नवीन लेखन...

३ बौद्ध philosophies

‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात…

१) किती भरभरून प्रेम केलंय,
२) किती सहजपणे जीवन जगलोय, आणि
३) ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत, त्या gracefully सोडून देणे..

संवाद सुरू झाला तसं, प्रत्येक फिल्म काही तरी philosophy जाता जाता मारायचा प्रयत्न करत असते, तशीच ह्यांचीही एक असं मनात आलंच, …पण ह्यात काहीतरी खूप खास आणि विचार करण्यासारखं होतं नक्कीच. मला पुढे सिनेमा पाहवेना. डोक्यातून ही तीन वाक्य जाता जाईनात.

पाहिलं तर वरवर कित्ती सोपं वाटतं! प्रेम काय आपण करतोच की.. आपल्या प्रत्येक प्रेमाच्या व्यक्तीवर.. आपल्या जवळच्या, आवडत्या व्यक्तींवर.. त्यात आहे काय मोठं ‘बुद्धांनी’ सांगण्या-सारखं? मग काही काळाने त्याचा खुलासा झाला.. आपल्या आवडत्या, मनासारख्या व्यक्तीवर प्रेम कुणीही करू शकतो. जो आपल्याला हवा तसा नाहीये, पेक्षा अगदी ज्याला पाहूनही संताप येईल कदाचित, अशा व्यक्तीशी आपण प्रेमाचा व्यवहार करू शकू का?

आणि इथे दुसरा मुद्दा येतो, की हे कसं व्हावं.. तर अगदी सहज! कुणाच्याही लक्षात न येता..! म्हणजे अजूनच कठीण!! म्हणजे आपल्याकडे ‘सर्वांभूती देव पाहावा’ म्हणतात ना, ते याच अर्थी असलं पाहिजे. सगळीकडे, सर्वांमध्ये जर का ‘देव’ पाहू शकलो आपण, तर आपला व्यवहार सर्वांशी, साहजिकच, प्रेमाचा राहील.. कठीण वाटतंय, पण जमवता आलं पाहिजे असंही वाटलं.

तसंच, आपण अपल्या वाट्याला आलेलं जीवन (मनाविरुद्ध असलं तरी), संपूर्ण acceptanceने, अगदी सहजपणे जगू शकतो का? Rather जर का खरंच हे कौशल्य साध्य करू शकलो, हसतमुखाने, तर आपल्या सोबतच्या इतरांचं जगणं देखील आपण कित्ती सुखकर बनवू शकू! नाही का!? प्रयत्न करायला तरी हरकत नाही!

हे सगळं जमवणं आपल्याला थोडं अजून सोपं होतं, जेंव्हा आपण अक्षरशः ‘नसते हट्ट’ सोडून देतो! तिसरा मुद्दा इथे घेऊन येतो. हां, आपली स्वप्न असावीत, जीवनाकडून महत्त्वाकांक्षा असाव्यात, आपल्या ध्येयाच्या दिशेने अविश्रांत चळवळ चालू ठेवावी. तरीही कुठे, नि कधी थांबलं पाहीजे, आणि विनयाने माघार घेतली पाहीजे, हे ही आपल्याला कळालं पाहीजे. हे समजल्यावर अगदी शांतपणे, सहजपणे तसं वागताही आलं पाहीजे.
ते लहान मुलांचं कसं होतं ना, शेजाऱ्यांच्या घरी गेल्यावर, आपण सांगत असतो, की “बाळा ते खेळणं आपलं नाहीये की नई…घरी गेल्यावर तू तुझं घेऊन खेळ हो..” पण बाळाला काही ते पटत नाही. अगदी एखाद्या बाळाला कळेल ही कदाचित, की ‘हे आपलं नाहीये’, पण आता हे हातचं सोडवत नाही, त्याचं काय!? खरा शहाणा तो ठरतो, जो तिथे गेल्यावर, त्याच्या परवानगीने, थोडावेळ खेळून, समाधानी मनाने आपलं-आपलं जे जसं आहे, तिथे शांतपणे येऊन, सुखासुखी रमून जातो.

मनाचं काय, त्याला वळण लावायचंच ठरवलं, तर ते लावून घेतंही! आपलीच जिद्द तेवढी सशक्त पाहीजे. स्वाभाविक ईच्छा तर मूलभूत पाहीजे. नाही तर मग ‘बुद्ध’ बुद्ध होते, आपण नाही, असं म्हणून सोडून देणं तर सर्वात सोप्पंच आहे!

हंपी पुढे पहायचा आहेच. हे तीन मंत्र मात्र अगदी दररोजच्या जगण्या वागण्याला एक नवी, किंवा नववी दिशा देऊन गेले…

— प्रज्ञा वझे घारपुरे

३ ऑगस्ट २०१९ 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..