प्रसन्न कपूर निर्मित आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘परिचय’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
प्रसन्न कपूर म्हणजे जितेंद्र याचा सख्खा भाऊ होय आणि त्या काळात जितेंद्र आपल्या अभिनयाविषयी गंभीर आहे हे अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशी चर्चा होती. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी येथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. यात जीतेंद्र, जया भादुरी, प्राण आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत आहेत.
खरं तर १९६५ मधील हॉलीवूडच्या इंग्रजी चित्रपट ‘द साउंड ऑफ म्युझिक’ वरून गुलजारजींना ‘परिचय’ बनवण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणतात. ही एका शिक्षकाची कथा आहे जो (जितेंद्र) पाच व्रात्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचा व मार्गदर्शन करण्याचे आवाहन स्वीकारतो. त्यांच्याबरोबर सहानुभूतीपूर्ण संबंध प्रस्थापित करताना कौटुंबिक मूल्ये आणि मुलांसाठी असलेल्या प्रेमाची आवश्यकता त्या मुलांच्या वडील ( संजीवकुमार) व आजोबांना( प्राण) आपलेसे करण्यात यशस्वी होतो. जया भादुरीने या मुलांच्या मोठ्या बहीणीची भूमिका सहजपणे निभावली आहे जी पुढे जितेंद्रच्या प्रेमात पडते. या मुलांचा आजोबा जो शिस्तप्रिय व कठोर असतो ही भूमिका प्राणने साकारलीय . प्राणबरोबर या मुलांच्या वडिलांच्या भूमिकेला संजीवकुमारने योग्य उत्तम दिला .
चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुलजारजींच्या सर्व अर्थपूर्ण गीतांना आर.डी. बर्मन यांचे संगीत. एक अतिशय सुखद योग. यातील गाणी पाच दशकानंतरही लक्षात राहतात. पूर्वीच्या चित्रपट संगीताचे हे खास वैशिष्ट्य आहे. तेवढी मेहनतही प्रत्येक गाण्यावर घेतली जाई. बीती न बिताई रैना- लता मंगेशकर, भूपिंदर सिंह; (लता मंगेशकरांना या गाण्यासाठी राष्ट्रीयचित्रपट सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला), मितवा बोले मीठे बोल- (भूपिंदर सिंह), मुसाफ़िर हूं यारो- (किशोर कुमार ) ,सा रे के सा रे- ( किशोर कुमार, आशा भोंसले) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply