नवीन लेखन...

३१ मे – “वर्ल्ड नो टोबॅको डे”….निमित्ताने ( तंबाखूचे अर्थकारण व आरोग्य )

३१ मे “वर्ल्ड नो टोबॅको डे” ही एका दिवसाची नवलाई न राहता जगातील तंबाखु व्यसनी माणसांनी कायम स्वरूपी रोजच्या जीवनात आमलात आणली तर त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक बचत व आरोग्याची काळजी घेतली जाईल. पण किती जणांना या बद्दल माहिती आहे? जे तंबाखूचे व्यसन करतात त्यांच्या बद्दल बोलतच नाही कारण त्यांना या विषयी जेवढे अज्ञान दावता येईल तेवढे ते दाखवतील पण शासन यंत्रणेने तरी या विषयात रस घेऊन समाज्याच्या स्वास्थाची काळजी घ्यावी असे वाटते. असो.

आपल्या मराठी भाषेत एक म्हंण आहे “पिकतं तेथे विकत नसतं” पण तंबाखूबद्दल अपवाद आहे. तंबाखू हे नगदी पीक असल्याने त्याची लागवड व विक्री आपल्या देशात होतेच पण परदेशातही निर्यात केली जाते. तंबाखूला आपल्या देशात चांगली मागणी आहे.

४०० वर्षापूर्वी पोर्तुगिज व्यापार्यांनी तंबाखू प्रथम भारतात आणला. विक्रीयोग्य महत्वाची वस्तू म्हणून तंबाखूचा व्यापार १७व्या शतकात गोवा राज्यातून सूरू झाला. भारताचा तंबाखू उत्पादनात जगात तिसरा नंबर लागतो. तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनेही भारतात जास्त प्रमाणात वापरली जातात. तंबाखूचा व्यापार भारतात आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा व्यवसाय ग्रामिण विकासाला मदत करतो. तंबाखू आणि त्यापासून बनविलेली उत्पादने विविध देशांना निर्यात केल्याने मोठया प्रमाणावर परकिय चलन मिळते.

तंबाखूचे वार्षिक उत्पादन ५८०००० मेट्रिक टन आहे. जवजवळ १२ लाख लोख तंबाखू उत्पादनात गुंतले आहेत. भारतात विडी बनविण्याचा गृहउद्योग मोठया प्रमाणावर चालतो. जवळजवळ ५ लाख लोक तंबाखूच्या व्यापारात गुंतले आहेत. तंबाखू आणि तंबाखूयुक्त सिगारेट, विडी, जर्दा आता तरूणाई चिलिम हुक्यांच्या पबमध्ये जायला लागले आहेत व सिगार इत्यादी वस्तुंना भारतात प्रचंड मागणी आहे.

तंबाखू पासून मिळणारा महसूल सर्व करांच्या ८.८ टक्के सिमाशुल्क कर सिगारेटवर तर

३.३ टक्के कर विडी,

सिगार व इतर तंबाखू उत्पादनातून मिळतो. तंबाखूचे उत्पादन हे चीन, ब्राझील, श्रीलंका व भारतात जास्त प्रमाणात घेतले जाते. तंबाखू पासून सिगारेट, सिगार, विडया, गुटका व काही किटक नाशके बनविली जातात.

भारतातून तंबाखूची निर्यात भारतात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंच्या मागणीवर तंबाखू निर्यात अवलंबून आहे. परंतू तंबाखूच्या पानांच्या निर्यातीतून जास्त पैसा मिळत असल्याने तंबाखूच्या पानांची निर्यात ९९ टक्के वाढली आहे पण सिगारेटची निर्यात ७६ टक्यांनी घसरली आहे.

आपल्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्हयात विडीचा व्यवसाय अगदी घरोघरी चालतो. “बॉन्डेड लेबर” कायदा अस्तित्वात असून सुद्धा सोलापूर शहर जिल्हा तालूका व गावखेडयात मोठया माणसांच्या बरोबरीने स्त्रिया व लहान मुले या व्यवसायात घरगुती व्यवसाय म्हणा किंवा पारंपारीक व्यवसाय म्हणा पण आहेत. कैक लाख कुटुंबाचा आर्थिक डोलारा हा या विडी वळण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच देशात बर्‍याच राज्यात विडया बनविण्याचा व्यवसाय चालतो.

भारतात कायदे बनविले जातात पण कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. असा कायदा आहे की १४ वर्षा खालील मुलांनी कामे करू नयेत पण प्रत्यक्षात एका तरी राज्यात अमलात येतो का? तुम्ही कोठल्याही शहरात किंवा खेडयात जा तुंम्हाला मुले धाबा, पेट्रोल पंप, हॉटेल, विटभट्टी किंवा घराघरातून कामे करतांना दिसतील. गर्भलिंग चाचणीला र्निबंध आहे पण कायदा पाळला जातो का? नाही. याला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे प्रचंड लोकसंख्या व न संपणार्‍या गरजा.

भारतात तंबाखू खाण्याचे व विडी/सिगारेट ओढण्याचे प्रमाण कित्येक दशके सर्वच थरात खूप आहे. कुठलेही व्यसन गरीब/श्रीमंत स्त्री/पुरूष लहान/मोठा असा भेदाभेद करीत नाही. काही माणसांना तंबाखूचे व्यसन कुतूहल, संगत, आकर्षण, नैराष्य, आदर्श आणि सवय या कारणांनी लागते. तंबाखूत अनेक विषारी घटका बरोबरीने मुख्यता निकोटीन हा विषारी घटक असतो व तो आपल्या शरिराचे विषेशतः श्वासनलिका, फुफ्फुस व इतर अवयवांचे जसे अन्ननलिका, यकृत व हृदय यांचे खूप नुकसान करतो. असो.

तंबाखूचे व्यसन अगदी सर्व जगभर पसरले आहे. जगात १.३ अब्ज सिगरेट ओढणारे आहेत. त्यातील ८० टक्के हे विकसनशिल देशातील आहेत त्यातील ३ कोटी पेक्षा जास्त सिगारेट ओढणारे भारतात आहेत यात ५ लाख मुले आहेत आणि मुलीही कमी नाहीत. दरवर्षी ५५००० मुले तंबाखूच्या आहारी जातात किंवा तंबाखू खातात. तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी ४ लाख लोक मृत्यु पावतात. जनतेचे हित लक्षात घेऊन कायद्याने सिगारेटच्या पाकिटावर हिंन्दी व इंग्रजी भाषेतून तंबाखूचे दुष्परिणाम उध्रुत करणे बंधनकारक केले तरी तंबाखू व त्याच्या इतर उत्पादनांच्या मागणीत काही बदल झाल्याचे निदर्शनास येत नाही.

भारतात तंबाखू पासून बनविलेली सर्व उत्पादने सार्वननिक ठिकाणी जाळून ओढण्यास व पिण्यास बंदी घातली आहे हॉटेल, सर्वप्रकारची कार्यालये, न्यायालये, बँका, शाळा/कॉलेजेस्, ग्रंथालये, चित्रपटगृहे, दुकाने, मॉल, बगिचे, रेल्वेस्टेशन्स, विमानतळे, बसथांबे, बसेस, रिक्षा व टॅक्सी. या कायद्याचा भंग केल्यास फक्त रू.२०० दंड आहे. मला वाटते की कुठलाही कायदा केल्याने समस्या सुटत नसते उलट कायदा कसा मोडला यातच शहाणपण व पुषार्थ केल्यासारखा वाटतो. यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे व त्यासाठी सर्व एन्जीओज् सामजिक संस्था याकामी उपयोगी पडू शकतात.

तंबाखूचे अर्थकारण व आरोग्य याकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे कारण तंबाखू व त्या अनुशंगाने येणार्‍या सर्व उत्पादनांच्या विक्री, निर्यात व करापोटी मिळणारे उत्पन्नाच्या हव्यासापोटी जनतेच्या आरोग्याकडे लक्षणीय हेळसांड होत आहे. ती थांबवणे मोठे जिकरीचे काम आहे कारण त्या व्यवसायात गुंतलेल्या सर्व व्यापारी व कामगारांना त्यांच्या व इतर माणसांच्या शारिरावर होणारे विपरीत परिणाम विश्वासात घेऊन समजाउन सांगावे लागतील. हळूहळू सर्व तंबाखू शेती व उत्पादने

कमी कमी करायला हवीत. ह्या व्यवसायात गुंतलेल्यांचे

पुनर्वसन करणे गरजेचे आहे त्यासाठी तातडीने नवीन कामधंदा व मनामध्ये विश्वास उत्पन्न करून सुरक्षितता मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कायदे बदलणे गरजेचे आहे तसेच आर्थिक बजेटमध्ये पैशाची तरतुद करावी लागेल.जगदीश पटवर्धन वझिरा, बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..