‘बावर्ची’ चित्रपट ७ जुलै १९७२ रोजी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनातील विशेष म्हणजे विविधतापूर्ण थीम. त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे खुमासदार, मार्मिक, मिस्कील मनोरंजक चित्रपट. त्यांचा ‘बावर्ची’असाच खेळकर खोडकर चित्रपट. त्याच्या प्रदर्शनास ४९ वर्षे पूर्ण झाली.
एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. मध्येच एखादे तत्वज्ञान मांडतो, इट इज सिंपल टू बी हॅपी… इज सो डिफिकल्ट टू सिंपल.
संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. या चित्रपटात जया भादुरी, उषा किरण, दुर्गा खोटे, ए. के. हनगल, ह्रदयनाथ चट्टोपाध्याय, पेन्टल, मा. राजू, असरानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. कैफी आझमी यांच्या गीताना मदन मोहन यांचे संगीत आहे. मोरे नैना बाहे नीर (पार्श्वगायिका लता मंगेशकर), भोर आ गया अधियारा (किशोरकुमार आणि मन्ना डे), तुम बिन जीवन (मन्ना डे), मस्त पवन डोले रे (लता मंगेशकर) इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. ह्रषिकेश मुखर्जी, एन. सी. सिप्पी आणि रोमू सिप्पी निर्मित या चित्रपटाचे मुंबईत मेन थिएटर मेट्रो हे होते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply