५ जून, दिन जागतिक पर्यावरणाचा,
नागरिकांच्या मनातील सुप्त भावनांचा !
शुद्ध पर्यावरणाचा “आनंद” सर्वांच्या मना,
कसे प्रत्यक्षात आणतात हे मात्र कळेना !
पाणी आणि हवा ह्यांचे प्रदूषण आंम्हा ठाऊक,
फोन/मोबाईल/टीव्हीने होते प्रदूषण हे कोणास ठाऊक?
सुजलाम, सुफलाम वसुंधरेची आंम्ही बाळे,
पर्यावरणाशी करितो आंम्ही चाळे !
मग लागतो पाठी आमुच्या प्रदूषणाचा राक्षस,
त्याला चकवा देता देता होतो त्याचे भक्षक !
होत आहे अत्याचार प्रदूषणाचा वसुंधरेवर,
कधी वाटते जावे सगळे सोडून दुरवर !
अत्याचार संपविण्या झाडे लाऊ झाडे जगवू,
पर्यायाने सर्वांचे जीवन उजळू !
देश विकासासाठी आहे गरज विज्ञान-तंत्रज्ञानाची,
म्हणून कोणी विसरत नाही प्रदूषणासी !
प्रदूषणाच्या विळख्याने माणसांचे जीवन होते कष्टी,
हीच आहे सर्व जगावर आपत्ती !
पर्यावरणाचा समतोल ठेवण्या,
आहे गरज प्रदूषण कमी करण्या !
प्रदूषण कमी करण्याचे आहेत मार्ग नामी,
इच्छाशक्ती वाचून काही येत नाही कामी !
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून,
पाहुणे ठोकतात भाषणे आणि लावतात झाडे !
फोटो काढून झाले, कोण घालणार उद्या पाणी झाडे?
प्रदूषण कमी करण्याचे ध्येय आहे जगाचे,
म्हणून पेलले आहे शिवधनुष्य प्रदूषण कमी करण्याचे !
आहेत आशिष वसुंधरा आणि शिवरामाचा,
लक्षात रोजच असुद्या ५ जून, दिन जागतिक पर्यावरणाचा !!
जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)
Leave a Reply