नवीन लेखन...

बरसात चित्रपटाची ७३ वर्षे

राजकपूर यांनी बरसात या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. चित्रपट सर्वच दृष्टीने गाजला. राजकपूर यांचा बरसात चित्रपट म्हणजे ही जणू एक भावस्पर्शी कविताच होती. या चित्रपटामुळे राजकपूर यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले.

राजकपूरचे गुरू केदार शर्मा यांच्या मते ‘बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून बरसातचा उल्लेख करावा लागेल.

बरसातच्या संगीताने आणि प्रणयदृष्यांनी प्रेक्षक खूष झाले होते. या चित्रपटातील ‘बस करो, अब तो मै आ गयी ना’ हा नर्गिसच्या तोंडचा संवाद त्या काळी खूपच गाजला होता. ‘बरसात’ द्वारा शंकर-जयकिशन सारखे संगीतकार, शैलेंद्र सारखे गीतकार, हसरत जयपुरी, ही मंडळी पुढे आली. शैलेंद्र यांनी ‘बरसात में हमसे मिले तुम…’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. ‘बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. रामानंद सागर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा पहिला चित्रपट होता. अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले, लता मंगेशकर यांना खरा ब्रेक मिळाला तो पण बरसात मधील गाण्यांमुळेच. बरसातमुळे राजकपूर यांचे नाव सर्वत्र झाले. १९५० साली मुंबईत इंपीरियर आणि एक्सल्सियर चित्रपटगृहात झळकल्यावर हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. कलकत्त्याच्या परैडाईज सिनेमागृहात तो ११४ आठवडे चालला होता.

राजकपूर यांनी आपण आणि नर्गिस यांच्याशिवाय प्रेमनाथ आणि निम्मी ही नवीन जोडी प्रथमच सादर केली. काश्मीरचे नयनरम्य वातावरण बरसात चित्रपट खुलवून गेला. ‘बरसात’ मधील नर्गिसची एक पोझ राजकपूर यांनी आपल्या आर. के. फिल्मचे बोधचिन्ह म्हणून निवडले, व्हायोलिनच्या सुराने मंतरलेली आणि त्या बेहोशी राजच्या उजव्या हाता नेपावलेली नर्गिस अणि डाव्या हातात व्हायोलीन आणि उजव्या हातावरी नर्गिसचा तोल सांभाळून उभा असलेला भावविवश राजकपूर असे हे बोधचिन्ह त्याकाळी अमाप गाजले होते. बरसातमधील गाणी एकापेक्षा सरस होती. “छोड़ गए बालम”,”हवा में उड़ता जाए”,”जिंदगी में हरदम रोता”,”बरसात में हम मिले”,”जिया बेकरार है”,”मुझे किसी से प्यार”, “पतली कमर है”,”बिछड़े हुए परदेसी”,”अब मेरा कौन सहारा”,”मेरी आँखों में बस” अशी दहा गाणी या चित्रपटात होती. ‘छोड गये बालम, मुझे हाय अकेला छोड़ गये.. बरसात में हमे मिले तुम सजन तुमसे मिले हम…’, ‘हवा में उडता जाये, मेरा लाल दुपट्टा मलमलका’ या गाण्यांनी सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावले होते. आज ही ऐकताना मजा येते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राज-नर्गिस संबंधाला भावनात्मक प्रेमाचं हळवे स्वरूप प्राप्त झालम होत. असे म्हणतात त्यावेळी या चित्रपटाने एक करोड दहा लाखाचा व्यवसाय केला होता, जो आज सुमारे ७०० कोटीचा आहे. या पैशातुन राजकपूर यांनी आरके स्टूडियो उभा केला होता.

— रमेश सहस्त्रबुध्दे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..