मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोचला आहे. मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेल्या मल्लखांबाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची स्थापना १५ जून १९८१ रोजी झाली. त्याचप्रमाणे, बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा तिसरा खंड १९३२ मध्ये प्रकाशित झाला.
व्यायाम ज्ञानकोश खंड क्र ३ (मल्लखांब) ह्यात दिलेल्या माहितीनुसार, मल्लखांबाचे आद्यगुरू बाळंभट दादा देवधर ह्यांना श्री हनुमानाने ही विद्या शिकवण्यासाठी दिलेल्या दृष्टांताची तारीखसुद्धा पंचांगाशी जुळवल्यानंतर १५ जूनच्या आसपासचीच येते. त्यामुळे १५ जून ह्या तारखेचे औचित्य साधून, संघटनेने २०१७ पासून १५ जून हा दिवस “मल्लखांब दिन” म्हणून साजरा करायचे ठरवले. मल्लखांबाचा प्रचार, प्रसार ह्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे, जुन्या खेळाडूंना ह्या खेळामध्ये परत बोलावणे, जेणेकरून मल्लखांबाचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक परत एकत्र येऊन मल्लखांबाची प्रगती अजूनही जोरात होईल, असे प्रयत्न आहेत.
शरद केळकर
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply