नवीन लेखन...

हिरा आणि काच!



चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा नकली काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते. त्यांना हिरे म्हणून सांभाळण्यात आपण आपला वेळ, पैसा वाया घालविलेला असतो. कालांतराने

आपली चूक आपल्या लक्षात येते, त्यातून झालेल्या आर्थिक हानीतूनही आपण कदाचित सावरू शकू, परंतु गेलेला काळ परत येऊ शकत नाही आणि तिथेच आपले सर्वाधिक नुकसान होते. हे नुकसान टाळता येणे शक्य आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर नकारार्थीच आहे. हे नुकसान कुणालाही टाळता येत नाही. हिरा आणि काचेतला फरक समजून घेण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो द्यावाच लागतो, जी आर्थिक हानी सोसावी लागते ती सोसावीच लागते. फत्त* तीच चूक पुन्हा न करण्याचा शहाणपणा मात्र आपण दाखवू शकतो. ‘खुद के लहू में डूबो लिया हैं उंगलियां मैने, ये कांच के तुकडों को उठाने की सजा हैं! हे असे रत्त*बंबाळ होणे कमी-अधिक प्रमाणात जवळपास सगळ्यांच्याच प्रात्त*नात असते. आपण हिरा म्हणून ज्याला जवळ केले आहे तो हिरा नसून काचेचा तुकडा आहे, हे कळण्यासाठी ज्याला जितका अधिक वेळ लागेल तो तितका अधिक रत्त*बंबाळ होईल आणि ही पारख केवळ अनुभवानेच शिकायला मिळते. कुणीही कुणालाही याबाबतीत काहीही शिकवू शकत नाही. अगदी स्वत:ला ‘जौहरी’ समजणाऱ्यांचीही जिथे अनेकदा फसगत होत असते, तिथे सर्वसामान्यांची काय कथा? आपले अर्धे आयुष्य फसण्यात आणि उर्वरित आयुष्य त्या फसवणुकीतून बोध घेण्यात सरत असते. ही जगरहाटीच आहे. चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा न

ली

काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते. त्यांना हिरे म्हणून सांभाळण्यात आपण आपला वेळ, पैसा वाया घालविलेला असतो. कालांतराने आपली चूक आपल्या लक्षात येते, त्यातून झालेल्या आर्थिक हानीतूनही आपण कदाचित सावरू शकू, परंतु गेलेला काळ परत येऊ शकत नाही आणि तिथेच आपले सर्वाधिक नुकसान होते. हे नुकसान टाळता येणे शक्य आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर नकारार्थीच आहे. हे नुकसान कुणालाही टाळता येत नाही. हिरा आणि काचेतला फरक समजून घेण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो द्यावाच लागतो, जी आर्थिक हानी सोसावी लागते ती सोसावीच लागते. फत्त* तीच चूक पुन्हा न करण्याचा शहाणपणा मात्र आपण दाखवू शकतो. एक वेळ ठेच खावीच लागते, त्यातून कुणाचीही सुटका नाही, कारण आधीच म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी केवळ अनुभवातूनच शिकता येतात. एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाचा नसतो. फत्त* आपण किती लवकर आणि किती प्रमाणात शहाणे होतो यावरच आपल्या होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण ठरत असते. अर्थात हे फार सोपे काम नाही. एकवेळ ठेच खाल्ली म्हणजे शहाणपण येईलच असे नाही, कारण हिऱ्यात आणि काचेत इतके प्रचंड साधर्म्य असते की केवळ सरावाने त्यांच्यातला फरक ओळखणे खूप कठीण जाते. सर्वसामान्यांसाठी तर ते जवळपास अशक्य असते आणि म्हणूनच वारंवार फसविले गेलेल्यांची संख्या खूप मोठी असते. एकदा एका राजाने हिऱ्यासारखेच पैलू पाडलेल्या काचेच्या तुकड्यांमध्ये एक अस्सल हिरा मिसळून हा हिरा ओळखण्याचे आव्हान आपल्या दरबारातील बुद्धिवंतांना दिले. हे आव्हान कुणालाही पेलवले नाही. त्यानंतर राजाने आपल्या राज्यात दवंडी पिटून काचेच्या हिऱ्यांमध्ये दडलेला अस्सल हिरा ओळखणाऱ्याला मोठे बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर केले. तरीदेखील कुणी हा हिरा ओळखू शकले नाही. त्याचदरम्यान एक दिवस एक आंधळा राजाच्या दरबारात आला आणि त्याने आपण तो हिरा वेगळा
ओळखून दाखवू असा दावा केला. हजारो डोळसांना जे जमले नाही ते या आंधळ्याला काय शक्य होणार, असे म्हणत सगळे त्या आंधळ्याला हसू लागले. राजाही विचारात पडला, परंतु त्याने त्या आंधळ्याला संधी द्यायचे ठरविले. हिरा ओळखू शकल्यास बक्षिसासोबतच तो बहुमोल हिरादेखील त्या आंधळ्याला देण्याचे राजाने कबूल केले. त्यानंतर त्या आंधळ्याने ती पुरचुंडी घेतली आणि ते सगळे तुकडे बाहेर नेऊन उन्हात पसरवून दिले. अर्ध्या तासाने त्याने प्रत्येक तुकडा चाचपून पाहिला आणि त्यापैकी एक तुकडा राजाकडे घेऊन आला आणि हाच खरा हिरा असल्याचे सांगितले. तोच खरा हिरा आहे की नाही हे राजालाही सांगता येणार नव्हते. राजाने आपल्या मुख्य जौहरीला त्या तुकड्याला कस लावून बघायला सांगितले. थोड्या वेळाने जौहरीने तोच खरा हिरा असल्याचा निर्वाळा दिला आणि राजासहित सगळेच चाट पडले. एका आंधळ्याने हे कसे ओळखले याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्या आंधळ्याने त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की मी हे सगळे तुकडे उन्हात टाकले. सूर्याची किरणे परावर्तित करण्याची क्षमता काचेपेक्षा हिऱ्यांमध्ये अधिक असते, हे मला माहीत होते. त्यामुळे अर्ध्या तासानंतर मी जेव्हा सगळे तुकडे चाचपून पाहिले तेव्हा इतर सगळ्या तुकड्यांचे तापमान सारखे भासले, फत्त* हाच एक तुकडा अधिक थंड असल्याचे जाणवले. त्यावरून मी हाच अस्सल हिरा असल्याचे अनुमान काढले. त्या आंधळ्याच्या बुद्धिमत्तेवर राजासहित सगळेच खूप खूश झाले आणि राजाने बक्षिसासह त्याचा यथोचित सत्कार केला. सांगायचे तात्पर्य एरवी आपण आपले निर्णय आपल्या पंच ज्ञानेंद्रियातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे घेत असतो किंवा ते ज्ञानच प्रमाण मानत असतो; परंतु प्रत्येक वेळी ते ज्ञान अस्सल असेलच असे नाही. हिरा आणि काचेतला फरक ओळखायचा असेल तर केवळ डोळ्यांवर विसंबून राहता यायचे नाही. अनु

