नवीन लेखन...

८ वी ड – भाग १५

अनेकजण सांगतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेंदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेंदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात. खरेच किती पालक जागरूक असतात हादेखील प्रश्न आहे. मुलगा दहा-बारा वर्षाचा झाला की हळूहळू त्याला समाज येते. जर आईवडील दोघेही कामावर जात असतील तर आपला मुलगा कुठे असेल , काय करत असेल ह्या चिंता त्यांना सतत भेडसावत असतात. त्यावर उत्तम मार्ग म्हणजे मोबाईल. आपण सतत त्याच्या संपर्कात राहू शकतो आणि म्हणून त्याच्या हातात मोबाईल येतो एक गरज म्हणून. म्हटले तर योग्य आहे आणि नाही म्हटले तर अयोग्य देखील आहे . परंतु ह्या वेगवान जगात ती एक गरज आहे आणि ती नाकारणे सहज शक्य नाही. अर्थात प्रतिज्ञावादी आणि तत्ववादी सोडून. काहीजण याबाबतीत परखड असतातही अर्थात त्याचे आयुष्य त्यांना लखलाभ होवो.

माझ्या ओळखीचे एक साधे विद्वान गृहस्त आहेत , त्याच्याकडे साधा मोबाईल होता. खरे तर त्यांना चांगल्या मोबाईलची खरी गरज होती. पण आधी मी नाही त्यांतली अशी भूमिका होती, आत्ता त्याचे मतपरिवर्तन होत आहे कारण त्याची ती गरजच आहे, ते त्यांना पतात्न आहे. आज नवीन मोबाईल म्हणा , लेप्टोप म्हणा गरज आहे पण ती लहानपणी होती का ? त्याच्या आणि आत्ता जे लहान आहेत त्याच्यादेखील, अर्थात उत्तर आहे आणि नाही हे द्यावे लागेल. कोणतीही नवीन वस्तू किवा नवीन यंत्र आले की दोन फौजा तयार होतात एक पाहिजे आणि दुसरी का आणि कशाला म्हणणारी. जेव्हा कॉम्पुटर आला तेव्हा अशीच वादळे उठली आणि आपल्या आयुष्याचा भाग बनली.

आपण कुठे आणि कोणत्या स्तरावर जायचे हे आपले आपणच ठरवावे. पूर्वी मी हाताने लेख लिहित होतो , कागद , पेन याचे जबरदस्त आकर्षण, नव्या कोर्या कागदाचा वास , काळे पेन, शांतपणे लिहिणे या सर्वाचेच गारुड मनावर होते ,परंतु एकदा अशी वेळ आली की ताबडतोब लिहून पाहिजे होते , घरापासून दूर होतो. पलीकडून त्या मुलीने सांगितले लवकर हवे आहे अर्ध्या तासात. मी म्हणाली मला whats app वर जमेल का, तशी ती म्हणाली सर आम्ही वीस-वीस वर्षाच्या मुली लिहितो तुम्ही असे काय करता. इथे माझ्या इगोला सॉलिड धक्का बसला एका वीस वर्षाच्या मुलीने मला आव्हान दिले , आणि इथे मी ते स्वीकारले , छोटासा तेला हवा तसा लेख लिहून दिला आणि तेव्हापासून माझी ८ वी ड सुटली म्हणजे माझी तुकडी बदलली आणि मी सर्व लेख कॉम्पुटरवर लिहू लागलो. हा माझ्यामधील बदल मी चांगला ओळखला. परंतु माझे एक मित्र अजून हातांनी लिह्रीतात.खूप सांगून समजावले पण काही वळत नाही. सुर्वात्तेला म्हणालो की मुळच्या हातात ३-४ वर्षापर्यंत ‘ स्क्रीन ‘ देवू नये, ते खूप खरे आहे कारण सतत बघितल्यामुळे विचारशक्तीवर परिणाम होतोच होतो.

मी मुद्दामच माझे उदाहरण दिले कारण आपला गुरु कोणीही असू शकतो ६० वर्षाचा माणूस किवा २०-२२ वर्षाचा मुलगा किवा मुलगीही. अनेकजण आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवतात अर्थात हे चागले आहे परंतु अगदी हट्टदेखील धरू नये कारण त्याचे रुपांतर गरजेत कधी होईल ते सांगता येणार नाही. सतत मध्यमवर्गीय विचार देखील करू नये. योग्य वेळेस योग्य गोष्ट हाती पडलीच पाहिजे ह्या मताचा आहे पण ती योग्य वेळ तुम्ही स्वतः ठरवू नये परिस्थितीनुसार ती वेळ बदलत असते. त्याचे फायदे आहेत तसे तोटेही असणारच. ते मात्र स्वीकारलेच पाहिजेत . तिथून तुम्हाला पळता येणार नाही.

माझ्या क्लासमध्ये काही मुले यायची. फोन सायलेंटवर असला तरी त्यांना कळायचे मग ती अस्वस्थ व्हायची. मी शांतपणे फोन घ्यायला सांगायचो कारण एखादा महत्वाचा असूही शकतो ही माझी भूमिका. एक-दोनदा असे झाल्यावर मुले स्वतःच बंद करायची इथे जर एखाद्या तत्ववादी मास्तरासारखा किंचाळलो असतो तर वेगळेच घडले असते. सतत मला त्रास जाळी असता. परन्तु मुले ही मुले आहेत आपल्यासारखे त्याचेही विश्व आहे , नुसता अभ्यास हेच त्याचे विश्व निश्चित नसणार ह्याची कल्पना मला होतो. म्हणून मी किंचाळलो नाही. अर्थात हाच दुवा मला एकीकडे त्याचा मित्र बनवत होता आणि शिक्षकही.

आज सेल्फिवर सतत टीका होत असते , एखादा मुलगा सेल्फी काढत असेल तर चूक धरतात अर्थात त्याचा अतिरेकही होतो कारण त्या नादात त्याचे जीवही जातात इथे मात्र चार वर्षाचा स्क्रीन हाताळणारा मुलगा आणि धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणारा दोघेही त्या यंत्राने पूर्ण भरलेले असतात. सेल्फी एक सोय असते , दुसरा-तिसरा फोटो काढणारा नसतो म्हणून. परंतु पूर्वी मोबाईल नव्हता तेव्हा आमची किवा आमच्या मागची पिढी तासनतास आरशासमोर असायची आणि घरच्याच्या शिव्याही खायची जसे आत्ता सेल्फिबद्दल शिव्या खातात तशी. ही तर त्या त्या वयाची गरज आहे माझे दिसणे , माझे असणे , मी कसा दिसतो हे आरशात बघायचे आत्ता मोबाईलमध्ये बघतात प्रवृत्ती तीच पण साधने वेगळी अर्थात कुठलाही अतिरेक हा वाईट असतो परंतु आमच्या मानसोपचारतज्ञांना काही काम हवे की नको. म्हणे दरोरोज ७ ते ८ वेळा सेल्फी काढणे एक वेड आहे किंवा काही , अहो हे घडतच राहणार कारण स्वतःचे स्वतःवर अत्यंत प्रेम असतेच असते. त्याला स्वतःबद्दल कुतूहल असतेच म्हणून तर कधीतरी त्याचा हात भविष्य सागणारयापुढे पसरतो , मी सामान्य माणसाबद्दल सांगत आहे असामान्य नाही. मुलाच्या आणि मोठ्या माणसामध्ये एक गोष्ट अनेकवेळा सामाईक असते ती म्हणजे ‘ कुतूहल ‘. लहान मुलगा अधिकाराने ते पूर्ण करण्याचा पर्यंत करतो तर मोठा माणूस जरा विचार करून करतो. परंतु कुतूहलाची ओढ दोन्ही बाजूला असतेच असते. माणूस मोठा झाला तर त्याच्या बुद्धिमत्तेत भर पडत जाते, क्षमतादेखील वाढते, तो सर्व काही शिकतो ते जगाच्या उघड्या अनुभवाच्या शाळेत परंतु मुलगा मात्र सतत काहीतरी शोधत असतो , एखादी नवीन गोष्ट दिसली की त्याला ती हवी असते , कंटाळा आला की तो तशीच सोडून देतो , असे मोठ्या माणसाच्या बाबतीत घडते का , नीट विचार केला तर दोन्ही उत्तरे देता येतील , कारण सर्व जादू ‘ का ? ‘ ह्या प्रश्नात आहे लहान मुलांना हा प्रश्न पडत नाही , किवा त्यांना हा प्रश विचारला तर उत्तर देता येत नाही काही प्रमाणात माणसालाही ह्या ‘ का ? ‘ चे उत्तर देता येत नाही. अर्थात तो त्या का ? ला बगल देत आपलेच म्हणणे खरे मानतो मग सांगा इथे मूल कोण ते ? एक अनुत्तरीत प्रश्न पुढल्या लेखासाठी.

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..