नवीन लेखन...

२२ जून १८९७…. गोंद्या आला रे…

आज २२ जून २०२१. या घटनेला १२४ वर्षे झाली.

२२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते. चाफेकर बंधूंच्या या साहसाला, या अतुलनीय पराक्रमाला त्रिवार वंदन.

२२ जून आला की लोकांना हटकून चाफेकर बंधू – रॅंड आयर्स्ट – गणेशखिंड – ‘गोंद्या आला रे’ वगैरे गोष्टी आठवतात. वर्षोनवर्षे हेच सुरु आहे. चार ओळी श्रध्दांजली फेसबुकवर ‘फेकली’ की आपलं ‘राष्ट्रीय कर्तव्य’ झालं! हे न करता मी आज काहीतरी वेगळं लिहीतोय.

वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं. १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच – खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने मुंबईला जाण्यासाठी ‘व्हिक्टोरीया’ जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)

त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £१८७ व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती आयर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत.
दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या. ह्या पुढे ६० वर्षे – म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या – १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट – माझ्यामते २२ जूनची ही खरी शोकांतिका आहे!

संकेत कुलकर्णी (लंडन)

संकलन: संजीव वेलणकर

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..