व, चिंतन,

मनन आणि बरेचदा सहाव्या इंद्रियाचा निर्णायक कौलदेखील तितकाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळी हा

कौल आपल्या ज्ञानाशी सुसंगत असेलच असे नाही, बरेचदा तो विसंगतही असतो, परंतु शेवटी तोच खरा ठरतो. आपला हा नेहमीचा अनुभव आहे की एखादी व्यत्त*ी आपल्याला काहीही कारण नसताना आवडते आणि एखाद्या व्यत्त*ीबद्दल आपल्या मनात विनाकारण आकस असतो. हा जो प्रकार आहे तो ज्याला मन किंवा अजून काय म्हणायचे ते म्हणा, परंतु त्या सहाव्या इंद्रियामुळेच घडून येतो. याचा अर्थ एवढाच की आपण आपल्या ज्या ज्ञानेंद्रियांवर विसंबून राहतो ते आपल्याला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देतीलच असे नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांचा आवाकाही मर्यादित आहे. आकलनाची व्याप्ती त्यापलीकडेही आहे. तसे नसते तर आपली फसगत झालीच नसते. तसे नसते तर आपल्या डोळ्यांना हिरा आणि काचेतला फरक सहज ओळखता आला असता; परंतु तसे होत नाही, हे आपले दुर्दैव किंवा आपल्या मर्यादा म्हणायला हव्या. याचमुळे समाजाच्या विविध क्षेत्रातील हिरे कुठेतरी अडगळीत पडून असतात आणि नकली हिऱ्यांना, काचेच्या तुकड्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचत असतो. जेव्हा सत्याच्या आगीत पोळले जाते तेव्हा जे सोने असते ते अधिक निखरते आणि पितळ पार वितळून जाते. फत्त* जोपर्यंत अशा आगीत पोळले जात नाही तोपर्यंत आपण पितळाला सोन्याचे स्थान देऊन आपले काय नुकसान करायचे ते करून घेत असतो. दुर्दैवाने आज समाजात नकली हिऱ्यांचा आणि पितळांचाच अधिक बोलबाला आहे. त्यांचा हा ढोंगीपणा ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाही किंवा जेव्हा त्यांचा ढोंगीपणा उघड होतो तोपर्यंत आपले बरेच नुकसान होऊन गलेले असते. हे नुकसान केवळ आपली नजर ‘तयार’ करूनच टाळता येईल. प्रत्येक माणूस एखाद्या हिमनगासारखा असतो, जितका वर दिसतो त्यापेक्षा सातपट तो अदृष्य असतो. त्याच्या वरवरच्या दिसण्याला भुलू
न अनेकांची फसगत होऊ शकते. ही फसगत टाळता आली, हिरा आणि काच यातील फरक तत्काळ ओळखता आला तर हे जग किती सुखी आणि सुंदर होईल!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..