एक वर्ष संपले आणि दुसर वर्ष नवीन संधी घेऊन दारात उभे आहे. त्याचे स्वागत तर करायला हवे पण त्याअगोदर सरत्या वर्षाचा हिशोब एकदा मांडू.
हिशोब म्हणजे पैशाचा नाही कारण आजवर तो हिशोब कधी जमलाच नाही. गेल्या वर्षात किती कमावलं आणि किती गमावलं, किती सुख उपभोगल आणि किती दुख सहन केल, किती माणस जोडली आणि किती माणस तुटली, ह्याचा ताळेबंद तर मांडायलाच हवा.
मागे वळून पाहिले तेव्हा हे वर्ष तस सुख देऊनच गेल, वैयक्तिक प्रगतीच झाली पण काही आशा अजूनही मनात तशाच राहिल्या आहेत. थोडे मनाने सुद्धा अनेकदा निराशेचे सूर गायले परंतु सभोवतालच्या माणसांमुळे लढायची जिद्द अजून आहे. वर्षभरात मनाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टी घडून आल्या. गेले पूर्ण वर्ष Whats app वरील जवळ जवळ २०० गृप्सला व Facebook ला पोस्ट टाकत आहे. Whats app वरील कानसेन समूहाचे दुसरे स्नेहसंमेलन पार पडले. Whats app, Facebook मुळे नवीन मित्र जोडले गेले, अनेक कलाकारांच्या ओळखी झाल्या. नव्याने जोडल्या गेलेल्या मित्र-मंडळीमुळे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे सर्व काही घडून आल.
हिशोब पहिला तर जमेच्याच बाजू आहेत सगळ्या, पण मनात राहिलेल्या काही अपूर्ण इच्छांचे काय करणार?? पण हा मानवी गुणधर्म आहे. वर्ष संपले तर ह्या अपूर्ण इच्छा मागे ठेवून पुढे जायचं का?? नाही अस नाही.. तर पुढल्या वर्षात पूर्ण करण्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन जायचे. जगण्याची लढाई अशीच चालू ठेवायची आहे.
वर्षभरात तुम्ही जो काही मला, माझ्या पोस्टना, माझ्या व्यवसायाला प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वाना सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
Leave a Reply