नवीन लेखन...

अडुसष्ट वर्षांपू्र्वी – भाग ३

मला धक्काच बसला.
एके दिवशी संध्याकाळी मी नलूच्या घरी गेलो. नलूचे वडील घरी नव्हते. नलूच्या आईने मला जे सांगितलं, जे सांगितलं ते ऐकून माझं धाबं दणाणलं.
“नलूचे वडील नलूकरता स्थळ बघायला गेले आहेत”. ती माऊली शांतपणेे म्हणाली.’मग माझं काय?’ हा ओठावर आलेला प्रश्न मी पोटांत घातला.
“लग्न करायचंच नाही असं नलू म्हणतेय, तूच तिची समजूत घाल” मी प्रथम हबकलो, पण शांतपणे नलूशी बोलायचं ठरवलं.
“मला अंजली ताईसारखं शिकून मोठ्ठं व्हायचंय”.मलू म्हणाली. अंजली माझी मोठी बहीण. P.hd. करून डॅाक्टर होण्याच्या मार्गावर होती.
“मग त्यात काय झालं? तुझ्या सासरी तुला पुढे शिकायाला परवानगी देतीलही”. मी म्हणालो. तिला काय म्हणायचं होतं ते मला समजलं.
“तुझ्या घरी तू सर्वात मोठी मुलगी- तुझ्या आईवडलांना तुझ्या लग्नाची काळजी. तुझे आई -वडील जिथे जमवतील तिथे तू लग्न कर.
हे मी कसं बोललो हे मलाच कळलं नाहीं.

तिचे वडील कोणाशी तरी खासगी आवाजांत बोलतांना ऐकलं. “मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे.एका चांगल्या मुलाच्या आयुष्याचं कां नुकसान करूं? शिवाय माझ्या मुलीला अवेळी वैधव्य -तिच्या संसाराचा विचका, त्याऐवजी नीट पत्रिका जुळवूनच मी तिचं लग्न लाविन”.

कालांतराने तिचं लग्न झालं. तिला नातवंडं झाली असं मला कळलं. माझंही लग्न झालं. मलाही मनातवंडं झाली. ती तिच्या संसारांत रमली. मी माझ्या संसारांत रमलो. मला नलूचा ठावा ठिकाणाहि मिळेला. मी तिचा नाद सोडला पण तिला मी अजून विसरूं शकत नाही.

११ वर्षांपूर्वी माझ्या लग्नाला ४० पेक्षा जास्त वर्षं झाली होती, तेव्हाची गोष्ट. माझी पत्नी एकदा रेल्वेने प्रवास करतांना तिचे दागिने हरवले. खूप शोधून ते मिळेनात. कधी नाही ते तिने एका ज्योतिष्याला विचीरायचं ठरवलं. ज्योतिषी बुवांनी तिची जन्म पत्रिका पहायला मागितली. कांहीतरी कारणाने हिचे सख्खे मामा आणि मामी जवळच होते. मामांनी त्यांच्या वडलांनी – म्हणजे हिच्या आजोबांनी हिच्या जन्माच्या वेळी बनवलेली पत्रिका आणून दिली. तीच खरीखुरी पत्रिका असं मामा ठांसून सांगत होते. “ही खरी पत्रिका आहे असं म्हणतां? “ज्योतिषीबुवानी विचारलं.

“हो. नक्कीच. माझ्या वडलांनी त्या काळच्या विद्वान पंडितांकडून बनविलेली ”
“आणि तुम्ही म्हणतां, यांच्या लग्नाला ४० वर्षं झाली”
“हो. आणि त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. मुलं-नातवंडं आहेत” मामा म्हणाले.
“अहो, या पत्रिकेत मंगळ आहे. अशा बाईचं मुळांत लग्न होत नाहीं. लग्न झाल्यास ६ महिन्यात पतिचा मृत्यू होतो किंवा घटस्फोट होतो. यांच्या पतींच्या पत्रिकेत दोषनिवारण असेल कदाचित. म्हणून यांचा संसार इतकी वर्षे चालला आहे. तुमचा मूळ प्रश्न – हरवलेले दागिने या पत्रिकेनुसार मिळणार नाहींत, पण यांचा संसार दीर्घकाल राहील.”

याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली.

मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं.

गोष्ट संपत नाही !संपणारही नाहीं. कारण मी ही गोष्ट कधीच विसरणार नाहीं.

— अनिल शर्मा

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..