वाचा व विचार करा…
फटाक्यातील विषारी वायूमुळे, धुरामुळे दमा , खोकला , डोकेदुखी , त्वचारोग , ब्लडप्रेशर तर कधी कँन्सरही होऊ शकतो .
फटाक्यांच्या आवाजाची पातळी ’80’ डेसिबल पेक्षा जास्त वाढली तर माणसाला ञास होतो . बहुतेक फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असते .
बॉम सारख्या फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या उरात धडकी तर वृद्धांची व आजारी व्यक्तिंची झोप उडवतो.
त्यामुळे चिडचिडेपणा , मानसिक ताण-तणाव व बहीरेपणा येण्याची शक्यता वाढते .
अनेक फटाका फँक्टरीत लहान मुलं काम करतात. उदा. तामिळनाडू मधील शिवकाशी येथे जवळ-जवळ 1लाख (100000) लहान मुलं रोज 12 (बारा ) तास फटाका फँक्टरीत काम करतात .
सल्फर , कार्बन , फॉस्फरस इत्यादी विषारी वायुच्या वातावरणात काम करुन त्यांना काय मिळते …?
तर …
a) अत्यंत तुटपुंजा पगार , आणि …
b) बोनस म्हणून दमा , त्वचारोग , कर्करोग इत्यादी सारखे आजार आयुष्यभरासाठी.
फटाके फोडणे ही संस्कृती आपल्याकडे चीन या देशातून आली आहे .
— शोभा सुभेदार
Leave a Reply