सध्या पावसाळा सुरू आहे. डॉक्टर मंडळींच्या भरभराटीचा हा मोसम असल्याचे गंमतीने म्हटले जाते. अर्थात ते सत्यही आहे. याच काळात विविध आजारांचे प्रमाण तुलनेत खूप अधिक असते. अलीकडील काळात तर दर मोसमात असंख्य जुन्या आजारांच्या साथीला एका नव्या आजाराची भर पडत असते. पूर्वी ताप म्हटला की मलेरिया किंवा टायफाइड हेच समीकरण असायचे. आता साध्या तापाचेही असंख्य प्रकार अस्तित्वात आले आहेत आणि प्रत्येक प्रकाराचे स्वतंत्र औषध, स्वतंत्र चाचण्या अगदी स्वतंत्र स्पेशालिस्टदेखील असतात. मागच्या वर्षी संपूर्ण राज्यात चिकनगुनियाने थैमान घातले होते. या रोगाचे नावही पूर्वी कधी ऐकण्यात आले नव्हते. तो एडिस डास, तो डेंग्यू, त चिकनगुनिया अचानक कुठून उपटले कुणालाच माहीत नाही. मेंदूज्वर, जपानी ताप आणि इतर कसले कसले ताप सध्या थैमान घालत आहेत. साध्या तापामध्येही इतकी विविधता आणि तीही इतक्या कमी कालावधीत कशी निर्माण झाली, हे एक कोडेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे रोगाचे स्वरूप कितीही आधुनिक असले तरी त्याच्यावरचे औषध मात्र ताबडतोब उपलब्ध होते. या सगळ्या आजारांच्या मुळाशी ‘व्हायरस’ अर्थात विषाणूंचा प्रादुर्भाव आहे. हे विषाणू पूर्वी सुप्तावस्थेत होते का? जग एकविसाव्या शतकात गेल्यावरच आम्ही सक्रिय होऊ अशी त्यांनी प्रतिज्ञा वगैरे केली होती का? आणि सक्रिय होताना सोबत आपलेच प्रतिबंधक औषध घेऊन ते अवतरले का? पूर्वी माणसं एकतर महामारीत मरायची किंवा प्लेगची शिकार व्हायची. अजून दोन-चार मुख्य आजार होते. परंतु मरण्याच्या कारणांची एवढी प्रचंड ‘व्हेरायटी’ तेव्हा नव्हती. शिवाय तो काळ वैद्यकीय प्रगतीच्या दृष्टीने अतिशय मागासलेला होता. खरेतर जशीजशी वैद्यकीय क्षेत्रात मानवाची प्रगती होत गेली तसे तसे जगातील रोगांचे उच्चाटन व्हायला हवे होते. परंतु दिसते ते उलटच. इकडे वैद्यकीय क
षेत्रात प्रचंड प्रगती आणि तिकडे रोगांच्या संख्येत आणि
प्रकारातही इतकी वाढ? या अनाकलनीय
गोष्टीत नक्कीच कुठेतरी एखादी गोम दडली असावी. विशेषत: एखाद्या रोगासोबतच त्यावरचे प्रतिबंधक उपचार उपलब्ध होत असतील तर शंका घ्यायला भरपूर जागा आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात ‘बर्ड फ्ल्यू’ने धुमाकूळ घातला होता. इकडे ‘बर्ड फ्ल्यू’चा उपद्रव वाढला आणि तिकडे या रोगावरचे प्रतिबंधक औषध अमेरिकेतून भारतात दाखल झाल. हा केवळ योगायोग नव्हता. चिकनगुनिया, मेंदूज्वर, जपानी ताप, पिवळा ताप अशा नव्या नव्या आजारांच्या बाबतीतही असाच योगायोग दिसून आला किंवा येत आहे. आजपर्यंत या रोगाचे विषाणू होते कुठे, हा प्रश्न त्यामुळेच अधिक चर्चिल्या जात आहे. जगातील अनेक राष्ट्रांजवळ रासायनिक अस्त्र असल्याचे बोलले जाते. पारंपरिक शस्त्रांपेक्षा ही अस्त्रे अतिशय घातक असतात. अशा अस्त्रांद्वारे शत्रू राष्ट्रात विषाणूंचा फैलाव करून अख्खा देश नेस्तनाबुत करण्याची क्षमता या अस्त्रांमध्ये असते. इराकजवळ अशी अस्त्रे आहेत, या संशयापोटीच अमेरिकेने इराकवर हल्ला केला, हे देखील लक्षात घ्यावे लागेल. याचाच अर्थ विविध जीवघेण्या रोगांचा प्रादुर्भाव करणारे विषाणू प्रयोगशाळेत तयार करता येतात. ज्या प्रयोगशाळांमध्ये असे विषाणू तयार होतात, त्याच प्रयोगशाळांमध्ये त्यावरील प्रतिबंधक औषधही तयार होऊ शकते. या पृष्ठभूमीवर औषध उत्पादक कंपन्यांमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता ज्यावरील प्रभावी औषध केवळ आपल्याच प्रयोगशाळेत निर्माण होऊ शकते असे विषाणू आपल्या प्रयोगशाळेत या औषध उत्पादक कंपन्या तयार करीत नसतीलच असे ठामपणे म्हणता येत नाही. हे विषाणू आणि त्यावरील प्रतिबंधक औषध एकाचवेळी तयार करायचे आणि त्यानंतर भारत किंवा आप्रि*की देशांसारख्या मागासलेल्या परंतु भरपूर लोकसंख्या असलेल्या देशात या विषा
ूंचा उद्रेक घडवून आणायचे कारस्थान या कंपन्या करीत असाव्यात, असे म्हणायला भरपूर आधार आहेत. असा उद्रेक झाला की लगेच या रोगावरील प्रतिबंधक औषधे केवळ आपल्याकडेच उपलब्ध आहेत, असा दावा करायला आणि त्या माध्यमातून कोट्यवधींची लूट करायला या कंपन्या तयारच असतात. तसे नसेल तर एखाद्याच देशाच्या आणि त्यातही त्या देशाच्या एखाद्याच भागात एखाद्या रोगाचा अचानक प्रादुर्भाव होण्याचे कारणच काय? अचानक कुठली तरी साथ उद्भवते; डॉक्टर मंडळीच्या दवाखान्याबाहेर जत्रा भरते; अगदी शामियाने लागतात आणि कुठले तरी नामाभिधान देऊन औषधे लिहून दिली जातात. प्रत्येक दवाखान्याच्या बाहेर औषधांची मोठी मोठी दुकाने आहेत ज्यांचा खप दिवसाला लाख; दोन चार लाखांचा असतो. ह्या औषधांच्या म्हणजेच केमिकलच्या विक्रीच्या माध्यमातून करोडो/अब्जावधी रूपये या देशातून विदेशात पाठविले जातात. पूर्वीच्या काळात अशा रोगांच्या नोंदी आपल्याला आढळत नाहीत, याचे दुसरेही एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजकाल जे विषाणू प्रबळ होऊन माणसाच्या शरीरावर आघात करीत आहेत त्या विषाणूंवर विविध उपायांनी प्रभावी नियंत्रण ठेवले जायचे. आपले ऋषी, मुनी म्हणजे त्या काळचे शास्त्रज्ञच होते. आपापल्या आश्रमात त्यांचे विविध प्रयोग सातत्याने होत असत. मानवी जीवन निरोगी आणि निरामय ठेवण्यासाठी काय करता येईल, या दिशेनेच त्यांचे चिंतन आणि मनन चालायचे. निसर्ग, पर्यावरण आणि मानव यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करून त्यांनी मानवी आरोग्याच्या दृष्टीने काही परंपरा निर्माण केल्या. पूर्वी घराघरात होमहवन व्हायचे. त्यात विशिष्ट झाडांची लाकडे यज्ञकुंडात जाळली जायची, त्यांना समिधा म्हणत. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे वातावरणातील असंख्य विषाणूंचा नाश व्हायचा. पूजेच्या वेळी घंटानाद व्हायचा. त्या घंटानादाचीही एक विशिष्
पद्धत होती. विशिष्ट प्रकारे केलेल्या घंटानादामुळे किमान 72 प्रकारचे विषाणू एकतर नष्ट होतात किंवा त्या परिसरातून निघून जातात, हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. दूध गाईचेच असायचे, तूपही त्याच दुधापासून बनविले जायचे. गाईच्या तुपाचा दिवा देवाजवळ लावल्या जायचा. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या वायूमुळेदेखील अनेक प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखल्या जायचा, आरतीमध्ये कापूर जाळल्या जायचा. कापरातील औषधी तत्त्वामुळेदेखील वातावरण निरोगी राखण्यास मदत होत
होती. राळ जाळून धूप केला जायचा, पूजेमध्ये शंख असायचा. शंखातले
पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जायचे. शंखात ठेवलेल्या पाण्यात प्रचंड रोगप्रतिबंधक शत्त*ी असते, हे देखील आता सिद्ध झाले आहे. घराघरात चुली होत्या. त्या चुलींमध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि काही विशिष्ट झाडांचीच लाकडे जाळली जायची. कडूनिंबाचा पाला जमा करून जाळला जायचा. त्यातून निघणारा धूर संपूर्ण घरातील आणि परिसरातीलही वातावरण निर्जंतूक करीत असे. शिवाय चुलीवर केलेला स्वैंपाक खूप सकस असायचा. चुलीवरच्या आणि गॅसवरच्या स्वैंपाकाच्या चवीत किती फरक असतो, याचा प्रत्यय आजही घेता येईल. अंगणात गाईच्या शेणाचा सडा घातल्या जायचा. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे शोषून घेण्याची क्षमता गाईच्या शेणात आहे, हे तर आता विज्ञानानेही मान्य केले आहे. शिवाय गाईच्या शेणामध्ये अनेक प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करण्याचीही शत्त*ी आहे. आपले बहुतेक सणवार पावसाळ्यातच असतात. त्या त्या सणाला कोणत्या पदार्थाचे महत्त्व असते हेही सांगितलेले आहे आणि त्याचा सरळ संबंध पोटाच्या आरोग्याशी आहे. सणासुदीला बाहेरच्या दारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि त्या तोरणात झेंडूची फुले माळण्याची प्रथा आहे. बाहेरच्या हवेत असलेले घातक जंतू घरात शिरू नये म्हणून केलेल
ती प्रतिबंधक व्यवस्था होती. आंब्याच्या पानांमधील हरीत द्रव्यामुळे हे विषाणू त्यावर आकर्षित होतात अणि झेंन्डूच्या फुलांमधील औषधी गुणधर्मामुळे ते मरण पावतात हेही आता सिध्द झाले आहे; पूर्वी प्रयोगशाळा नव्हत्या आणि अश्या बाबी सामान्य माणसांसमोर सिध्द करणे किंवा सप्रमाण दाखविणे कृषिमुनींना (म्हणजेच शास्त्रज्ञांना) शक्य नसायचे म्हणून कल्पकतेने त्यांनी विविध सणांचे नियोजन करुन अशा विविध प्रथा निर्माण केल्या होत्या. आज हे सगळं काहीच नाही. चुली गेल्या, गॅस आला. गायीच राहिल्या नाही तर गाईचे शेण तरी कुठून येणार? आरती, पूजा, घंटानाद, पूजेतला शंख, षड्रसयुत्त* आहार, निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली आता काहीच राहिले नाही. परिणामी आपल्या आरोग्याचे जे शत्रू आतापर्यंत आपल्यापासून अंतर राखून होते ते आता आपल्याशी सलगी करू लागले आहेत. शिवाय जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नवे शत्रूही जन्माला घातले जात आहेत. परिणामी विविध आजारांचे जणू पेवच फुटले आहे आणि औषध कंपन्या म्हणजेच केमिकल कंपन्यांची दिवाळी साजरी होते आहे. आपले आरोग्य पुष्ट करणाऱ्या गायी, जिवाणूंचे संवर्धन करणारे त्यांचे शेण आता राहिले नाही. आता सगळीकडे विषाणूंचा प्रसार करणाऱ्या म्हशी दिसत आहेत. चुकीच्या आहारावर पोसल्या जाणारे आपले शरीर अगदी सहज कोणत्याही रोगाला बळी पडत आहे. आपली प्रतिकार क्षमताच कमी होत आहे. एरवी ज्या विषाणूंचा आपल्या शरीरातील रत्त*पेशींनी सहज निकाल लावला असता त्याच विषाणूंपुढे आता त्या शरणागती पत्करीत आहेत. आज आपले शरीर विविध रोगांचे माहेरघर झाले असेल तर त्याला आपली चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि निसर्गाशी आपली तुटत चाललेली नाळ आणि जुने ते सगळे टाकाऊ आणि बुरसटले अशी विचारसरणी हीच कारणे आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली आज आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असू तर निक
भविष्यातच त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, यात शंका नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply