जगात अन्याय केवळ दुर्बलांवर होत असतो, हा नियमच आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर इतरांना शिव्याशाप घालून काही फायदा नाही, आपल्यात प्रथम कौशल्य निर्माण करावे लागते, परंतु आम्हा भारतीयांची मानसिकताच नकारात्मक आहे. कष्ट उपसायची आमची तयारी नसते. शिवाजी जन्माला यावा, परंतु तो शेजारच्या घरात, हा आमचा बचावात्मक पवित्रा असतो,आळस हा आमचा स्थायीभाव आहे, आयते मिळेल तेवढे आम्हाला हवे असते आणि कुणी ते देत नसेल तर त्याच्या नावाने शंख करण्यास आम्ही सज्ज असतो.
चाक किंवा चक्र हे गतीचे प्रतिक मानल्या गेले आहे. चाकाचा शोध लागल्यापासूनच माणसाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली, असे म्हटले जाते. आधुनिक युगातही गतीचे हे प्रतिक कायम राहिले आहे, आजही कोणत्याही भागाचा विकास, त्या भागात कारखान्याची किती चाके फिरत आहेत, अर्थात त्या भागातील औद्योगिक विकास कितपत झाला आहे, यावरच विसंबून असतो. अर्थात उद्योग म्हणजे मोठमोठे कारखाने, त्यांची उंच उंच धुरांडी असे समजणे चुकीचे आहे, साधे घरातील जात्याचे फिरते चाक किंवा झेरॉक्सचे दुकानही एक उद्योगच म्हणायला हवा. सांगायचे तात्पर्य लहान-मोठे उद्योग, व्यवसायच कोणत्याही भागाच्या विकासाला चालना देत असतात. पूर्वीच्या काळी घरात रोज थोडेतरी ताक घुसळून त्यातून लोणी काढले जायचे. ज्या घरात रवी फिरते त्या घरात समृद्धी वास करते, असे म्हटले जायचे. शेतीसोबतच दुग्धोत्पादन हा त्या काळातील मुख्य व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक घरात दूध, दही, ताक, लोणी वगैरे असायचेच. त्यांचा आहारात समावेश असायचा आणि अतिरित्त* दूध, दही, लोणी विकले जायचे. त्यामुळेच घरात रवी फिरण्याचा संबंध समृद्धीशी जोडल्या गेला. तो काळ आता राहिला नाही. शेतकऱ्याजवळचे पशुधन कमी होत होत अगदी नाहिसे झाले. गावस्तरावर चालणारा दुग्धव्यवसाय आता कुठेतरी तालुक्या
च्या किंवा जिल्ह्याचा
गावी केंद्रीत झाला. शेतीतील कच्च्या मालावर प्रक्रिया
करणारे लघुउद्योग देशोधडीला लागले. पूर्वी तुरीची डाळ घरीच तयार केली जायची. जाते, उखळ घरोघरी असायचे, आता ते काहीच उरले नाही. शेतीचीच जिथे वाट लागली तिथे शेतीपुरक उद्योगाबद्दल बोलणे व्यर्थच आहे. आधुनिक काळात उद्योगाचे क्षितीज अधिक व्यापक होत गेले. विकासासोबतच मानवाच्या गरजा वाढू लागल्या आणि त्या गरजा मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी कारखाने उभे राहू लागले. आता उद्योग केवळ कृषिआधारीत उत्पादनावर अवलंबून राहिले नाही. कापडासाठी कापसाची गरज उरली नाही, काळाच्या ओघात हे बदल अपरिहार्यच होते. या बदलांना सामावून घेत विकास करण्याची संधी उपलब्ध झाली. ही संधी ज्या देशांना, ज्या राज्यांना, प्रदेशांना साधता आली त्या प्रदेशातील लोकांचे जीवनमान उंचावले, त्यांच्या जीवनातील संघर्ष कमी झाला. स्थिर आणि शांत जीवन जगण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. फिरत्या चाकाचे महत्त्व ज्यांना समजले तेच आधुनिक जगात विकसित झाले. आज आमचा विकास झाला नाही म्हणून कंठशोष करणाऱ्या लोकांनी विकासाचा हा मूलमंत्र कितपत समजून घेतला? आपल्या भागात निरनिराळे उद्योग उभे राहावेत, त्यातून रोजगार निर्माण व्हावा, भांडवल निर्मिती व्हावी म्हणून किती प्रयत्न झाला? जगात अन्याय केवळ दुर्बलांवर होत असतो, हा नियमच आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर इतरांना शिव्याशाप घालून काही फायदा नाही, आपल्यात प्रथम कौशल्य निर्माण करावे लागते, परंतु आम्हा भारतीयांची मानसिकताच नकारात्मक आहे. कष्ट उपसायची आमची तयारी नसते. शिवाजी जन्माला यावा, परंतु तो शेजारच्या घरात, हा आमचा बचावात्मक पवित्रा असतो, आळस हा आमचा स्थायीभाव आहे, आयते मिळेल तेवढे आम्हाला हवे असते आणि कुणी ते देत नसेल तर त्याच्या नावाने शंख करण्यास आम्ही सज्ज असत
. जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर आम्ही स्वाक्षरी केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी चीनने त्यावर स्वाक्षरी केली. यादरम्यान चीनने या कराराचे कोणते परिणाम होऊ शकतात, आपल्या देशासाठी ते सकारात्मक ठरतील की नाही आणि ते सकारात्मक ठरण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी लागेल, याचा अभ्यास केला. औद्योगिक विकासाचे शिवधनुष्य पेलण्याची कुवत निर्माण होण्यासाठी सगळी पूर्वतयारी केली. पायाभूत सुविधांचा विकास केला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कम्युनिस्ट चीनने कामगारांचे कुठलेही लाड खपवून न घेणारे नवे कामगार कायदे तयार केले. या नव्या कायद्यानुसार कामाचे तास अगदी 12 ते 18 तासापर्यंत वाढवले. निर्धारीत कालावधीत निश्चित केलेले उत्पादन झालेच पाहिजे, अशी सत्त*ी केली. चीनमधील एकही प्रकल्प अंदाजित खर्चापेक्षा अधिक पैसा आणि अंदाजित कालावधीपेक्षा अधिक वेळ घेत नाही, हे ऐकून आपल्याला फेफरे यायचे तेवढे बाकी राहिल. आपल्याकडे एकही प्रकल्प, मग तो साधा नाल्यावरील रपटा बांधण्याचा का असेना, अंदाजित खर्चापेक्षा दुप्पट, तिप्पट खर्चात आणि तेवढ्याच विलंबाने पूर्ण होतो. गोसीखुर्द प्रकल्प हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. शिवाय झालेल्या कामाचा दर्जा विचारायची सोय नसते. चीनमध्ये असली थेरं चालत नाहीत. तिथे प्रत्येक कामगाराला एक पुस्तिका देण्यात येते. त्या पुस्तिकेत त्याचे वरिष्ठ आपले शेरे लिहित असतात. कोणत्याही कामगाराच्या या पुस्तिकेत तीन प्रतिकूल शेऱ्यांची नोंद झाली की त्या कामगाराला सरळ त्याच्या खेड्याचा रस्ता दाखविण्यात येतो. त्याला इतरत्र कामही मिळत नाही, त्यामुळे त्याला आपल्या खेड्यावर जाणे भाग पडते. तिथल्या उद्योगांच्या मालकांना तेवढे अधिकार आहेत. आपल्याकडच्या परिस्थितीची चीनशी तुलनाच होऊ शकत नाही. इथल्या मालकांना लोकांना केवळ नोकरी देण्याचा अधिकार आहे,
्यानंतर त्यांना ब्रह्यदेवदेखील हात लावू शकत नाही. त्यामुळेच नोकरी मागताना लाचार असलेले इथले कामगार, कर्मचारी नोकरी मिळताच मुजोर होऊन जातात. काम करण्याची सत्त*ी त्यांच्यावर करता येत नाही, केलेले काम सदोष असेल तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर नसते, वर्गातले अगदी सर्व
विद्यार्थी नापास झाले तरी शिक्षकाचा 1 रु. पगारही कमी होत नाही.
त्यांच्या वेतनाला थोडाही धक्का सहन होत नाही. आधी काम मग दाम, हे तर आम्हाला मान्यच नाही. दाम निश्चित, जमलेच, त्या मालकाचे नशिब चांगले असले तर काम केले जाते. आणि या सगळ्या मुजोरपणाला कायद्याचे संरक्षण आहे. हे चित्र कम्युनिस्ट चीनमधले असते तर आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. कारण कामगारांना न्याय मिळवून देण्याचे, सर्व सत्तेची सूत्रे कामगारांच्या हाती आणण्याचे तत्त्वज्ञान म्हणजे कम्यूनिझम; आणि चीन हे कम्युनिस्ट राष्ट्र आहे. त्यामुळे तिथला कामगार देव झाला असता तर एकवेळ समजून घेता आले असते; परंतु झाले उलटेच! एखाद्या भांडवलशाही देशात नसतील इतकी बंधने चीनमध्ये कामगारांवर लादल्या गेली आणि भारतात कम्युनिस्टांनाही आश्चर्याने तोंडात बोटे घालण्यास भाग पाडण्याइतके कामगारांचे लाड सुरू झाले. या उफराट्या धोरणानेच भारतातील औद्योगिक विकासाचा पार विचका झाला. कृषी क्षेत्रातही धड विकास करता आला नाही आणि सरकारी व औद्योगिक क्षेत्रात कामगारांना सरकारने आपले जावईच करून टाकल्याने या क्षेत्राचीही पार वाट लागली. एकीकडे देशात सुशिक्षित बेकारांची फौज उभी असतांना प्रथम 5 वे नंतर 6 वे वेतन आयोग सरकार देत असतांना या देशातील कुणीही त्याविरुद्ध उभा राहत नाही ही एकच बाब हा देश किती विचारशून्य झाला आहे हे दर्शविण्यास पुरेशी आहे. शेवटी कितीही अत्याधुनिक यंत्रे आणली तरी ती हाताळणारी माणसेच असतात आणि त्या माणसांची निष्ठा आणि कष्टाळूपणावर
त्या उद्योगाची भरारी अवलंबून असते. त्यासाठी लोकांमध्ये ‘वर्क कल्चर’ असायला हवे; दुर्दैवाने आपल्याकडे नेमकी याच गोष्टीची वानवा आहे. ज्या भागातील लोकांनी हे ‘वर्क कल्चर’ आत्मसात केले त्या भागाचा विकास आपोआप होत गेला. कोणताही उद्योग उभा करणे हा तोंडचा खेळ नाही, निव्वळ पैशाचाही नाही. संबंधित व्यत्त*ीला त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. दिवसाचे चोवीस तास त्याचे डके त्याच विचारात असते, त्याचे वैयत्ति*क आयुष्य जवळजवळ संपलेले असते. आपली बुद्धी, वेळ आणि पैसा यांची पूंजी पणाला लावून एखादी व्यत्त*ी एखादा उद्योग उभा करीत असेल तर स्वाभाविकच त्याला त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडूनही त्याच तोडीच्या मेहनतीची अपेक्षा असेल आणि त्याचा मोबदला द्यायलाही तो आनंदाने तयार होईल; परंतु दुर्दैवाने त्याला कामचुकार, पगार कामाचा घेऊन इतर उद्योग करणारे, आपल्याच मालकाला भिकेला लावण्याचे षडयंत्र करणारे लोक मिळाले तर त्याच्याइतका कमनशिबी तोच म्हणायला हवा. आपल्याकडे काही प्रदेश याचसाठी ‘कुप्रसिद्ध’ आहेत आणि म्हणूनच कोणताही शहाणा उद्योगपती या भागामध्ये आपला उद्योग उभा करण्यास धजावत नाही. ‘वर्क कल्चर’शी या भागातील लोकांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. आयते, फुकटात मिळेल तेवढे या लोकांना हवे असते आणि त्यालाच ते आपला हक्क मानतात. हा हक्क नाकारला गेला तर तो अन्याय समजला जातो. राहायला घर फुकट, दिवा फुकट वरुन बेरोजगारी भत्ता, अन्नधान्य 2 रु. किलो, शाळेत मुलाला खिचडी तर गरोदर बाईला महिना 700 रु. फुकटचे असे सर्व लाड असल्यावर महिनाभर काम करायला कोण मुर्ख जाईल. केवळ 1 आठवडा जरी काम केले तरी पूर्ण महिना भागतो. ‘वर्क कल्चर’ काय असते, हे जाणून घ्यायचे असेल तर गुजरातमध्ये जा, प. महाराष्ट्रात किंवा अगदी मुंबईत गेला तरी चालेल आणि शक्य असेल एकदा चीन किंवा जपानला भेट देऊन या! फालतू गोष्टीं
ा विचार करण्यासाठी तिकडच्या ‘ए’ पासून ‘झेड’ श्रेणीच्या सगळ्याच कामगार, अधिकाऱ्यांना अजिबात वेळ नसतो. मी आणि माझे काम, माझ्यावरील जबाबदारी यात ते गुंतून गेलेले असतात. त्यांची निष्ठा कामावर असते, आपल्या अन्नदात्या उद्योगावर असते. मी ज्या कामासाठी वेतन घेत आहे, ते काम निष्ठेने, प्रामाणिकपणे करणे हा माझा धर्म आहे, ही भावना त्यांच्या मनात ठासून भरलेली असते. याला ‘वर्क कल्चर’ म्हणतात. जगात जिथे जिथे विकास झालेला दिसून येतो, तिथे तिथे हा ‘वर्क कल्चर’ घटक प्रभावी असल्याचे दिसून येईल आणि जो भाग अविकसित आहे, तिथले लोक इतरांच्या नावाने खडे फोडत असलेले दिसून येतील. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आधुनिक समाजात चाकाच्या गतीसोबत विकासाची नाळ जोडलेली आहे. या गतीला अवरूद्ध करण्याचे काम जिथे होते, चालत्या गाडीची खिळ काढण्याचा नतद्रष्टपणा जिथे केला जातो तिथल्या लोकांना आमचा विकास झाला नाही, हे सांगण्याचा किंवा तशी तक्रार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही आणि जिथे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये ‘वर्क कल्चर’ दिसून येते त्या भागाचा विकास थोपविण्याचे सामर्थ्य कुणातही नसते. औद्योगिक विकासासाठी एक प्रकारची औद्योगिक शांतता हवी असते. त्यासाठी सरकार तर अनुकूल असायलाच हवे, सोबतच तिथे काम करणाऱ्या लोकांची कामाबद्दलची निष्ठा आणि ”वर्क कल्चर” महत्वाचे असते त्यामुळे आम्हाला जर विदर्भाचा विकास करायचा असेल तर प्रथम सुरुवात या ”कल्चर” पासूनच करावी लागेल.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply