MENU
नवीन लेखन...

नटरंग चित्रपटाची अकरा वर्षे

नटरंग चित्रपट १ जानेवारी २०१० ला प्रदर्शित झाला.

अजय – अतुलचे संगीत, गुरू ठाकूर यांचे संवाद व गीतलेखन, झी मराठीची सहनिर्मिती आणि रवी जाधव यांचं दिग्दर्शकीय पदार्पण व रवी जाधव, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) यांचा अभिनय या सगळ्याचा सहभाग असल्याने हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला व या चित्रपटाने अनेक पुरस्कार सुद्धा पटकावले. लेखक आनंद यादव यांच्या ‘ नटरंग ‘ याच पुस्तकावर आधारित आणि खुद्द मराठी चित्रपट सृष्टीत ज्यांनी ‘ नाच्या ‘ हा रोल अजरामर केला ते दिवंगत कलाकार गणपत पाटील यांच्याही आयुष्यातला थोडासा भाग ! ( खुद्द गणपत पाटील यांनीही ‘रंग नटेश्वराचे’ नामक आत्मचरित्र लिहिलेले आहे !) यावर आधारित चित्रपटाची कथा लिहिली गेली, रचली गेली, चितारली गेली आणि पडद्यावर ती यशस्वी सुद्धा करून दाखवली गेली. सोबत गुरु ठाकूर यांचे उत्तम गीतलेखन सुद्धा होतेच !

सगळी गाणी तुफान गाजली. अजय – अतुल यांनी जुन्या काळातली विषय असूनही आजच्याही प्रेक्षकांना आवडतील अशा एकाहून एक सुरेख, सुरेल रचना त्यांनी बांधल्या. तसेच फुलवा खामकरने केले नृत्य दिग्दर्शन लाजबाब होते. अतुल कुलकर्णी सोबत किशोर कदम, सोनाली कुलकर्णी, प्रिया बेर्डे, विभावरी देशपांडे, नंदकिशोर चौगुले, मिलिंद शिंदे, उदय सबनीस, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील देव, राजेश भोसले, संदेश जाधव, गणेश रेवडेकर, गुरू ठाकूर आदी सर्वांनी उत्तम अभिनय साकारला होता.

तमाशा, लावणीचा छंद जडलेला एक कोल्हापुरी पैलवान गुणा कागलकर ! जो शेतात राबतोय, आपले वडील, बायको, मुलांसोबत राहतोय, तो आणि त्याची काही कलासक्त मंडळी या तमाशा प्रकारात काहीतरी ठरवू पाहतात, यात त्यांची भेट होते ती पांडबाची, ज्याला या क्षेत्रातील चांगला अनुभव आहे, त्याच्या मार्गदर्शनपर ते प्रयत्न करतात, एवढ्यात त्यांची भेट होते ती यमुनाबाई व त्यांची लेक नयनाची, या दोघी मायलेकी त्यांना ‘ तमाशा ‘ शिकवतात ! सगळं काही ओके होत असताना, तमाशा प्रकारात एक महत्त्वाची कामगिरी असते ती ‘ नाच्याची ‘, आणि नेमकी हीच भूमिका गुणा कागलकरला निभवावी लागते. एक रांगडा पैलवान काळाच्या ओघात ‘ नाच्या ‘ बनतो ! पत्नी दुखावते, सासरेबुवा नाराज होतात, ओळखी पाळखीचे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष अपमान करतात. आणि अशातच २/ ३ घटना अशा घडतात की गुणा कागलकरला गृहत्याग करावा लागतो, वडीलही देवाघरी जातात, तमाशाचा फड विघ्नसंतोषी लोकांकडून उधळला जातो ! सगळं काही उद्ध्वस्त होतं तरीही गुणा कागलकर उभा राहण्याचा प्रयत्न करतो, पांडबालाही विनंती करतो पण पांडबा मनाने तुटलेला असतो, नकार देतो पण त्याला साथ देते ती नयना कोल्हापूरकरीण ! जी त्याची कलाक्षेत्रातली पार्टनर बनता बनता त्याच्यावर प्रेम सुद्धा करू लागते आणि पुन्हा नव्याने उन्मळून पडलेला ‘ कलेचा कल्पतरू ‘वाढवण्यास ते तयार होतात कारण त्यांच्या इराद्याची मुळे पक्की असतात, मजबूत असतात! अशी याची कथा.

झी टॉकीज व रवी जाधव यांनी बनवलेला २०१० हा चित्रपट क्लासीक होता असे नक्की म्हणता येते, व हा सिनेमा रसिकांच्या मनात अजूनही घर करून आहे व पुढेही अनेक दशके राहील.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..