‘मंगलगाणी दंगलगाणी’ पासून सुरू झालेला अशोक हांडे यांच्या चौरंग चा प्रवास आज पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
७ ऑगस्ट १९८७ रोजी सुरु झालेल्या ‘चौरंग’ या संस्थेने २०२१ पर्यत मंगलगाणी दंगलगाणी, गाने सुहाने, आजादी ५०, अमृत लता, मधुरबाला, अत्रे- अत्रे- सर्वत्रे, आवाज की दुनिया, माणिकमोती, गंगा जमुना, मराठी बाणा, मी यशवंत!, स्वर स्नेहल असे दर्जेदार कार्यक्रम रसिकांना बहाल केले आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात दौरे केले.
लंडन, अमेरिका, दुबई, युरोप आदी ठिकाणी पण कार्यक्रम केले आहेत.
रंगमंचीय सांस्कृतिक विद्यापीठ, चैतन्याचा अखंड वाहणारा झरा, दैदिप्यमान कार्यक्रमांची शृंखला लाभलेल्या ‘चौरंग’ च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त अशोक हांडे, समस्त चौरंग परिवारातील सदस्य आणि सर्व रसिकांना अंतःकरणपूर्वक मंगलमय सदिच्छा व पुढील उज्ज्वल यशस्वी वाटचालीस अनेकोत्तम मंगलकामना.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply