दर्जेदार कथा, अप्रतिम गाणी आणि तेवढय़ाच सकस अभिनयाच्या जोरावर एव्हरग्रीन अभिनेते राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांनी सुपरहिट केलेला ‘आराधना’ हा चित्रपट शक्ती सामंत यांनी दिग्दर्शीत केला होता.
या चित्रपटात राजेश खन्ना यांना एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. खुल्या जीपमधून जात असताना राजेशखन्ना ‘मेरे सपनो की राणी’ हे गीत गाऊ लागतात. तेवढय़ात रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या मिनी ट्रेनमध्ये शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची नजरा नजर होते. काही काळानंतर त्यांची ओळख होऊन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर ते विवाह करतात. मात्र, नंतर चित्रपटात एक नाट्यमय वळण येते.
राजेश यांचा एका विमान अपघातात मृत्यू होतो. यानंतरच्या घडामोडी आपण चित्रपटात बघतो. या चित्रपटाची कथा, गाणी, संगीत या सर्व बाबींमुळे हा चित्रपट तुफान हिट झाला होता. सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, व आनंद बक्षी यांची गाणी यांचा चित्रपटाच्या यशात मोठा वाटा होता. ‘आराधना’ या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. यामध्ये काकांसाठी बहुतेक गाणी ही किशोरकुमार यांनी गायली होती. यामध्ये ‘मेरे सपनो की राणी’,‘रूप तेरा मस्ताना’,‘कोरा कागज था ये मेरा’ या गाण्यांचा समावेश होता. किशोर कुमार यांच्या गाण्यांना आजही तेवढय़ाच आवडीने ऐकले जाते.
‘आराधना’ या चित्रपटाला १९६९ सालचे फ़िल्मफेअर पुरस्कार सर्वोतम चित्रपट, सर्वोत्कृठ अभिनेत्री शर्मिला टागोर,सर्वोतम पार्श्वगायक: किशोर कुमार मिळाले होते. शक्ति सामंता यांच्या शक्ती फिल्म्स हा चित्रपट होता. याचे लेखक होते सचिन भौमिक (कथा व पटकथा), रमेश पंत यांचे संवाद होते,सचिन देव बर्मन यांचे संगीत, व आनंद बक्षी यांची गाणी व शर्मिला टागोर, राजेश खन्ना यांच्या बरोबर सुजीत कुमार, पहाड़ी सानयाल, अभि भट्टाचार्य, व फरीदा जलाल यांनी यात अभिनय केला होता.
आराधना चित्रपट:
आराधना चित्रपटातील गाणी:
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply