उपनगरीय लोकलमधून कंबर कसून नेटाने प्रवास करणाऱ्या महिला प्रकाशांसाठी पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येणाऱ्या ‘लेडीज स्पेशल’ ट्रेनला ५ मे रोजी २८ वर्षे पूर्ण झाली.
केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या पहिली लेडीज स्पेशल लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून गेली २८ वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय.
मुंबईच्या लोकलला लाईफलाईन म्हणतात. ही लेडीज स्पेशल महिलांसाठी फक्त लाईफलाईनच नाही तर एक हक्काची मैत्रीण झालीय. विरार ते चर्चगेट या २८ स्टेशन्सच्या प्रवासात या ट्रेनमध्ये लाखो महिला चढतात आणि उतरतात.
पश्चिम रेल्वेवर सुरू झालेली ही लेडीज स्पेशल नंतर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर मार्गावरही सुरू झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply