नवीन लेखन...

आशा भोसले यांच्याशी संबंधित २५ रंजक गोष्टी

25 Interesting Facts about Asha Bhosale

1) ‘मेलडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे.

2) 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती.

3) आशा भोसले यांनी आतापर्यंत एक हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

4) तर आपण 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं आशाबाईंनी 2006 मध्ये सांगितलं होतं.

5) गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.

6) भारत सरकाराने या महान गायिकेचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे.

7) आशा भोसले यांनी फक्त गायनातच नाही तर अभिनयातही झलक दाखवली. त्यांनी ‘माई’ चित्रपटात अभिनय केला होता आणि त्यांची कौतुकही झालं होतं.

8) आशा भोसलेंच्या करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत.

9) आशाताईंना दुसऱ्या दर्जांच्या सिनेमांची गायिका समजलं जात असे. विशेषत: व्हॅम्प किंवा सहअभिनेत्रींवर चित्रीत केलेली गाणीच त्यांना मिळत असत.

10) आशाताईंनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधली होती.

11) गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. त्यामुळे लता मंगेशकरांसह त्यांचं कुटुंब या लग्नाच्याविरोधात होते. पण आशाताई विरोधासमोर झुकल्या नाहीत. यामुळे लतादीदी आणि आशाताई यांच्या संबंधात कटुता आली आणि अनेक वर्ष त्यांच्यात अबोला होता.

12) गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत असून तो पायलट होता. त्यानंतर त्याने संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होती. तर सर्वात लहान मुलगा आनंदने बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आता तो आशाताईंचा व्यवसाय पाहतात. आशा भोसले यांची मुलगी वर्षाने वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती.

13) गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशाताईंनी महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्यासोबत संसार थाटला. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं.

14) आशा भोसले उत्तम गायिका तर आहेतच सुगरणही आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी बनवून आणण्याची मागणी करत.

15) एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या की, जर गायिका म्हणून यशस्वी झाले नसते तर मी कूक नक्कीच झाले असते.

16) आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा बिझनेस जबरदस्त चालतो. दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचे रेस्टॉरंट आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांचे रेस्टॉरंट आहेत.

17) रेस्टॉरंटची सजावट आणि तिथल्या जेवणाकडे आशाताईंचं विशेष लक्ष असतं. तिथल्या शेफना त्यांनी सुमारे सहा महिन्यांचं ट्रेनिंग दिलं आहे

18) आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूक रसेलं स्कॉट यांनी आशा ब्रॅण्डचे अधिकार ब्रिटनसाठी खरेदी केले आहेत. त्यांच्या प्लॅनिंगनुसार पाच वर्षांमध्ये ‘आशा’ नावाचे 40 रेस्टॉरंट उघडले जातील.

19) बालपणी आशा त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर यांच्या अतिशय जवळ होत्या. लतादीदी आशा भोसलेंना शाळेत घेऊन जात असत. पण एकीच्या फीमध्ये दोघींना शिकवू शकत नसल्याचं शिक्षकाने सांगितलं आणि यामुळे लतादीदींनी शिक्षण सोडलं.

20) ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडीकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं.

21) आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

22) अदनान सामी जेव्हा दहा वर्षांचे होते तेव्हा आशाताईंनी त्याला गाण्यात करिअर करण्याचा सल्ला दिला होता.

23) आशा भोसले एक महान गायिका तर आहेतच पण त्या उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहेत. त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची उत्तम नक्कल करतात.

24) आशा भोसले यांनी सुरुवातील ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार केला होता. त्यांना वेस्टर्न पॅटर्नचं गाणं गाण्यासाठी कठीण वाटत होतं.

25) आशा भोसले या पहिल्याच अशा गायिका आहेत, ज्यांना उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अलबमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

संदर्भ – इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..