चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रसाद प्रॉडक्शन्सच्या खिलौना या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज बावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादलेल्या या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर ड्रीमलॅन्ड ( ग्रॅन्ट रोड) हे होते. चंदर वोरा दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र, संजीवकुमार, मुमताज, शत्रूघ्न सिन्हा, दुर्गा खोटे, जगदीप, शशीबाला, रमेश देव, चांद उस्मानी, विजू खोटे, अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद बक्षी यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे आणि या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.
सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे.
प्रसाद प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘शारदा ‘ ( १९५७), छोटी बहेन ( ५९), ससुराल ( ६१), हमराही ( ६३), बेटी बेटे ( ६४), दादी मा ( ६६), मिलन ( ६७), राजा और रंक ( ६८), जीने की राह ( ६९), बिदाई ( ७४), उधार का सिंदूर ( ७६), एक दुजे के लिए ( ८१) इत्यादी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. सहकुटुंब सहपरिवार पाहण्याजोगे चित्रपट हे प्रसाद प्रॉडक्शन्सच्या चित्रपटांचे कायमच वैशिष्ट्य राहिले.
Leave a Reply