नवीन लेखन...

9 x 1 = 7

एका शिक्षिकेचा वर्गावर क्लास चालू होता. आज ती मुलांना काहीतरी नवीन शिकवणार होती. तिने नऊचा पाढा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो असा :

9×1 = 7
9×2 = 18
9×3 = 27
9×4 = 36
9×5 = 45
9×6 = 54
9×7 = 63
9×8 = 72
9×9 = 81
9×10 = 90

शिक्षिका फळ्यावर लिहित असताना वर्गातली मुले हसत होती. कोणी खुदूखुदू तर कोणी मोठ्याने. कोणी आपले हसू दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर कोणी प्रश्नार्थक मुद्रेने फळ्याकडे पहात होते. आपल्या शिक्षिकेकडून काहीतरी चूक झाली आहे अशा भावनेने ते सगळे फळ्याकडे बघत होते.

पाढा लिहून झाल्यावर शिक्षिका मुलांकडे वळली. सगळी मुले हसत आहेत हे ही तिने पाहिले. ती मुलांना म्हणाली “तुम्ही का हसत आहात ते मला समजेल का? ”

मुलांनी फळ्याकडे बोट दाखविले. एक धीट मुलगी उठून उभी राहिली आणि शिक्षिकेला म्हणाली “तुमचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतो. तुम्ही 9×1 = 7 लिहिले आहे. नवाच्या ऐवजी सातचा आकडा पडला आहे. ”

शिक्षिका प्रसन्न हसली. ती म्हणाली “मी गणिताची शिक्षिका नाही. मी तुम्हाला गणित शिकवायला आले नाही. मी तुम्हाला आयुष्यातला एक मोठा धडा सांगणार आहे. नऊचा पूर्ण पाढा मी फळ्यावर लिहिला. दहापैकी नऊ आकडे बरोबर होते. एक चुकला होता. ज्यासाठी तुम्ही मला हसत होतात. मुलांनो, आयुष्य असेच असते.

आपण दहापैकी नऊवेळा बरोबर असलो आणि एकदाच जरी चुकलो तर लोक आपल्या चुकीबद्दल बोलतात. आपली चूक दाखवून द्यायला कमी करत नाहीत. आपण नऊ वेळा बरोबर केले त्याचे त्यांना काही घेणे देणे नसते. जिथे आपण चुकतो अथवा कमी पडतो तेथे लोक बरोबर बोट ठेवतात.

नऊच्या पाढ्याच्या निमित्ताने तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवाल आणि तुमच्या आयुष्यात कधी अशी चूक झाली तर जगाला शूरपणाने तोंड द्याल अशी मला खात्री वाटते.”

वर्गात शांतता पसरली. सगळी मुले शिक्षिकेने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करु लागली. आपणही यावरुन धडा घ्यायला हवा. आपल्याकडून जेव्हा चूक होते तेव्हा त्यावर पांघरुण घालण्याऐवजी अथवा त्याचे समर्थन करण्याऐवजी आपण आपली चूक दिलदारपणे कबूल करायला हवी. ती चूक आपल्या लक्षात आली नसेल तर ज्याने ती आणून दिली त्याचे आपण आभारी असायला हवे. याउपरोक्त आपण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याला स्वतःला सुधारायची ही एक चांगली संधी असते हे विसरुन चालणार नाही. अनेकदा आपण चूक दाखविणाऱ्यावर रागावतो, स्वतःचे समर्थन करतो.

शिक्षिकेने एका छोट्याशा पाढ्यावरुन दिलेला हा धडा कधीच विसरणार नाही.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..