही चीनमधूनच आयात करत असतो. ‘सेझ’ची कल्पना आम्ही चीनमधूनच उचलली. मुंबईला चकाचक करायचे असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे असेल तर आमच्या डोळ््यांसमोर शांघायच उभे राहते. तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथले पर्यावरण, तिथल्या लोकांची मानसिकता, तिथले प्रशासन कशा कशाचीच तुलना भारतासोबत होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तिथे रुजलेला, तिथे फोफावलेला विचार इथेही फोफावेल ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे. अर्थात कोणत्याही विचाराला भौगोलिक सीमांचे बंधन असू शकत नाही. विचारांचे पेटंट घेण्याची पद्धत अद्याप रूढ झालेली नाही हे सत्य असले तरी या विचारांना जेव्हा कृतीची जोड द्यायची असते तेव्हा मात्र बाकी सगळ््या गोष्टींचा विचार करणे भाग पडते. अशा वेळी शांघायला डोळ््यांसमोर ठेवून मुंबईचा विचार करता येणार नाही. मुंबईची रचना, मुंबईच्या समस्या खूप वेगळ््या आहेत. कुठल्याही उधार कल्पना मुंबईत राबविता येणे शक्य नाही आणि सुरुवात नेहमी शून्यापासून करावी लागते हेही विसरता येणार नाही. एकवेळ विकासाला गती मिळाली की मग भलेही पुढचे प्रारूप निश्चित करताना काही आदर्श समोर ठेवता येतील; परंतु सुरुवात सध्या मुंबई जिथे आहे तिथूनच करावी लागेल. मुंबई भलेही आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर नसेल परंतु ते आज आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे केंद्र आहे हे निश्चित. आज हजारो विदेशी लोक रोज मुंबईत येतात. ते सगळेच पर्यटक असतात असे नाही. त्यांच्यात उद्योजक असतात, व्यावसायिक असतात, मुंबईत गुंतवणूक करू पाहणारे असतात. मुंबईचे शांघाय

होईपर्यंत ते लोक वाट पाहणार नाही आणि जागतिकीकरणाच्या या युगात आम्हांला विदेशी

गुंतवणुकीची गरज नाही असे म्हणणेही योग्य

ठरणार नाही. या लोकांच्या माध्यमातून जितके अधिक विदेशी चलन देशाच्या तिजोरीत जमा होईल तितके आपल्याला हवेच आहे. मुंबईतला सामान्य माणूस तर नाक मुठीत धरून जसे जगता येईल तसे जगतच आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. परंतु आमची मुंबई अशीच असे म्हणून आपण या विदेशी पाहुण्यांचे स्वागत करणार आहोत का? मुंबईचे रंगरूप बदलायलाच हवे. त्याचा लाभ सामान्य मुंबईकरांना तर होईलच, शिवाय मुंबईचा चेहरामोहराही आंतरराष्ट्रीय दर्जाचा होईल. मुंबईची दुरवस्था टाळण्यासाठी एकदम खूप मोठे प्रकल्प राबविण्याची गरज नाही. ते काम पुढे करता येईल. सुरुवात अनेक साध्या साध्या गोष्टीपासून होऊ शकते. साधा मुंबई विमानतळाचा विचार केला तर हे लक्षात येते की, वाढत्या हवाई वाहतुकीला सामावून घेण्याची मुंबईच्या सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता अपुरी पडत आहे. धावपट्टी मोकळी होण्याची वाट पाहत कित्येक विमानांना हवेतच घिरट्या घालाव्या लागतात. दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकच बिकट होत जाणार. त्याचवेळी मुंबईतील रस्तेवाहतुकीची समस्याही उठारूप धारण करत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईबाहेर प्रशस्त जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्याची गरज आहे. नव्या मुंबईतील पनवेल किंवा कोपरखैरणेजवळ तशी जागा उपलब्ध आहे, तसा प्रस्तावही आहे. या कामाला गती मिळाली पाहिजे. एक आदर्श आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईची गरज आहे. तशा गरजा खूप आहेत; पण जागतिकीकरणाच्या वावटळीत मुंबईचे महत्त्व आणि मुंबईची शान टिकविण्यासाठी नवा अत्याधुनिक विमानतळ उभा होणे गरजेचे आहे. हे विमानतळ उभे झाल्यानंतर सध्याचे सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय वाहतुकीसाठी वापरण्यात यावे आणि सांताक्रू
विमानतळाचे रूपांतर आंतरराज्यीय लक्झरी बसवाहतुकीसाठी आदर्श बसस्थानकात करावे. फारशी मोडतोड न करता हे सगळं करता येईल. सध्या दादरला लक्झरी बसेसची खूप गर्दी होते. ही सगळी गर्दी सांताक्रूझला वळवता येईल. तिथे लंडनच्या तोडीचे बसस्थानक उभे करता येईल. बसस्थानक म्हटले की घाणरडे, गर्दीने गजबजलेले, अव्यवस्थित असलेच पाहिजे का? प्रवाशांसाठी ओरडत फिरणारे खासगी बसचे एजंट, त्यांच्यात प्रवासी मिळविण्यासाठी होत असलेली जीवघेणी धडपड, चालत्या बसला लटकणारे प्रवासी हे चित्र आपल्याकडील व्यवस्थितपणाची लत्त*रे वेशीवर टांगणारेच नसते का? हे चित्र किमान मुंबईपुरते तरी नक्कीच बदलता येईल. या सगळ््या खासगी लक्झरी बसेससाठी सांताक्रूझला प्रशस्त स्थानक उपलब्ध होईल. शिवाय तिथून केवळ राज्याबाहेर जाणाऱ्या किंवा लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्यास बसस्थानकावर होणारी अतिरित्त* गर्दीही टाळता येईल. तसेच विमानातून येणाऱ्या प्रवशांकरिता तेथूनच शहराच्या व राज्याच्या विविध भागांतून जाणाऱ्या वातानुकूलित बसेस सोडल्यास ती एक फार मोठी क्रांती ठरेल. अर्थात हे खूप साधे, सामान्य उपाय आहेत. कदाचित विमानतळाचे रूपांतर बसस्थानकात करण्याची कल्पना एखाद्याला हास्यास्पदही वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु आज ना उद्या हीच कल्पना व्यवहार्य ठरेल यात शंका नाही. साधे बसस्थानकही विमानतळाच्या दर्जाचे आधुनिक आणि चकचकीत करण्याचा विचार जोपर्यंत आमच्या मनात जन्म घेत नाही तोपर्यंत मुंबईचा बकालपणा कायमच राहणार. मुंबई खऱ्या अर्थाने ‘गेट वे ऑफ इंडिया’ आहे. भारत पाहायचा असेल तर तो मुंबईत पाहा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भारतात पहिले पाऊल ठेवणाऱ्या परदेशी व्यत्त*ीला भारताचे हे प्रातिनिधिक दर्शन सुखावह वाटायला हवे आणि त्यासाठी मुंबईला एकदम शांघाय करण्याची गरज नाही. मुंबईला मुंबई
च राहू द्या. तिचे ‘मुंबईपण’ हेच तिचे खास वैशिष्ट्य आहे. या खास वैशिष्ट्याला जपतच मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी खूप काही करता येईल. साध्या सॅनेटरीची सोय करण्यासाठी आम्हांला शांघायचे उदाहरण समोर ठेवण्याची गरज नाही. एका आकडेवारीनुसार आजही मुंबईत जवळपास सतरा लाख लोकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. ते उघड्यावरच मलविसर्जन करतात. ज्या प्रमाणात मुंबईची लोकसंख्या फुगत आहे त्या प्रमाणात या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत.

या वाढत्या लोकसंख्येचा ताण सहन करण्याची मुंबईची क्षमता आता संपुष्टात आली

आहे. त्यामुळे मुंबईला स्वतंत्र दर्जा देऊन व मुंबईत प्रवेशासाठी स्वतंत्र पारपत्त किंवा तत्सम व्यवस्था करून मुंबईकडे वाहणारा लोकांचा लोंढा थोपवावाच लागेल. मुंबईतील लोकांचा लोंढा थोपवायचा असेल तर राज्याची राजधानी मुंबईबाहेर नागपूरला हलवावी, किमान राज्यमंत्री तरी नागपूरला बसवावेत हा विचार मी मागच्याच ‘प्रहार’मध्ये मांडला होता. असे अनेक उपाय योजता येतील. मुंबईच्या वैभवात भर घालून ती खऱ्या अर्थाने भारताची ‘शान’ करायची असेल तर एरवी अतिशय साधे किंवा दुर्लक्षित करण्याजोगे हे विचारच अंती परिणामकारक ठरणार आहेत.
थ्

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..