नवीन लेखन...

“गुणवंत निखील”

“लहानपणापासूनच कलेची प्रचंड आवड, त्यामुळे एकेका कलेशी जुळवून घेऊन त्यांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. वाकचातुर्य छायाचित्रण या विषयात विशेष निपुण असल्याची प्रचिती त्याची पारितोषिक करुन, असा कलेच्या अनेक प्रांगणात उल्लेखनीय काम करुन, स्वत:च्या गुणांची दखल घ्यायला लावणारा निखील अडसुळे सांगतोय त्याच्या अभिनय आणि त्यांनी केलेल्या विविध कला व इतर उपक्रमांविषयी” “पोपट हरवलेली माणसं” या नाटकातला आकाश आठवतोय अगदी मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या निखील अडसुळे यांनी प्रमोद काळे सोबत “रस्त्यावरचं गाणं” हे पहिलं नाटक केलं “ग्रीप्स थिएटर”साठी तिथेच त्याच्या अभिनयाला पैलू पडायला सुरुवात झाली, नाटक म्हणजे काय? बॅक स्टेज ची प्रक्रिया कशी असते? हे सर्व निखीलनं अवगत केलं; सोबतच सचिन कुंडलकर, सुषमा देशपांडे यांच्या सहवास व मार्गदर्शनामुळे अभिनयाची खोली वाढत जाणारी होती. “पगलाघोडा”,“तो,ते,ती”,“पुर्णविराम”, सारखी प्रायोगिक आणि सध्याचं “पोपट हरवलेली माणसं” अर्थात आत्ताचं “मिठ्ठू मिठ्ठू फॅमिली” या सर्व नाटकांच्या प्रवासात आपल्याला काही उत्तम साकारता आलं या विषयी निखील आनंद व्यक्त करतो. तसंच आविष्कार सारख्या नाट्यसंस्थेत दिपक राजाध्यक्षांकडून प्रशिक्षण घेतलं त्यामुळे “बया दार उघड” साठी ऑफर मिळाली, त्याच दरम्यान “बस्स एक रात लेले-पांडे” या कॉमेडी शॉर्टफिल्म साठी निवड झाली. “यशोवर्धन कौंस” व “प्रतिमा कुलकर्णी सारख्या कलाकारांची सुद्धा ओळख होऊन खूप शिकता आलं असं निखील सांगत असतो.

 “चित्रगोष्टी”, “शक” तसंच “तो ते ती” ही आत्तापर्यंतची आव्हानात्मक प्रायोगिक नाटकं असल्याची निखील म्हणतो. कारण यामधील विषय वास्तवदर्शी व भावनाप्रधान असल्यामुळे त्यामध्ये श्रोत्यांना आपलेपणा वाटण्याची शक्यता अधिक आहे. याव्यतिरिक्त “ऑल इंडिया युथ कल्चर प्रोग्रॅम” तर्फे निखील अडसुळे याने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व सुद्धा केलयं. तसंच त्याच्याशी बोलताना वेळोवेळी सामाजिक बांधिलकीसाठी असलेली आवड व कार्यही अधोरेखीत झालं. अनेक वक्तृत्त्व स्पर्धांमध्ये निखील नी अव्वल क्रमांक पटकावला, आणि हा सिलसिला त्याच्या शालेय जीवनातूनच सुरु झाला. विविध प्रकारची छायाचित्र काढण्याची आवड असणार्‍या निखील नी “ब्लॉस्म फोटोग्राफी क्लब ऑफ इंडिया” तर्फे सुद्धा उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.
मुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं. अशा अनेकांगी क्षेत्रात नव्यानं पाऊल ठेवणार्‍या निखील अडसुळेचं करियर सुद्धा सफल आणि उज्ज्वल असेल हे नक्की.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..