द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, कारण हे पोषकतत्त्वांनी युक्त असतात. हे शारीरिक बळ वाढवणारे असतात. द्राक्षांचे वानस्पतिक नाव विटिस विनीफेरा आहे. द्राक्षांचे औषधी गुण पाहून म्हटले जाऊ शकते की, हे फळ रोग्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
100 ग्राम द्राक्षांमध्ये जवळपास 85.5 ग्राम पाणी, 10.2 ग्राम कार्बोहायड्रेड्स, 0.8 ग्राम प्रोटीन, 0.1 ग्राम चरबी, 0.03 ग्राम कॅल्शियम, 0.02 ग्राम फॉस्फोरस, 0.4 मिलीग्राम आयरन, 50 मिलीग्राम व्हिटॅमिन, 10 मिलीग्राम व्हिटॅमिन सी, 8.4 मिलीग्राम व्हिटॅमिन पी, 100 ते 600 मिलीग्राम टॅनिन, 0.72 ग्राम टार्टरिक अम्ल असते. याव्यतिरिक्त क्लोराइड, पोटॅशियम क्लोरायइड, पोटॅशियम सल्फेट आणि एल्युमिन व इतर काही महत्त्वाचे पोषकतत्त्व उपलब्ध असतात.
जाणुन घेऊया द्राक्षांविषयीच्या काही पारंपारिक उपायांविषयी…
1. डांग गुजराचे अदिवासी मानतात की, रोज सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे द्राक्षांचा रस भोजना नंतर सेवन केला तर बुध्दी आणि स्मरणशक्तीचा विकास होतो.
2. द्राक्षे शरीरातील क्षारीय तत्त्व वाढवते. याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, जॉइंट पेन, रक्तांच्या गाठी होणे, दमा आणि त्वचेवर लाल डाग येणे अशा समस्या दूर होतात. द्राक्षांचे सेवन केल्याने आतडे, लीव्हर पचनसंबंधीत अडचणी, रक्ताची उलटी होणे, बध्दकोष्ट, मूत्राच्या समस्या, अतिसार, टीबी इत्यादी रोगांमध्ये हे विशेषरुपात फायदेशीर असते.
3. रक्ताची कमतरता असल्यावर द्राक्षांच्या एक ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
4. एका संशोधनास समोर आले आहे की, द्राक्षे ब्रेस्ट कँसरला थांबवण्यात मदत करतात. द्राक्षांमध्ये अँटी कँसर तत्त्व उपस्थित असतात. जे कँसर थांबवण्यात मदत करतात.
5. रोज सकाळी 200 ग्राम द्राक्षांचा ज्यूस प्यायल्याने लघवीच्या माध्यमातून किडनी स्टोन बाहेर येतो. डांगचे अदिवासी हाच फार्मुला मायग्रेनच्या रोग्यांसाठी रामबाण मानतात.
6. अंडकोषांच्या(टेस्टीकल्स) सूजला दूर करण्यासाठी अदिवासी द्राक्षांच्या पानांना तुप लावून गरम करतात. हकल्या गरम पानांनी ते अंडकोषांना शेकतात, ज्यामुळे सूज उतरते.
7. पोटातील उष्णता शांत करण्यासाठी 20-25 द्राक्षे रात्री पाण्यात भीजवा. सकाळी कुस्करुन पिळून घ्या. या रसमध्ये थोडीशी साखर मिसळा, आराम मिळेल.
8. चेह-यावर पिंपल्स आणि फुनश्यांना कोरडे करण्यास द्राक्ष मदत करते. अंगूरच्या रसाने गुळण्या केल्याने तोड आल्याची समस्या दूर होते.
9. द्राक्ष आणि मोसंबीचा रस समान प्रमाणात मिक्स करुन घेतल्याने मासिक पाळी संबंधीत अनियमितता दूर होते.
10. 50 ग्राम द्राक्षांचा रस गरम करुन दम्याच्या रुग्णांना प्यायला द्या. असे केल्याने रुग्णाची श्वास घेण्याची गति सामान्य होईल. असे कमीत कमी एक महिना तरी अवश्य करुन पाहावे.
11. अनेक अदिवासी भागात लहान मुलांचे दात निघताना त्यांना द्राक्षांच्या रसामध्ये मध टाकून दिले जाते. असे केल्याने दात लवकर उगवतात आणि वेदना देखील होत नाही.
— आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन
Thank You So much For this great information about Grapes farming..I also give more information through this website…https://shrimahalaxmispreyers.com/
Nice i like it