१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक “सही रे सही”
केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.
मधल्या काळात ते नाटक रंगभूमीपासून दूर होतं. पण, ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’ च्या वतीनं पुन्हा सही रे सही’चे प्रयोग दणक्यात सुरू झाले. रंगमंचावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच वेळी चार ठिकाणी भरत जाधव दाखवण्याची किमया नाटकानं केली. भरत जाधव या नाटकामध्ये मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा चार व्यक्तिरेखा साकारतात. या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती.
गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते. ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply