नवीन लेखन...

शोले सिनेमाची ४६ वर्षे

भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?

१५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्‍‌र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले… पण ” शोले” आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.

कारण एकच त्यातील ‘टिमवर्क’

शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.

दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.

गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.

जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.

ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.

संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..