नवीन लेखन...

रिकामटेकड्यांचे उद्योग




प्रकाशन दिनांक :- 31/08/2003

‘घ्ह घ्ह्ग्र्ी ानीब् ूग्स ग्े ूार्ी ूग्स, ाहूग्ीा म्दल्हूीब् ग्े ल्ीग्हर्ीत् र्ीह् ानीब् स्र्ीह ग्े ार्ेजीू ग्ह ानीब् िगत्् ार्ेमज्ू प्ग्े दैह िगत््’
भारताला भेट दिलेल्या एका अमेरिकन माणसाने केलेले हे भारताचे वर्णन आहे. या वर्णनात अतिशयोक्ती अजिबात नाही. हेटाळणीचा सूर असेल, परंतु तो वस्तुस्थितीला सोडून नाही. वेळ कसा घालवावा (वाया) हे कुणाला शिकायचे असेल तर त्याने भारतात यावे. चार घोटांच्या चहाचे निमित्त आम्हाला तासाभराच्या वायफळ चर्चेसाठी पुरेसे ठरते. *हूग्ीा म्दल्हूीब् ग्े ल्ीग्हर्ीत्. भारतातील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची अवस्था पाहिल्यानंतर कोणाचेही प्रांजळ मत हेच असेल. भारतातील लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य अगदी चपखल शब्दात त्या अमेरिकन माणसाने सांगितले, *नीब् स्र्ीह ग्े ार्ेजीू ग्ह ानीब् िगत््, ार्ेमज्ू प्ग्े दैह िगत््. आम्ही आम्हाला जितक्या अचूकपणे ओळखू शकलो नाही तितकी अचूक ओळख त्या अमेरिकन माणसाने आम्हाला करून दिली आहे.
भारतातील प्रत्येक व्यक्ती ार्ेजीू आहे यात वादच नाही. अगदी खेड्यातल्या मारोतीच्या पारावर, चावडीवर जाऊन बघा किंवा महानगरातील मोठ-मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये डोकावून बघा, या ार्ेजीू लोकांची मांदियाळी आपल्याला ठिक-ठिकाणी आढळेल. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची एवढी विपुलता जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. फक्त अडचण हीच आहे की, हे सगळे तज्ज्ञ ‘*र्ेमज्ू प्ग्े दैह िगत््’ या वर्गवारीत मोडणारे आहेत. त्यामुळे ऊदद स्र्ीहब् म्ददप्े ेज्दग्त ूप िदद् याचा आपल्याला वारंवार प्रत्यय येतो.
स्वत:चे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात ‘श्र्ीेूी’ असणाऱ्या वर्गातील या लोकांसोबतच रिकामटेकड्यांचाही एक मोठा वर्ग आपल्या देशात सुखनैव नांदत आहे. स्वत: तर काही करायचे नाही, परंतु इ
तर कोणी काही करत असेल तर त्याचे पाय कसे खेचायचे, त्याची कृती कशी देशविघातक, ढोंगी आहे, हे ऊर बडवून सांगायचे एवढाच उद्योग

या लोकांचा असतो. देशाचे खरे

नुकसान या लोकांनीच केले आहे आणि अजूनही करत आहेत. प्रत्येकाची धडपड दुसऱ्याची रेषा लहान करण्यासाठी. आपली रेषा त्याच्या रेषेपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करताना कुणी दिसत नाही. अलीकडील काळात तर हे प्रकार फारच वाढले आहेत. आम्हीच तेवढे देशभक्त, आम्हीच तेवढे समाजसुधारक, इतरांनी मांडला तो केवळ स्वार्थाचा बाजार, अशी भूमिका जेव्हा कथित मान्यवर घेऊ लागतात तेव्हा त्यांची कीव कराविशी वाटते. एखादी व्यक्ती चुकत असेल तर ती चूक लक्षात आणून देण्यात काही गैर नाही. ती व्यक्ती करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीतदेखील हे काम करता येते, परंतु त्याच्या एखाद-दुसऱ्या आणि बरेचदा ती व्यक्ती करीत असलेल्या कार्याच्या तुलनेत अतिशय क्षुल्लक ठरणाऱ्या, चुकीचे भांडवल करीत त्या व्यक्तीला सरसकट धोपटणे कोणत्याही परिस्थितीत उचित ठरू शकत नाही. शेवटी चुका काहीतरी करू पाहणाऱ्यांकडूनच होतात. जे कधीच काही करत नाहीत ते चुकतही नाहीत, हेसुध्दा लक्षात घेतले पाहिजे. अशा कधीच काही न करणाऱ्या आणि म्हणूनच कधीच न चुकणाऱ्या दगडांपेक्षा, चुकीचे का होईना, परंतु काहीतरी करणाऱ्या ‘जिवंत’ लोकांचे महत्त्व देशाच्या दृष्टीने अधिक ठरते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अशा जिवंत लोकांची आधीच कमतरता आहे आणि जे काही थोडेफार असे लोक आहेत त्यांचे मनोधैर्य खचविणाऱ्यांच्या टोळ्याच कार्यरत झाल्या आहेत.
देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर लोकांची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. देशाला *र्ेजीू लोकांची गरज नाही, त्यांच्या सल्ल्यांची आवश्यकता नाही. विचार करणाऱ्यांनी देशाचे आतापर्यंत वाटोळेच केले आहे. आता देशाला गरज आहे क्रियाशील लोकांची, काहीत
ी करणाऱ्यांची. ते चुकत असतील तर त्यांच्या चुका दुरुस्त करता येतील. धावणाऱ्या गाडीची गती वाढवता येईल, दिशा बदलता येईल, परंतु चाकच नसलेल्या गाडीचे काय करावे? स्वातंत्र्योत्तर 56 वर्षाच्या वाटचालीत देशाने प्रगतीची कोणती शिखरे सर केली? मूलभूत समस्या आजही तशाच कायम आहेत. पायाभूत सुविधांचा विकास अद्यापही सुरूच आहे आणि ज्या गतीने तो सुरू आहे ते बघता पुढील हजार वर्षे तरी तो सुरूच राहील असे वाटते. अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य कमी होत नाही. हे असे का, याचा मूलगामी विचार आपण केव्हा करणार? स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की, ध्येयवादाने पछाडलेले केवळ 100 तरुण मला द्या, मी या देशाचा कायापालट करून दाखवतो. त्यांचा हा दावा यथार्थ होता. इतिहास घडविणाऱ्यांची संख्या नेहमीच बोटावर मोजण्याइतकी असते. ज्यांच्या अतुलनीय क्षमतेने संपूर्ण देशाचे मानचित्र बदलू शकते, असा इतिहास घडविणाऱ्यांची मोठी परंपरा या देशाला लाभली आहे, परंतु ही परंपरा आता खंडित होऊ पाहत आहे. भरारी घेण्यापूर्वीच गरूडाचे पंख छाटण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. यासाठी कोणी परकीय शक्ती किंवा शत्रू जबाबदार नाही. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत, कळत अथवा नकळतपणे!
कोणी एखादा विकासाची कल्पना डोक्यात ठेऊन पुढे येऊ पाहत असेल तर पदोपदी त्याची हेटाळणी केली जाते, त्याच्यासमोर नाना प्रकारच्या अडचणी उभ्या केल्या जातात, त्याचा आत्मविश्वास घालविण्याचा प्रयत्न केला जातो. चार हातांना काम देऊ इच्छिणाऱ्याचे दोन्ही हात नियम, कायदे यांनी बांधल्या जातात आणि असे लोक हा प्रयत्न करतात ज्यांच्या दोन्ही हातांनी उभ्या आयुष्यात माशा मारण्याखेरीज कोणतेच काम केलेले नसते. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात *र्ेजीू असणाऱ्या अशा लोकांनी कधी स्वत: देशाच्या विकासात तर सोडा आपल्या गावच
या परिसराच्या विकासात पाच पैशाचे तरी योगदान दिलेले असते का?
भ्रष्टाचार ही देशासमोरची एक मोठी समस्या असल्याचे मान्य करावेच लागेल, परंतु मच्छरांच्या त्रासातून सुटण्यासाठी घराला आग लावणे कितपत श्रेयस्कर ठरू शकेल? भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती हा एक वेगळाच मुद्दा आहे. आम्हाला शांतता

हवी आहे, पण ती स्मशान शांतता नको. भ्रष्टाचारमुक्त समाजाचे स्वागतच

आहे. परंतु त्यासाठी कर्तृत्ववान लोकांचा बळी देणे परवडणारे नाही. आज प्रत्येकजण न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरत आहे. प्रत्येकाच्या लेखी दुसरी व्यक्ती गुन्हेगार आहे. काय योग्य आणि काय अयोग्य, हे ठरविण्याचा अधिकार या लोकांना दिला कुणी? स्वत:च्या आतड्याला कधी पीळ पडू द्या, तेव्हा भूकेच्या वेदना काय त्या तुम्हाला कळतील! स्वत: पोटभर हादडायचे आणि इतरांना उपवासाचे महत्त्व सांगत फिरायचे, हा रिकामटेकडा उद्योग आता तरी कथित समाज धुरिणांनी बंद करावा. महाभारत युध्दात कर्णाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या शल्याने संधी मिळेल तेव्हा कर्णाचा उपमर्द करून त्याचा आत्मविश्वास क्षीण करण्याचा प्रयत्न केला होता. शल्याची ती वंश परंपरा आजही अस्तित्वात आहे. त्या शल्याने किमान कर्णाच्या रथाचे सारथ्य तरी केले होते, हे आधुनिक शल्य तर काहीच न करता, लढणाऱ्यांचा अवसानघात करीत आहेत. या रिकामटेकड्या लोकांनी आता आपले उद्योग आवरते घ्यावे. चुकणाऱ्याला चुकू द्या, ते करीत असलेल्या चुका त्यांच्यात काहीतरी करण्याची क्षमता असल्याचे सिध्द करतात. आज भलेही चुकत असतील, परंतु किमान उद्यातरी योग्य मार्गावर येण्याची आशा त्यांच्याकडून बाळगता येते. त्यांच्या चुकांचे पोस्टमार्टम करणाऱ्या रिकामटेकड्यांकडून कसली आशा? किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी उभे राहून बुडणाऱ्याला पोहण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ‘*र्ेजीू’ लोकांपेक्षा सरळ पाण्
यात उडी घेऊन बुडणाऱ्याचे प्राण वाचविणारा निर्बुध्द केव्हाही श्रेष्ठ ठरतो. आज देश बुडत असेल तर त्याला वाचविण्याच्या वायफळ चर्चा करण्यात काय हशील? सरळ पाण्यात उडी घ्या! बुडणाऱ्या देशाला वाचविण्याचा जमेल तसा प्रयत्न करा आणि ते शक्य नसेल तर किमान असा प्रयत्न करणाऱ्यांचा मनोभंग तरी करू नका. तुमच्यासाठी भलेही ते देशहिताचे, समाजहिताचे कार्य असेल परंतु देशाच्या दृष्टीने तो रिकामपणाचा उद्योग ठरतो आहे. आपले हे रिकामटेकडे उद्योग कृपा करून आवरा, खरी देशसेवा तीच ठरेल.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..