“लहानपणापासूनच कलेची प्रचंड आवड, त्यामुळे एकेका कलेशी जुळवून घेऊन त्यांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. वाकचातुर्य छायाचित्रण या विषयात विशेष निपुण असल्याची प्रचिती त्याची पारितोषिक करुन, असा कलेच्या अनेक प्रांगणात उल्लेखनीय काम करुन, स्वत:च्या गुणांची दखल घ्यायला लावणारा निखील अडसुळे सांगतोय त्याच्या अभिनय आणि त्यांनी केलेल्या विविध कला व इतर उपक्रमांविषयी” “पोपट हरवलेली माणसं” या नाटकातला आकाश आठवतोय अगदी मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या निखील अडसुळे यांनी प्रमोद काळे सोबत “रस्त्यावरचं गाणं” हे पहिलं नाटक केलं “ग्रीप्स थिएटर”साठी तिथेच त्याच्या अभिनयाला पैलू पडायला सुरुवात झाली, नाटक म्हणजे काय? बॅक स्टेज ची प्रक्रिया कशी असते? हे सर्व निखीलनं अवगत केलं; सोबतच सचिन कुंडलकर, सुषमा देशपांडे यांच्या सहवास व मार्गदर्शनामुळे अभिनयाची खोली वाढत जाणारी होती. “पगलाघोडा”,“तो,ते,ती”,“पुर्णविराम”, सारखी प्रायोगिक आणि सध्याचं “पोपट हरवलेली माणसं” अर्थात आत्ताचं “मिठ्ठू मिठ्ठू फॅमिली” या सर्व नाटकांच्या प्रवासात आपल्याला काही उत्तम साकारता आलं या विषयी निखील आनंद व्यक्त करतो. तसंच आविष्कार सारख्या नाट्यसंस्थेत दिपक राजाध्यक्षांकडून प्रशिक्षण घेतलं त्यामुळे “बया दार उघड” साठी ऑफर मिळाली, त्याच दरम्यान “बस्स एक रात लेले-पांडे” या कॉमेडी शॉर्टफिल्म साठी निवड झाली. “यशोवर्धन कौंस” व “प्रतिमा कुलकर्णी सारख्या कलाकारांची सुद्धा ओळख होऊन खूप शिकता आलं असं निखील सांगत असतो.
— सागर मालाडकर
Leave a Reply