नवीन लेखन...

विदर्भाची ओळख कोणती?





मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता. भाषावार प्रांतरचना अस्तित्वात येईपर्यंत भारतात इंठाजांनी प्रशासकीय सोयीसाठी पाडलेले प्रांत अस्तित्वात होते. त्यानंतर भारताची बहुभाषिक विविधता जपण्यासाठी भाषेचा आधार घेत प्रांतांची पुनर्रचना करण्यात आली. त्यातूनच विविध भाषिक राज्ये निर्माण झाली.
विदर्भाला मध्य प्रांतातून आणि मुंबईला गुजरातपासून तोडून मुंबई-विदर्भासह मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. ज्याअर्थी विदर्भाचा समावेश मराठी भाषी महाराष्ट्रात करण्यात आला त्याअर्थी विदर्भाची भाषा मराठी होती कवा आहे, असेच म्हणावे लागेल. याचाच अर्थ उद्या यदाकदाचित विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा झालाच तर मराठी भाषिकांचे दुसरे राज्य अस्तित्वात येईल, असे मानण्यास हरकत नाही.
सांगायचे तात्पर्य, विदर्भवाद्यांच्या मतांचा आदर करीत उद्या केंद्राने विदर्भाचे स्वतंत्र राज्य घोषित करण्याचा निर्णय घेतलाच तरी तो भाषावार प्रांतरचनेच्या मूलभूत तत्त्वाला धक्का लावणारा ठरणार नाही. परंतु इथे प्रश्न हा निर्माण होतो की भाषावार प्रांतरचनेच्या मूलभूत तत्त्वाला तडा न देता विदर्भाचे स्वतंत्र राज्य मागण्यासारखी परिस्थिती सध्या आहे काय? विदर्भ मराठी भाषिकांचा राहिला आहे काय? मराठी ही विदर्भाची मायबोली आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे काय? तशी परिस्थिती नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विदर्भाची कागदोपत्री भाषा मराठी असली तरी विदर्भाची राजभाषा म्हणण्यासारखी इथल्या मराठीची परिस्थिती नाही. मुळात नऊ जिल्ह्यांचा हा प्रांत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागल्या गेला आहे. पश्चिम विदर्
भ पूर्वी वऱ्हाड या नावाने ओळखला जायचा आणि वऱ्हाडी ही इथली बोलीभाषा होती, आजही काही प्रमाणात आहे. पूर्व विदर्भाची मराठी थोडी वेगळी पडते, परंतु दोन्ही भाषांचे मूळ मराठीच आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे संपूर्ण देशाची प्रांतवार पुनर्रचना करताना भाषा

हा प्रमुख आधार घटक मानण्यात

आला. बेळगाववासीय याच आधारावर आपल्या प्रांताचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी आजही संघर्ष करीत आहेत. भाषा हा आधार घटक मानण्याचे मुख्य कारण भाषेसोबत जुळलेली अस्मिता, भाषेतून व्यत्त* होणारी ओळख आणि भाषेमुळेच स्पष्ट होणारे वेगळेपण हे होते. याचाच अर्थ भाषा ह कुठल्याही प्रांतातील लोकांच्या अस्मितेची आणि आत्मियतेची परिचायक असते. आज विदर्भ आपली हीच अस्मिता गमावू पाहत आहे. विदर्भाची बोलीभाषा बदलत आहे. दोन वैदर्भीय माणसे एकत्र आली तर ती मराठीतच बोलतील याची शाश्वती राहिलेली नाही. हिंदी किंवा इंग्लिशमिश्रित हिंदीचा वापर इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे की एखाद्या परक्या माणसाला आपण महाराष्ट्रात आहोत की मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात आहोत असाच प्रश्न पडावा. वैदर्भीय जनतेचे हे हिंदी प्रेम आकलनाच्या पलीकडचे आहे.
स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांच्या तोडीचा इतर भाषेतील वृत्तपत्रांचा खप असेल असा विदर्भवगळता इतर एखादाही प्रांत भारतात नसेल. नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु विदर्भात मराठी भाषी वृत्तपत्रांइतकाच हिंदी भाषी वृत्तपत्रांचाही खप असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय इंठाजी वृत्तपत्रांनाही इथे मरण नाही. यामागचे कारण तसे पाहिले तर स्पष्ट आहे. विदर्भातील मूळचा मराठी भाषिक एक प्रकारच्या न्यूनगंडाने ठास्त आहे. हा न्यूनगंड कर्तृत्वाच्या अभावातून आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर भाषिक लोक इथे स्थायिक होऊन करीत असलेली प्रगती त्याच्या या न्यूनगंडाला अधिकच
बळकट करीत असावी. या न्यूनगंडातूनच आपले अपयश झाकण्यासाठी विदर्भातील लोक ‘त्यांच्यासारखे’ होण्याच्या प्रयत्नात त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली आदींचे अनुकरण करीत असावेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी चित्रपटाचा एकच ‘फार्म्युला’ सांगितला जातो आणि तो म्हणजे एखाद्या यशस्वी चित्रपटाची नक्कल आणि कधीकधी तर त्या चित्रपटाचा ‘रिमेक’ करणे. ‘डॉन’ तयार झाला आहे आणि ‘शोले’ तयार होत आहे, तो याच अपेक्षेने! कदाचित चित्रपटाच्या बाबतीत हा ‘फार्म्युला’ यशस्वी ठरेलही, परंतु वास्तव जीवनात एखाद्या यशस्वी व्यत्त*ीची नक्कल करून यशस्वी होता येत नाही. कारण नक्कल करताना आपण त्या व्यत्त*ीने उपसलेल्या कष्टांची सोडून इतर सगळ्याच गोष्टींची नक्कल करीत असतो.
स्वातंत्र्यपूर्व काळातही हेच दिसून येत होते. इंठाजांनी संस्थाने खालसा केल्यावर या संस्थानिकांची अस्मिता, अभिमान इतक्या रसातळाला गेला होता की तलवारी सोडून या राजे-महाराजांनी क्रिकेटच्या बॅटी हातात घेत पराक्रम गाजवायला सुरुवात केली. ‘साहबांसारखे’ रुबाबदार, यशस्वी व्हायचे तर साहेबांसारखे क्रिकेट खेळता यायला नको? भारतीय लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत इंठाजांनी इथे चहासारखे तद्दन फालतू पेय रुजविले आणि आरोग्यदायी ‘गूळ-पाणी’ हद्दपार झाले. म्हशीचे दूध त्याच मार्गाने आपल्या आहारात आले. सांगायचे तात्पर्य, कुणाचीही नक्कल करून कुणाला यशस्वी होता येत नाही.
यशाचा कुठलाही ‘फार्म्युला’ अथवा ‘शॉर्टकट’ नसतो. अंगमेहनत, जिद्द आणि बुद्धिमतेच्या जोरावरच यशस्वी होता येते. विदर्भातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. भाषेसोबत अस्मिता आणि अभिमानही लयाला जात असतो. त्यातून नंतर एकप्रकारची पराभूत मानसिकता वाढीस लागते. एकवेळ या मानसिकतेने मनात घर केले की प्रचंड क्षमतेची माणसेही कोसळू लागतात. महाराष्ट्रातल्याच खानद
ेशाने आपली अहिराणी भाषा टिकवून ठेवली आहे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही मराठीप्रधान बोलीभाषा आहे. या भागात असलेले इतर भाषिक लोकदेखील मराठी बोलण्याचा, मराठीतून व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात. विदर्भात मात्र परिस्थिती तशी नाही. इतर भाषिकांना मराठी समजून घेण्याची अथवा बोलण्याची गरजच भासत नाही, इथले लोकच त्यांची भाषा बोलायला लागले आहेत.
नागपूर विदर्भाची राजधानी आहे आणि नागपुरातीलच परिस्थिती अशी आहे की या शहरातील पन्नास टक्के लोक हिंदी किंवा इतर भाषेचा व्यवहारात वापर करतात. नागपूर ‘मेट्रोपॉलिटीन’ शहर आहे, शहराचा औद्योगिक विकास झाला आहे, रोजगाराच्या भरपूर संधी या शहरात आहेत, त्यामुळे परप्रांतियांचा ओढा या शहराकडे अधिक आहे,

हे कारण त्यासाठी देता येत असले तरी मूळच्या रहिवाशांमध्येही हिंदी

बोलण्याचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व पुण्याचाही विकास झाला, ती शहरेदेखील औद्योगिकदृष्ट्या विकसित झालीत, त्या शहरातही परप्रांतियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तरी देखील त्या शहरांचे मराठीपण कायम आहे. त्यांचा मराठी चेहरा पुसल्या गेलेला नाही. नागपूरचे मात्र झपाट्याने हिंदीकरण होत आहे. इथे प्रश्न कोणत्याही भाषेला किंवा भाषिकांना विरोध करण्याचा नाही. प्रत्येक प्रांताची आपली एक ओळख असते, आपली एक अस्मिता असते आणि ती त्या प्रांताच्या भाषेतूनच मुखत्वे जपली जात असते.
विदर्भाची भाषा मराठी आहे आणि वैदर्भीय संस्कृतीची ओळख, वैदर्भीय अस्मिता मराठीतूनच जपली जाऊ शकते. त्याच मराठीचे विदर्भत वेगाने हात असलेले खच्चीकरण अस्वस्थ करणारे आहे. उद्या कदाचित विदर्भाचे वेगळे राज्य झालेच तर ज्या राज्याला स्वत:ची अशी भाषा नाही असे भारतातील ते एकमेव राज्य ठरेल. आज विदर्भात अशी परिस्थिती आहे की उद्योग, व्यापार, शिक्षण अ
ा विविध क्षेत्रांत इतर भाषिकांचच प्रभुत्व आहे. ही बाब त्या लोकांसाठी कौतुकाची असली तरी मराठी भाषिक वैदर्भियांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. त्यामुळे इतर भाषिकांचे अनुकरण करण्याऐवजी वैदर्भीय लोकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करण्यासाठी पुढे यायला हवे. कष्ट करायची तयारी आणि सोबतीला जिद्द असेल तर अशक्य असे काहीही नाही. पराभूत मानसिकतेतून बाहेर पडायचे असेल तर आधी स्वत:च्या क्षमतेची, आपल्या सत्वाची ओळख व्हायला हवी आणि ही ओळख इतरांपेक्षा वेगळी असायला हवी. केवळ भौगोलिक सीमा बदलून वेगळे होता येत नाही. हा वेगळेपणा कर्तृत्वातूनही जाणवायला हवा! थ्

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

1 Comment on विदर्भाची ओळख कोणती?

  1. dear sir , we,the people does not suffer from linguistic inferiority complex, still our varadhi language is alive and spoke on large scale.its because of intervention of non marathi people in vidharbha. secondly, the youngster every year, move to pune and mumbai for their carrier, jobs and get settled there, this is also one of the reason why scaracity of varadhi speaking people found in vidharbha.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..