नवीन लेखन...

१८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

18 April 1975 - Marathi Movie "Samana" Released

१८ एप्रिल १९७५ रोजी “सामना” मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील “सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा ‘सामना’ हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. “सामना” चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. ‘या टोपीखाली दडलंय काय’ या गाण्यात ‘पप्पा……… ‘ स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा ‘सामना’ खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा ‘माईलस्टोन’ सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.

सामना १९७५ सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू

निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
दिग्दर्शक :जब्बार पटेल
कथा :विजय तेंडुलकर
पटकथा :विजय तेंडुलकर
संवाद :विजय तेंडुलकर
संगीत :भास्कर चंदावरकर
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :शा. वैद्य
गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :निवृत्त दळवी
वेषभूषा :पांडुरंग खटावकर
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज

कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा

पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू

गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट 

खालील लिंक क्लिक करून “सामना‘ चित्रपट बघू शकता.

https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on १८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

    • मला ही हा चित्रपट पहायचा आहे कुठे online किंवा लीक मिळेल
      का या बाबत मार्गदर्शन करावे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..