सर्वोत्तम किशोरवयीन प्रेम कथा असे ही या चित्रपटाला म्हणता येईल. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ‘कोवळ्या वया’तील (टीन एजर) प्रेमकथांच्या चित्रपटाचा पाया घातला.
हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली. हिरो घरात होताच व नेहमी प्रमाणे नवीन हिरॉईन डिंपल कपाडिया शोधून प्रेम-कथा निर्माण केली. बॉलीवूडचा रुपेरी पडदा पुढे ज्या अनेक अभिनेत्रींनी ‘नायिका’म्हणून गाजविला त्यांना राज कपूर यांनी ‘आर.के’ तर्फे रुपेरी पडद्यावर येण्याची पहिली संधी दिली होती.
१९४८ मध्ये राज कपूर यांनी ‘आर. के. फिल्म’ची स्थापना केली. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’या चित्रपटाची निर्मिती केली ज्यात या चित्रपटातून राज कपूर यांनी त्यांचा धाकटा मुलगा ऋषी कपूरबरोबर नायिका म्हणून डिंपल कपाडिया यांना संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला. ऋषि कपूर व डिंपल कपाडिया यांचा हा पहिला चित्रपट होता. बॉबी चित्रपटाने कमालीचा धंदा केला. अनेक आठवडे हा चित्रपट हाऊस फुल्ल चालला. त्याने अनेक विक्रम केले.
ऋषि कपूर व डिंपल कपाडिया यांच्या बरोबर प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खोटे, अरुणा ईरानी, प्रेम चोपड़ा, फरीदा जलाल यांनी अभिनय केला होता. या चित्रपटातील गाणी खूपच गाजली होती. यांचे संगीत दिले होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. गाणी गायली होती लता मंगेशकर, शैलेंद्र सिंह,नरेन्द्र चंचल, व याचे गीतकार होते आनंद बक्षी. या चित्रपटाला १९७४ सालचे फ़िल्मफेअर पुरस्कार सर्वोतम अभिनेता, सर्वोत्कृठ अभिनेत्री ,सर्वश्रेष्ठ कला निर्देशन, सर्वश्रेष्ठ पार्श्व गायक म्हणून नरेन्द्र चंचल यांना बेशक मंदिर मस्जिद या गाण्यासाठी मिळाले होते.
असे म्हणतात १९७० साली “मेरा नाम जोकर” सारखा चित्रपट फ्लॉप गेल्याने राज कपूरने बॉबी चित्रपटाची निर्मिती केली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply