देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.
पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.
ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील ९११ आणि इंग्लंडमधील ९९९ या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही ११२ हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.
तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे ११२ या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर ११२ नंबर सेव्ह करता येईल.
Leave a Reply