चौदहवी का चांद हो, यह लखनौ की सरजमी, मिली खाक मे मुहब्बत, दिल की कहानी रंग लायी रे, बालम से मिलन होगा, मेरा यार बना है दुल्हा अशा सुरेल गीत संगीताचा समावेश असलेल्या गुरुदत्त फिल्मच्या ‘ कागज के फूल ‘ ( रिलीज ४ जुलै १९६०) च्या प्रदर्शनास आज यशस्वी ६२ वर्षे पूर्ण होत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. मोहम्मद सादिक दिग्दर्शित या चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यासह रहेमान, जॉनी वाॅकर, मिनू मुमताज, टूनटून, प्रवीण पौल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन सागर उस्मान यांचे आहे, तर पटकथा अब्रार अल्वी यांची आहे. छायाचित्रण व्ही. के. मूर्ती यांचे आहे. शकील बदायुनी यांच्या गीताना रवि यांचे संगीत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply