(एकूण २ भागात)
भाग पहिला..-
पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..!
याच अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे ‘१३’ या आकड्याला अशुभ मानणं..या आकड्याला अशुभ का मानतात याची उत्तरं त्या त्या संस्कृती देतातच पण आपल्या भारतातही त्याला समर्पक उत्तर सापडतं..! फरक केवळ इतकांच की ‘१३’ या संख्येने भारतात लघुरूप धारण करून ‘४’ हे रूप घेतलंय..आणि या ‘४’ चे जे प्रताप रोजच्या आयुष्यात अनुभवायला ते खरोखर मनोरंजक आहेत..
पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते.
भारतात १३ हा जरी अशुभ मनाला गेलेला नाहीय तरी भारतीय ज्योतिष शास्त्रात १३ ची बेरीज ४ ही ‘लग्नाच्या’ बाबतीत अशुभ मानतात. ज्योतिषश्रद्धेनुसार ४ हा आकडा ‘हर्शल’ या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ‘हर्शल’ ग्रहाचा शोध हा तुलनेने अगदी अलीकडे लागलेला असल्यामुळे त्याची प्रकृती आणि प्रवृत्ती वैज्ञानिक आहे असे मानले गेलेय. या संख्येच्या प्रभावाचा अनुभव आपल्यालाही घेता येईल.
ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेची बेरीज (dd-mm-yyyy) ४ येते किंवा ज्यांच्या जन्म तारखेत ४ ही संख्या एकापेक्षा अधिक वेळा आहे त्यांच्या बाबतीत हा प्रभाव जाणवतो. ‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाही (१२.०१.१८६३ = ४). कोणीतरी सांगतो, किंवा पोथीत असे लिहिलेय वा अशी प्रथा-परंपरा आहे म्हणून तो कोणतीही गोष्ट करणार नाही. धर्म, प्रथा, परंपरा याचा नीट विचार करून जर त्याच्या बुद्धीला ते पटले तरच ‘हर्शल’ करणार अन्यथा जमाना कितीही बोंब मरूदे तो ऐकणार नाही..एकाच गोष्टीची नव्याने मांडणी करण्यात हे लोक आघाडीवर असतात..लक्षात घ्या, तुम्ही-आम्ही मळलेल्या वाटेवरून चालणारी नव्हे तर अशीच माणसे इतिहास घडवतात..!!
हर्शल प्रचंड बुद्धिमान आहे. कधी कधी ही बुद्धिमत्ता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने विक्षिप्तपणाकडे झुकलेली वाटते. हे जे विचार करतात ते आपल्या कल्पनेतही येऊ शकणार नाहीत. म्हणून यांना समाजात ‘लहरी’ whimsical ठरवले जाते. हे काळाच्या खूप पुढे असतात. बुद्धीच्या कसोटीवर न टिकणारी कोणतीही गोष्ट हे करणार नाहीत.
(भाग २ लवकरच येतोय )
-गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१
Leave a Reply