केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावरील कालचा दिवस हा कसोटी क्रिकेटच्या थरारकतेचा आणि एकंदरीतच क्रिकेटच्या या सर्वश्रेष्ठ प्रकाराची सर्वश्रेष्ठता पुनःपुन्हा अधोरेखित करणारा दिवस होता. ‘फ्लॅशबॅक’मध्ये म्हटल्याप्रमाणे ४ जानेवारीला परदेशातील कसोट्यांमध्ये शतक काढण्याचा शिरस्ता सचिनने कायम ठेवलेला आहे. हरभजनने काल ज्या पद्धतीने दोन गडी बाद केले ते पाहता या नेत्रदीपक झुंजीचा निकाल भारताच्याच बाजूने लागण्याची शक्यता अधिक आहे.
सचिनच्या कारकिर्दीतील महिनेवार कसोटी शतकांकडे एक नजर
नोव्हेंबर : ७ शतके.
डिसेंबर : ९ शतके.
जानेवारी : १० शतके.
फेब्रुवारी : ६ शतके.
मार्च : ५ शतके.
एप्रिल : एक शतक.
मे : २ शतके.
जून : एक शतक.
जुलै : ३ शतके.
ऑगस्ट : ४ शतके.
सप्टेंबर महिन्यात शतक नाही.
ऑक्टोबर : ३ शतके.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर.
नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या तीन महिन्यांमधील त्याची एकत्रित शतके तब्बल २६ एवढी भरतात!
ग्रेगरिअन कॅलेंडरमधील महिन्याच्या अंतिम तारखेस शतक
सहावे शतक. ३१ जुलै १९९३. श्रीलंकेविरुद्ध.
अठरावे शतक. ३१ जानेवारी १९९९. पाकिस्तानविरुद्ध आणि
एकोणिसावे शतक. २८ फेन्रुवारी १९९९. श्रीलंकेविरुद्ध.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply