चल संन्यासी मंदिर मे, सून बाल ब्रह्मचारी मै हू कन्याकुमारी, बाली उमरिया, यह है गीता का ज्ञान अशा सुपर हिट गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेल्या सोहनलाल कंवर निर्मित आणि दिग्दर्शित संन्यासी चित्रपट प्रदर्शित १७ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला. फिल्म नगर या बॅनरखाली निर्माण झालेल्या या चित्रपटाची कथा पटकथा राम केळकर यांची आहे. तर छायाचित्रण राघु कर्मकार यांचे आहे.
या चित्रपटात मनोजकुमार, हेमा मालिनी, प्राण, प्रेम चोप्रा आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच अरुणा इराणी, राज मेहरा, इंद्राणी मुखर्जी, कामिनी कौशल, सुलोचनादीदी, हरी शिवदासानी, चंद्रशेखर, शैलेशकुमार, मुराद, ब्रह्म भारव्दाज, सी. एस. दुबे, व्ही. गोपाल, राजपाल, युनुस परवेझ, केशव राणा, धुमाळ आणि जयश्री टी. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते वर्मा मलिक, विश्वेश्वर शर्मा, विठ्ठलभाई पटेल, हसरत जयपुरी, एम. जी. हशमत आणि इंदिवर यांची असून संगीत शंकर जयकिशन यांचे आहे.
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सरा येथे खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply