नवीन लेखन...

‘रेडिओ सिलोन’ च्या हिंदी सेवेची ७१ वर्षे

रेडिओ सिलोन म्हणजेच श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कापोर्रेशन (SLBC) म्हटलं हमेशा जवाँ गीत, एक और अनेक, पुरानी फिल्मोंके गीत, ग्रामोफोन संगीत धारा, बदलते हुए साथी, अनोखे बोल असे चाळीस-पन्नासच्या दशकाचा सुगंध असलेली अनेक जुनी गाणी ऐकवणारे, श्रोत्यांशी आपलेपणाने संवाद साधणारे कार्यक्रम.

३० मार्च १९५१ रोजी सायंकाळी ५ वाजता रेडिओ सिलोनची हिंदी सेवेची सुरुवात झाली.

रेडिओ सिलोन मध्ये आजही जुन्याकाळातील दर्दी श्रोते आठवणीत हरवून जातात. विविध वयोगटातील, जातीधर्मांतील, भिन्न विचारसरणीच्या देश परदेशातील करोडो श्रोत्यांना एका सुरेल माळेत गुंफण्याचे कार्य सिलोनने केले. १९४९ ते १९७४ या सुवर्णकाळातील अजरामर गाणी रेडीओ सिलोनने रसिकांना केवळ ऐकवलीच नाहीत तर श्रोत्यांमध्ये एक आगळा ऋणानुबंध निर्माण केला. रेडिओ सिलोनच्या केंद्रात हिंदी चित्रपट संगीतातील अनेक गाणी जपून ठेवलेली आहेत.

१९४९ ते ६०च्या कालखंडात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी सिनेमागीतांना बंदी असताना रेडिओ सिलोनने ती सारी गाणी घराघरात पोहोचवली. आशिया खंडातल्या विविध भाषांमधल्या ३५ हजार ओरिजनल रेकॉर्डस सिलोनच्या संग्रही असून, विविध भारतीकडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्सचा त्यात समावेश आहे. गोपाल शर्मा पासून पद्मिनी परेरा आणि ज्योती परमार या उद्घोषकांचे चाहते आजही त्यांच्याशी नाते टिकवून आहेत. कुमार नवाथे आणि त्यांच्यासारख्या अन्य चाहत्यांनी भारतभर रेडिओ सिलोन श्रोता संघ स्थापन केले आहेत. आर्थिक घडी विस्कटल्यानंतर एप्रिल, २००८ मध्ये रेडिओ सिलोनचे सायंकालीन प्रक्षेपण बंद झाले आणि करोडो संगीतप्रेमी हळहळले. पण २०१२ मध्ये रेडिओ सिलोनची भारतातील लोकप्रियता समजल्यानंतर ही हिंदी सेवा पुन्हा सुरू झाली.सध्या ही सेवा सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सुरु असते.

To listen live via Internet please visit web site –

www.slbc.lk

and click on the Link -Asia Hindi Listen live,

http://tunein.com/radio/SLBC-Asia-Hindi-Service-s237007/

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..