सिलसिला चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ४० वर्षे पूर्ण होत आहेत.
१४ ऑगस्ट १९८१ रोजी हा चित्रपट प्रक्षेपित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते, तेथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाचे लेखन यश चोप्रा, प्रीती बेदी, सागर सरहादी आणि रोमेश शर्मा यांचे आहे.
या चित्रपटाचे कथानक संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हरिवंशराय बच्चन यांच्या ‘रंग बरसे ‘ या काव्याचे गीत रुपांतर आहे. या चित्रपटाची गीते जावेद अख्तर, हसन कमाल आणि राजेंद्र कृष्ण यांची असून संगीत शिव हरी यांचे आहे. या चित्रपटातील देखा एक ख्वाब मै ये सिलसिले हुये, ये कहा आ गये हम, लडकी है या शोला, सर से सर के, नीला आसमा खो गया, जब तुम तोडो पिया, खुद जो वादा किया ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाचे छायाचित्रण के. जी. यांचे आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करण्यात येणार होती. इतकेच नव्हे तर रेखाने साकारलेल्या ‘चांदनी ‘ या व्यक्तिरेखेसाठी अगोदर आपणास ऑफर होती, असे पद्मिनी कोल्हापूरेने एका मुलाखतीत म्हटले होते. पण जया बच्चन आणि रेखा एकाच चित्रपटात एकत्र आल्याने या चित्रपटाची घोषणेपासूनच दणदणीत पूर्वप्रसिध्दी झाली.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply