नवीन लेखन...

८ वी ड – भाग ९

कुछ कुछ होता है।

नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. बाजूच्या सिनेमागृहाजवळून जात होतो. बरेच ओळखीचे चेहरे दिसले, सर कालच परीक्षा संपली. आम्ही ठरवले आत्ता मोकळे झालो, पिक्चर टाकू. एस आर के चा आहे. बघितला का? त्या मुलाने विचारले, येणार का? आजूबाजूचे त्याचे मित्र गोंधळले. डायरेक्ट सरांना विचारले म्हणून. नाही रे वेळ नाही मिळाला. तुम्ही बघा एन्जॉय आणि मी निघालो. मुलामध्ये मी वावरताना मी एकीकडे शिक्षक असायचो तर दुसरीकडे मित्र. अर्थात ही भूमिका वाटते तशी सोपी नाही. पण मला जमली असेच म्हणायला हवे कारण ज्या बिनधास्तपणे त्या मुलाने पिक्चरची ऑफर दिली यावरून समजले.

मला हल्लीच्या मुला-मुलींची नाडी बरोबर ओळखता येते कारण त्यांच्या अडचणी, भावना ते सरळपणे व्यक्त करतात ज्या आपल्या आई-वडीलांशी शेअर करून शकत नाहीत. पूर्वी म्हणत मुलगा किवा मुलगी १६ वर्षाची झाली की त्यांना ‘सगळे’ समजते परंतु ते वय खूपच अलीकडे आले आहे. माझा मुलगा -मुलगी तसा लहान आहे त्याला काय कळते या भ्रमात आई-वडलांनी अजिबात राहू नये. कारण त्यांच्या कुछ कुछ ची प्रक्रिया १०-१२ वर्षापासूनच सुरु होते. आजूबाजूचे वातावरण, मुले रिक्षाने जात येत असतील तर रिक्षांमधील गप्पा यातून त्यांना बरेच जाणवते. पण ती मुले व्यक्त करू शकत नाहीत. त्याच्या मनामध्ये, विचारामध्ये बदल व्हायला सुरवात नुकतीच झालेली असते. घरात जर कर्मठ वातवरण असेल तर ते मुल चांगले-वाईटच्या फेऱ्यात सापडते, मग ही मुले बाहेर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा मोठ्या मुलांच्या गप्पा ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट निर्माण होतो, मग ती मुले जे बोलतात त्याप्रमाणे आपली मते ही मुले बनवू लागतात. अगदी साधे उधाहरण घ्या एखादा मुलगा दररोज शेजारी रहाणाऱ्या मुलीबरोबर येत असेल तर काही जण त्याच्याकडे बघतात. जर एखाद्या दिवशी ती मुलगी त्याच्याबरोबर नाही आली तर ती मुले विचारतात काय आज मैत्रीण नाही आली बरोबर. असे दोन-चार वेळा झाले की ह्याच पॉइंटला त्या मुलाच्या डोक्यात चक्रे फिरू लागतात. कारण मैत्रीण असणे आणि कबुल करणे हे लहान वयात काय मोठ्या वयातही न पचणारे आहे. लहान वयात इतरांना पचत नाही तसे मोठ्या वयातही नाही. हा इतरांचा प्रश्न आहे. पण मुलाच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. त्याच्या भाव-भावना निर्माण होत असतात त्याला वयाची अट नाही, मर्यादा नाही ते आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. पेडर रोडचे वातवरण आणि डोंबिवलीमधील वातावरण यामध्ये खूप फरक असतो. मुले कोणत्या वातावरणात वाढतात कशी वाढतात हे महत्वाचे आहे. घरामधील वातावरण कसे आहे, घरामधील संस्काराचे ‘ओझे’ त्यांना पेलवेल का? ह्याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण बाहेरील सतत बदलते वातावरण आधी सरळ सोपे वाटणारे संस्कार तो मुलगा-मुलगी झुगारून तर देणार नाहीत ना ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. मुलाचे मन फार चंचल असते त्याचे आदर्श, त्याचे विचार सतत बदलत असतात, ती मुले ठाम जो पर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्याची मानसिक आंदोलने चालूच असतात.

आरशासमोर त्याचे सतत उभे राहणे, मग त्याच्यावर त्याबद्दल त्याच्या पालकाचे चिडणे आणि मग त्याचे आरसा सोडून मोबाईलमध्ये स्वतःचा चेहरा सतत पाहणे, केसावरून सतत हात फिरवणे, ह्या सर्वाची सुरवात कधी, कशी होते हे सुज्ञ पालकांनी समजून घेतले पाहिजे. आपले केस, आपले राहणीमान आपले पाहिजे कुणाची नक्कल नको असे अनेक पालक कंठशोष करून सांगतात पण मुले काही त्याला भिक घालत नाहीत. कारण ते वयच तसे असते. अनेक पालक त्या वयातून गेलेले असतात हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. पण तसे काही ठिकाणी होत नाही, मग मुले बंड करताना दिसतात. कधी कधी विपर्यासही होतो, जीवघेणाही होतो. मध्यंतरी एका शाळकरी मुलाने हवे तसे दफ्तर नाही आणले म्हणून आत्महत्या केली होती असे वाचनात आले. मग विचार आला ही मुले इतकी का तीव्र होतात. साधे कारण आहे पालकांनी एखाद्या गोष्टीला जितक्या तीव्रतेने विरोध केला तर तितक्याच तीव्रतेने मुलाची किंवा मुलीची प्रतिक्रिया असते हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु तसे काही ठिकाणी होत नाही आणि मग सगळेच गणित बिघडते. मुलाकडे संयम नसला तर पालकांनी तो दाखवणे गरजेचे आहे. १०-१२ वर्षापासूनच मुलगा स्वतःचे अस्तित्व दाखवायला सुरवात करतो कारण त्याच्यामधील ‘मी’ ची ओळख त्याला होऊ लागलेली आणि त्याच वेळी पालकाचा ‘मी’ हा सशक्त असतो प्रभावी असतो आणि पुढे पुढे ह्या मी ला मुलाचाही ‘मी’ आव्हान देत असतो.

संस्कार, विचार याचा मारा मुलावर किती करावा याचे गणित नसते ते स्वतःला कळले पाहिजे. माझ्याकडे एक मुलगा यायचा चांगले वातावरण, आई
शिस्तप्रिय, पण चिरंजीव मात्र वैतगालेले असायचे. सतत दबलेला हा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा मात्र तो स्वतःला वाटेल तसे वागू लागला. परंतु सुदैवाने त्याला योग्यवेळी समजले आणि गाडी रुळावर आली. परंतु असे घडतेच असे नाही. म्हणून पालकांनी एक तर आपल्या मुलांना लहान वगैरे समजू नये, त्यांना सर्व समजते निदान समजायला सुरवात झाली आहे हे ओळखून असावे आणि त्याचबरोबर संवाद करत राहणे महत्वाचे. संवाद करता करता आपण त्याचावर संस्कारचे ओझे तर टाकत नाही ना, चागले संस्कार हवेतच पण अशा पद्धतीने करावेत की त्याच्यामधल्या ‘मी’ पणाला आव्हान न देणारे असावेत, तर मीपणाचे रुपांतर ‘आपले’ पणात करणारे असावेत.

त्याचे ‘कुछ कुछ होता है’ हे चालूच रहाणार आहे त्याला शक्यतो अडवू नये ही वादळे खूप लहान असतात फक्त पालकांनी सतत फुंकर मारून मोठी करू नयेत.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..