आजचा 1 मे दिन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा
कामगारांच्या अस्तित्वाची दखल घेण्याचा…
आजच्या दिवशी आमचा महाराष्ट्र झाला 54 वर्षाचा
पण त्याला इतिहास आहे ह्जारो वर्षाचा
जो प्रयत्न करूया आपण जाणण्याचा…
महाराष्ट्राच्या भुमितच
जन्माला आलेल्या ह्जारो संताना, विचारवंतांना,
कलाकारांना, राजकारण्यांना,
समाजसेवकांना
आणि कष्टकरी कामगारांना
प्रयत्न करूया आपण स्मरण्याचा…
महाराष्ट्राच्या
जडणघडणीत अतिशय मह्त्वाचा वाटा असणार्या
येथे झालेल्या ह्जारो कामगार चळ्वळी
प्रयत्न करूया आपण आठविण्याचा…
महाराष्ट्र
देशातील एक महा आणि महान राज्य आहे,
आपण त्याचे सुपुत्र आहोत
आपण अहोरात्र सज्ज असयलाव हवं
आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी
याची जाणिव स्वतःच स्वतःला
प्रयत्न करूया आपण करून देण्याचा …
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्ह्णून
आपल्या प्राणाचे बलिदान देत हुताम्य पत्करलेल्या
106 महाराष्ट्राच्या सुपुत्रां समोर मनापासून
प्रयत्न करूया आपण नतमस्तक होण्याचा …
— निलेश बामणे ( एन.डी )
Leave a Reply